मुदत ठेव म्हणजे काय | What is Fixed Deposit

मुदत ठेव म्हणजे काय

मंडळी, जेव्हा सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा हा विषय येतो तेव्हा आपल्या समोर गुंतवणुकीचा एकच पर्याय उभा राहतो तो म्हणजे मुदत ठेव. आज आपण बघणार आहोत मुदत ठेव म्हणजे काय? त्याचे फायदे आणि त्याविषयी काही प्रश्नाची उत्तरं.

मुदत ठेव म्हणजे असा गुंतवणुकीचा पर्याय ज्यामध्ये एक ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी एखाद्या बँकेत किंवा वित्तीय संस्थेत ठेवावी लागते आणि त्याबदल्यात ती बँक किंवा वित्तीय संस्था ठेवीदारांना व्याज देते.

उदाहरणार्थ,
तुम्ही स्टेट बँकेत १० हजार रुपये ७% व्याजदराने मुदत ठेवींमध्ये १ वर्षासाठी ठेवलेत तर एक वर्ष पूर्ण झाल्यावर स्टेट बँक तुम्हाला १० हजारच्या ७% म्हणजे ७०० रुपये व्याज देईल. म्हणजे एक वर्ष पूर्ण झाल्यावर बँक तुम्हाला एकूण १० हजार रुपये (मूळ गुंतवणूक) + ७०० रुपये (वार्षिक व्याज) = १०,७०० रुपये परत देईल.

मुदत ठेवींचे प्रकार

मुदत ठेवींचे प्रमुख चार प्रकार आहेत.

मुदत ठेवींमध्ये अजून दोन प्रकार आहेत कॉलेबल आणि नॉन कॉलेबल.

कॉलेबल मुदत ठेव म्हणजे ज्यामध्ये ठेवीदाराला ठेवींची मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करता येतं.
नॉन कॉलेबल मुदत ठेव म्हणजे ज्यामध्ये ठेवीदाराला कुठल्याही परिस्थितीत ठेवींची मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करता येत नाही.

मुदत ठेव खातं सुरु कसं करावं?

मुदत ठेव खातं सुरु करण्याचे दोन पर्याय आहेत -

१. नेट बँकिंग किंवा मोबाईल ऍपचा वापर करून मुदत ठेव खातं सुरु करता येतं. मात्र, त्यासाठी खातेदाराचं बचत खातं संबंधित बँकेत असावं लागतं तरच या पर्यायाचा वापर करून मुदत ठेव खातं सुरु करता येतं.

२. बँकेच्या शाखेत जाऊन मुदत ठेव खातं सुरु करता येतं. जर तुमचं संबंधित बँकेत बचत खातं असेल तर अगदी कमीत कमी कागदपत्रांची गरज लागते. फक्त मुदत ठेव खातं सुरु करण्यासाठीचा फॉर्म भरून द्यावा लागतो आणि फोटो द्यावा लागतो. तसंच फॉर्म मध्ये तुमचा बचत खाते क्रमांक द्यावा लागतो.

मात्र, तुमचं संबंधित बँकेत बचत खातं नसेल तर मात्र तुम्हाला किमान खालील कागदपत्र द्यावी लागतील -

कोणता मुदत ठेव पर्याय सर्वोत्तम आहे?

याचं उत्तर आहे जो पर्याय खातेदाराच्या सोयीचा असेल तो मुदत ठेव पर्याय सर्वोत्तम आहे. कारण ज्यांना थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी अल्पकाळाची मुदत ठेव, जास्त फायदा हवा असणाऱ्यांसाठी दीर्घकाळाची मुदत ठेव, प्राप्तिकरात बचत हवी असेल तर टॅक्स सेव्हर मुदत ठेव असे वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम ठरतात.

कोणत्या बँकेत सर्वात जास्त मुदत ठेव दर आहे?

आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त व्याजदर पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींवर मिळतो आहे. त्याशिवाय प्रत्येक बँकेच्या काही ठराविक योजना असतात ज्या जास्त व्याजदर देतात.

