WhatsApp Banking म्हणजे काय - मंडळी, WhatsApp हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय. ज्यांच्याकडे फोन आहे त्यांच्याकडे बहुतेक व्हॉट्सअॅप असतंच. त्यामुळेच अनेक व्यावसायिकांनी याचा फायदा घेऊन अनेक सुविधा व्हॉट्सअॅप वरून द्यायला सुरुवात केली. मग यात बँकांनीही उडी घेतली आणि सुरु केलं व्हॉट्सअॅप बँकिंग.
सुरुवातीला बँकांनी हे प्रायोगिक तत्वावर सुरु केलं होतं आणि हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. मग हळूहळू बँकांनी त्यावर अजून जास्त सुविधा द्यायला सुरुवात केली.
मंडळी, आज आपण याच व्हॉट्सअॅप बँकिंग ची माहिती घेणार आहोत. ज्यात आपण बघणार आहोत -
Table of Contents
WhatsApp Banking म्हणजे काय?
मंडळी हल्ली सगळ्या गोष्टी डिजिटल व्हायला लागल्या आहेत. व्हॉट्सअॅप बँकिंग हा या डिजिटल बँकिंगचाच एक प्रकार आहे, जो ग्राहकांना अनेक बँकिंगच्या संबंधित सुविधा पुरवतो तो सुद्धा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जे वापरायला अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनमधलं व्हॉट्सअॅप हे अँप्लिकेशन वापरावं लागतं. यामध्ये तुम्हाला बँकांच्या अप्लिकेशन मध्ये लॉगिन करणे, बँकांच्या कॉल सेंटरला कॉल करणे आणि त्यांचे प्रतिनिधी तुमच्याशी बोलण्याची वाट बघत बसणे, बँकेच्या चकरा मारणे आणि कर्मचाऱ्यांशी वाद, रांगेत उभं राहणे यासारख्या गोष्टींपासून बऱ्याच अंशी सुटका मिळवून देतो. WhatsApp Banking मध्ये दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे सगळे दिवस सुविधा मिळते.
WhatsApp Banking चालू कसं करायचं?
-
सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाइलला मध्ये जाऊन गुगल ओपन करावं लागेल. त्यामध्ये बँकेचं नाव आणि मग whatsapp banking असं लिहावं लागेल.
उदा. Sbi च्या व्हॉट्सअॅप बँकिंगसाठी Sbi whatsapp banking असं सर्च करावं लागेल. त्यात पहिलाच पर्याय sbi चा येईल त्यावर क्लीक करा. मग हे पेज उघडेल. -
त्यावर तुम्हाला पर्याय मिळेल क्यूआर कोड स्कॅन करण्याचा. समोर दिलेला क्यूआर कोड स्कॅन केला की कि तुमच्या फोन मधलं व्हॉट्सअॅप हे अँप्लिकेशन चालू होईल आणि त्यात तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप नंबर वरून (+919022690226) या नंबर वर “Hi” हा मेसेज पाठवण्यास सांगितले जाईल. हा मेसेज पाठवला कि तुम्हाला SBI कडून खालीलप्रमाणे मेसेज येईल
प्रिय ग्राहक,
तुम्ही SBI Whatsapp बँकिंग सेवांचा भाग नाही.
सेवेचा लाभ घेण्यासाठी, कृपया खालीलपैकी एक पर्याय निवडा.
तुम्ही एसबीआयचे विद्यमान ग्राहक आहात का?
तुम्ही ग्राहक आसल्यास येस बटन दाबा आणि नसल्यास नो बटन दाबा. - तुम्ही जेव्हा येस बटन दाबाल तेव्हा तुम्हाला पुढचा मेसेज येईल ज्यात तुम्हाला एक फोन नंबर दिला जाईल आणि त्या नंबरवर WAREG A/c No असा मेसेज पाठवा असं सांगितलं जाईल म्हणजे WAREG असा शब्द लिहून स्पेस देऊन पुढे sbi खाते क्रमांक लिहून तो मेसेज त्यांनी दिलेल्या नम्बरवर पाठवावा लागेल. हा मेसेज साध्या एसेमेस वरून करावा लागेल व्हॉट्सअॅप मधून नाही.
