Avdel Tithe Pravas yojana | आवडेल तेथे प्रवास योजना 2023

नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत एसटी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ किंवा MSRTC च्या एका अतिशय गाजलेल्या योजनेची माहिती जिचं नाव आहे आवडेल तेथे प्रवास योजना (Avdel Tithe pravas yojana).

मंडळी आवडेल तेथे प्रवास योजना (Avdel Tithe Pravas yojana) ही खरतर खूप जुनी योजना आहे म्हणजे १९८८ साली ही योजना चालू करण्यात आली होती. पण त्यात वेळोवेळी बदल केले गेले आहेत. मग ते बदल तिकिटाच्या दरात केलेले असोत किंवा इतर कुठले असोत. पण ही योजना प्रवाश्यांमध्ये खूप गाजली.

मंडळी याचा फायदा खास करून फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांना होतो. उदाहरणार्थ, ज्यांना कोकण फिरायचं आहे ते हा पास काढतात आणि मस्तपैकी कोकण ट्रिप करून येतात. कुणाला शेगाव शिर्डी करायची असते. पास काढतात आणि जाऊन येतात. अशी अनेक उदाहरण आहेत.

तसंच, एसटीचा प्रवास सगळ्यात सुरक्षित असतो आणि या पासमुळे प्रवासी कितीही गाड्या बदलू शकतो. महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही प्रवास करता येतो पण अट एकच, गाडी आपल्या एसटी महामंडळाची पाहिजे.

Avdel Tithe Pravas yojana

आवडेल तेथे प्रवास योजनेतील पासच्या किंमती (Pass prices of Avdel Tithe Pravas yojana)

वाहतूक सेवेचा प्रकार

७ दिवसाच्या पासाचे मुल्य

४ दिवसाच्या पासाचे मुल्य

प्रौढ

मुले

प्रौढ

मुले

साधी (साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह

२०४०

१०२५

११७०

५८५

शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह

३०३०

१५२०

१५२०

७६५

(वर दर्शविलेले मुलांच्या पासाचे दर ५ वर्षापेक्षा जास्त व १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत.)

मंडळी,आत्ता वर जे टेबल दिसतंय त्यात एसटी महामंडळाच्या आवडेल तेथे प्रवास या योजनेसाठीचे दर दिलेले आहेत. यामध्ये ७ आणि ४ दिवसांचे पास उपलब्ध आहेत. साधी बस आणि शिवशाही असे गाड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत आणि लहान मुले म्हणजे ५ ते १२ वर्षांच्या दरम्यान वय असलेल्या मुलांसाठी आणि प्रौढ प्रवाश्यांसाठी वेगळे दर आहेत.

साध्या बसचा पास ७ दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला २०४० रु आणि लहान मुलांना १०२५ रु दर पडेल आणि साध्या बसचा पास ४ दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला ११७० रु आणि लहान मुलांना ५८५ रु दर पडेल.

शिवशाही बसचा पास ७ दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला ३०३० रु आणि लहान मुलांना १५२० रु दर पडेल आणि साध्या बसचा पास ४ दिवसांसाठी हवा असेल तर प्रौढ व्यक्तीला १५२० रु आणि लहान मुलांना ७६५ रु दर पडेल.

पण मंडळी इथे गोष्ट आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो कि या पासच्या किमतीवर इतर कुठलीही सवलत लागू होत नाही. म्हणजे जर आपल वय ७५ वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा आपलं वय ६५ ते ७५ च्या दरम्यान असेल किंवा आपण महिला प्रवासी असाल तरी आपल्याला पासची संपूर्ण किंमत द्यावी लागेल त्यावर कुठलीही सवलत मिळणार नाही.

खरं म्हणजे ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाश्याना पासची गरजच नाही कारण त्यांना प्रवास मोफत आहे. तसंच ६५ ते ७५ च्या दरम्यान वय असलेल्या प्रवाश्यांना आणि महिलांना सुद्धा पासची गरज नाही कारण त्यांना तसही अर्ध तिकीट आहे. त्यामुळे हा पास सामान्य प्रवाश्यांसाठी आहे ज्यांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळत नाही.

तर मंडळी, आज आपण बघितली एसटी महामंडळाच्या आवडेल तेथे प्रवास (Avdel Tithe pravas scheme) या योजनेची माहिती. आपण या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि हक्काने म्हणा वाट पाहीन पण एसटीनेत जाईन. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top