80C deduction in income tax । 80C प्राप्तिकरात वजावट कशी मिळेल?

80C deduction - भारताच्या आयकर कायद्याचे कलम 80C हे एक असं कलम आहे जे विविध खर्च आणि गुंतवणुकींची माहिती देतं ज्यांना आयकरातून सूट किंवा वजावट देण्यात आली आहे. ज्याचा उपयोग करून करदाता त्याच्या एकूण उत्पन्नातून अनेक वजावटींचा दावा करू शकतो; ज्यामुळे करदात्याचे करपात्र उत्पन्न कमी होईल आणि पर्यायाने त्याचा प्राप्तिकर कमी होईल.

या लेखामध्ये आपण हेच बघणार आहोत की ८०सी अंतर्गत वजावट (80C deduction) मिळवून आपण कशाप्रकारे आपला प्राप्तिकर कमी करू शकतो किंवा वाचवू शकतो.

आपण कदाचित हे ऐकलं असेल की ८०सी अंतर्गत (80C deduction) आपण दीड लाख रुपयांपर्यंत करपात्र रकमेतून वजावट मिळवू शकतो आणि त्यासाठी काही प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागते. पण आपल्याला हे माहीत आहे का की आपण गुंतवणूक न करता सुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्यांचा उपयोग करून आपण ही दीड लाखाची वजावट मिळवू शकतो.

मंडळी ८० सी नुसार आपण दोन प्रकारे लाभ मिळवू शकतो.
पहिला गुंतवणूक न करता आणि दुसरा गुंतवणूक करून.

पहिल्यांदा आपण बघूया गुंतवणूक न करता हा फायदा आपण कसा घेऊ शकतो.

तेव्हा मंडळी हे होते पाच पर्याय जे आपल्याला गुंतवणुकी शिवाय करपात्र रकमेतून वजावटीसाठी (80C deduction without investment) उपयोगी पडतात. या पाच-सहा पर्यायांचा उपयोग करून सुद्धा जर ८०सी अंतर्गत दीड लाखाच्या वजावटीतील काही भाग शिल्लक राहत असेल तर आपण अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतो ज्या ८०सी अंतर्गत करपात्र रकमेतून वजावट मिळवून देऊ शकतात.

तेव्हा आता बघूया या योजनांची माहिती.

80C deduction

80C अंतर्गत वजावटीसाठी गुंतवणुकीचे पर्याय? (Investment options for 80C deduction)

या होत्या काही योजना ज्यामध्ये गुंतवणूक करून आपण ८०सी (80C deduction)अंतर्गत करपात्र रकमेतून दीड लाखापर्यंत वजावटीचा दावा करू शकतो.

याशिवाय ही काही अशा योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून आपण ८०सी अंतर्गत करपात्र रकमेतून दीड लाखापर्यंत वजावटीचा दावा करू शकतो.
उदाहरणार्थ, पाच वर्षांसाठी ची एफडी, पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना, राष्ट्रीय बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना. या योजनांमध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर आणि योजनेत मिळणार्‍या परताव्यावर कर आकारला जात नाही, मात्र वार्षिक मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. त्यामुळे या योजनांचा उल्लेख अगदी शेवटी केला आहे.

तेव्हा मंडळी आता आपल्याला साधारणपणे अंदाज आला असेल की आपण ८०सी अंतर्गत वजावट (80C deduction) मिळवण्यासाठी आपल्या गुंतवणुकीचे नियोजन कशा प्रकारे केलं म्हणजे ते आपल्याला फायदेशीर ठरू शकेल. गुंतवणूक नेहमी अशी करायची जी आपल्याला जास्तीत जास्त परतावा देईल आणि जर आपण प्राप्तिकर भरत असू तर त्यातून आपल्याला सूट मिळवून देईल.

जर तुम्हाला आजचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळींना सुद्धा हा लेख वाचायला द्या म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top