- त्यांनतर तुम्हाला बँकेकडून तुमचा नंबर व्हॉट्सअॅप बँकिंग साठी रजिस्टर झाल्याचा मेसेज येईल.
-
त्यांनतर तुम्हाला व्हॉट्सअॅप मधून “Hi SBI” असा मेसेज पाठवण्यास सांगितलं जाईल. तो पाठवल्यावर त्याला उत्तर म्हणून जो मेसेज येईल त्यात अनेक पर्याय असतील त्यात मुख्य तीन पर्याय दिसतील
i) Get Balance
ii) Get Mini Statement आणि
iii) Other Services
तर मंडळी जर तुम्ही SBI चे खातेदार असाल तर नक्की हे करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल कि याचे किती फायदे आहेत.
WhatsApp Banking च्या सेवा?
मंडळी या व्हॉट्सअॅप बँकिंग च्या माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या सेवा बँका देतात. त्यामध्ये
- खात्यातील शिल्लक बघणे
- बँकेचं मिनी स्टेटमेंट
- पेन्शन स्लिप
- कर्ज उत्पादनांची माहिती (गृहकर्ज, कार कर्ज, सुवर्ण कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज)
- ठेवींची माहिती (बचत खाते, आवर्ती ठेव, मुदत ठेव – वैशिष्ट्ये आणि व्याज दर)
- NRI सेवा
- डिजिटल बँकिंग माहिती
- बँकिंग फॉर्म डाउनलोड करा
- सुट्टीचे कॅलेंडर
- डेबिट कार्ड वापराबद्दल माहिती
या आणि अशा अनेक सेवा आपल्याला मिळतात. या सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी आवश्यक आहेत.
- ज्या बँकेच्या व्हॉट्सअॅप बँकिंग सुविधेचा लाभ घेणार असाल त्या बँकेत तुमचं खात असल पाहिजे.
- संबंधित बँकेच्या व्हॉट्सअॅप बँकिंगसाठी याआधी सांगितल्याप्रमाणे रेजिस्ट्रेशन करावं लागेल.
WhatsApp Banking चे फायदे
- व्हॉट्सअॅप बँकिंग मुळे अनेक बँकिंग सेवा आपल्याला अक्षरशः चुटकीसरशी मिळतात.
- या सेवा मिळवण्यासाठी आपल्याला कुठलंही बँकेचं अँप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागत नाही. त्यामुळे युजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवायची गरज उरत नाही.
- बँकेचा एक कटकटीचा विषय म्हणजे बँकेच्या चकरा मारणे. व्हॉट्सअॅप बँकिंग मुळे अनेक सेवा घरबसल्या मिळतात त्यामुळे बँकेत जावं लागत नाही म्हणून वेळ वाचतो.
- व्हॉट्सअॅप हे अतिशय प्रचलित अँप्लिकेशन आहे त्यामुळे ते वापरणाऱ्यांना व्हॉट्सअॅप बँकिंग वापरणं सोपं जात.
- अजूनतरी व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा मोफत आहे तसेच ही सेवा २४ तास आणि दररोज उपलब्ध असते.
तर मंडळी ही होती WhatsApp Banking ची माहिती. ही सुविधा मिळवण्यासाठी फक्त आपलं संबंधित बँकेत खात असावं लागतं, आपला मोबाईल क्रमांक खात्याशी जोडलेला असावा लागतो आणि आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप अँप्लिकेशन असावं लागतं. एवढं असेल तर आपण सहज व्हॉट्सअॅप बँकिंगचा फायदा घेऊ शकता आणि घरबसल्या अनेक बँकेच्या सेवा मिळवू शकता. धन्यवाद.