उदाहरणार्थ,
एसबीआय अमृत कलश योजना, एसबीआय वीकेअर योजना (फक्त जेष्ठ नागरिकांसाठी), ३९९ दिवसांची बडोदा तिरंगा प्लस ठेव, कॅनरा बँकेची ४४४ दिवसांची मुदत ठेव अशा अनेक योजना आहेत ज्या ठेवीदारांना चांगला व्याजदर मिळवून देतात.

मुदत ठेवीत किती रक्कम जमा करू शकतो?

सामान्यपणे मुदत ठेवींमध्ये किमान १००० हजार रुपये भरून खातं सुरु करावं लागतं. मात्र कमाल रकमेची कुठलीही मर्यादा नसते.

ठेवीचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो?

सामान्यपणे बँकांमध्ये ७ दिवस ते १० वर्षे या दरम्यान ठेवींचा कालावधी निवडता येतो. मात्र जसा कालावधी असेल त्याप्रमाणे व्याजदर बदलू शकतो.
पोस्टाच्या मुदत ठेवींसाठी १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षे असे कालावधी उपलब्ध आहेत.

आवर्ती ठेव आणि मुदत ठेव मध्ये काय फरक आहे?

आवर्ती ठेवींमध्ये एका ठराविक मुदतीसाठी गुंतवणूक करावी लागते. मात्र, या प्रकारात दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागते. एकरकमी भरता येत नाही.
या उलट मुदत ठेवींमध्ये एका ठराविक कालावधीसाठी एकरकमी पैशाची गुंतवणूक करावी लागते. हप्त्याने पैसे भरून चालत नाही.

मुदत ठेवींचे फायदे

मुदत ठेवींचे तोटे

निष्कर्ष

थोडक्यात सांगायचं झालं तर सध्यातरी मुदत ठेवींसारखा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय नाही. मात्र, त्यातही काही फायदे आणि तोटे आहेत. जर ठेवीदारांना सुरक्षितता आणि निश्चित परतावा हवा असेल तर मुदत ठेव हा पर्याय योग्य आहे. कारण मुदत ठेव अल्प आणि दीर्घ दोन्ही प्रकारच्या मुदतीत सुरक्षितता आणि निश्चित परतावा देतो.

मात्र, तुम्हाला खूप मोठी रक्कम भविष्यात तयार करायची असेल तर मात्र मुदत ठेव हा तितकासा चांगला पर्याय ठरत नाही. त्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटचा पर्याय निवडावा लागतो. मात्र त्याचबरोबर तेवढीच जोखीम सुद्धा गृहीत धरावी लागते.

FAQ

मुदत ठेव पूर्णपणे जोखीम मुक्त नसते पण यात जोखीम बऱ्याच अंशी कमी असते. खासकरून म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट मधील गुंतवणुकीपेक्षा जोखीम नक्की कमी असते.

बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक जास्त चांगली मानली जाते. कारण पोस्टाच्या योजनांचे व्याजदर बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा जास्त असतात आणि पोस्टाच्या योजनांना भारत सरकारची हमीसुद्धा असते.

हो. मुदत ठेवींचे व्याज दरमहा दिले जाते. तसंच दर तिमाहीला, दर सहा महिन्यांनी, दर वर्षी आणि मुदत संपल्यावर असे पर्याय सुद्धा असतात.

नाही. मुदत ठेवींमध्ये गुंतवणुकीच्या कालावधी मध्ये व्याजदर बदलत नाही. मात्र, बँकांकडून किंवा पोस्टाकडून साधारणपणे दर ३ महिन्यांनी व्याजदर बदलला जाऊ शकतो. पण त्याचा चालू मुदत ठेव खात्याच्या व्याजदरावर परिणाम होत नाही.

कमी जोखीम आणि निश्चित परतावा या बाबतीत मुदत ठेव जास्त चांगला पर्याय आहे. मात्र दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक आणि जास्त चांगला परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड जास्त चांगला पर्याय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top