Baroda Tiranga Plus deposit scheme | ३९९ दिवसांची बडोदा तिरंगा प्लस ठेव

नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत बँक ऑफ बडोदा (Bank of baroda) च्या बडोदा तिरंगा प्लस ठेव (Baroda Tiranga Plus deposit scheme) योजनेची माहिती ज्यात ठेवीदारांना थोड्या कालावधीच्या ठेवींवर चांगला व्याजदर दिला जात आहे.

बँक ऑफ बडोदा (Baroda Tiranga Plus deposit scheme) ही एक पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. थोडक्यात सरकारी बँक आहे. त्यामुळे त्यातील गुंतवणूक सुरक्षित धरली जाऊ शकते.

मंडळी बडोदा तिरंगा प्लस (Baroda tiranga plus scheme) या योजनेचे नियम सामान्य एफडीसारखेच आहेत. फक्त कालावधी ३९९ दिवसांचाच घ्यावा लागतो. तरच ठेवीदारांना योजनेतील जास्तीच्या व्याजदराचा फायदा मिळतो.

Baroda Tiranga Plus deposit scheme

बडोदा तिरंगा प्लस ठेवींचे प्रकार आणि नियम - Baroda Tiranga Plus deposit scheme types of deposit

यात ठेवींचे २ प्रकार आहेत. Callable म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी असलेले ज्यात किमान गुंतवणूक १००० रु आणि जास्तीत जास्त २ कोटी रु पर्यंत गुंतवणूक करता येते.

नॉन callable म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करन्याची परवानगी नसलेले ज्यात किमान गुंतवणूक १५ लाख रु आणि जास्तीत जास्त २ कोटी रु पर्यंत गुंतवणूक करता येते.

यात कालावधी ३९९ दिवसांचा आहे.

बडोदा तिरंगा प्लस व्याजदर - Baroda Tiranga Plus deposit scheme interest rates

आधी बघूया Callable म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी असलेल्या ठेवींचे व्याजदर. यात सामान्य ठेवीदारांसाठी ७.०५% व्याजदर आहे. आणि जेष्ठ नागरिकांसाठी ७.५५% व्याजदर आहे. फक्त हा वाढीव व्याजदर भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मिळतो. अनिवासी भारतीय असलेल्या जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांचाच व्याजदर लागू होतो म्हणजे ७.०५%.

मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी असलेले

सामान्य नागरिक 

जेष्ठ नागरिक 

७.०५%

७.५५%

आता बघूया नॉन Callable म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी नसलेल्या ठेवींचे व्याजदर. यात सामान्य ठेवीदारांसाठी ७.३०% व्याजदर आहे. आणि जेष्ठ नागरिकांसाठी ७.८०% व्याजदर आहे. इथेसुद्धा हा वाढीव व्याजदर भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मिळतो. अनिवासी भारतीय असलेल्या जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांचाच व्याजदर लागू होतो म्हणजे ७.३०%.

मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी नसलेले

सामान्य नागरिक 

जेष्ठ नागरिक 

७.३०%

७.८०%

बडोदा तिरंगा प्लस मुदतपूर्व खातं बंद करणे - Baroda Tiranga Plus deposit scheme premature withdrawal

जर खातं मुदतीपूर्वी बंद करायचं असेल तर त्यावर काही दंड आकारला जातो. या बाबतीत बँकेचे नियम वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे आपण ही चौकशी बँकेत करू शकता.

बडोदा तिरंगा प्लस कर्ज मिळण्याची सुविधा - Baroda Tiranga Plus deposit scheme loan

ठेवीवर कर्ज काढायचं असल्यास जमा रकमेच्या ९५% पर्यंत रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते आणि त्यावर लागू होणार व्याजदर बँकेच्या नियमाप्रमाणे आकारला जातो.

या योजनेत व्याज मिळण्याचे तीन प्रकार आहेत

बडोदा तिरंगा प्लस आयकरात सवलत - Baroda Tiranga Plus deposit scheme tax benefits

योजनेत केलेली गुंतवणूक आणि मिळणार व्याज दोन्ही करपात्र आहे तसेच टीडीएस सुद्धा कापला जातो. सामान्य ठेवीदारांसाठी ४०००० रु आणि जेष्ठ नागरिकांसाठी ५०००० रु च्या वर व्याजाची वार्षिक रक्कम गेली तर टीडीएस कापला जातो.

टीडीएस कपात टाळायची असेल फॉर्म १५ जी आणि १५ एच भरून बँकेत द्यावा लागतो.

बडोदा तिरंगा प्लस कागदपत्र - Baroda Tiranga Plus deposit scheme documents

यात खातं चालू करण्यासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत

जर क्लब, संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींच खात उघडायचं असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्रे.सादर करावी लागतील. यासंबंधी माहिती आपण बँकेत विचारू शकता.

या योजनेत खातं बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन सुरु करता येईल.

तसंच ठेवीदाराचं बँकेत बचत खातं असेल तर इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल अँप्लिकेशन चा वापर करूनसुद्धा खातं सुरु करता येईल.

तर मंडळी ही होती बँक ऑफ बडोदाच्या, बडोदा तिरंगा प्लस ठेव या ३९९ दिवसांच्या एफडी (Baroda Tiranga Plus deposit scheme) ची थोडक्यात माहिती. आपण या योजनेत गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता.

Frequently Asked Questions -

Callable म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी असलेल्या ठेवींचे व्याजदर. यात सामान्य ठेवीदारांसाठी ७.०५% व्याजदर आहे. आणि जेष्ठ नागरिकांसाठी ७.५५% व्याजदर आहे. फक्त हा वाढीव व्याजदर भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मिळतो. अनिवासी भारतीय असलेल्या जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांचाच व्याजदर लागू होतो म्हणजे ७.०५%. 

नॉन Callable म्हणजे मुदतीपूर्वी खातं बंद करण्याची परवानगी नसलेल्या ठेवींचे व्याजदर. यात सामान्य ठेवीदारांसाठी ७.३०% व्याजदर आहे. आणि जेष्ठ नागरिकांसाठी ७.८०% व्याजदर आहे. इथेसुद्धा हा वाढीव व्याजदर भारतीय नागरिक असलेल्या आणि भारतात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मिळतो. अनिवासी भारतीय असलेल्या जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांचाच व्याजदर लागू होतो म्हणजे ७.३०%.

योजनेत केलेली गुंतवणूक आणि मिळणार व्याज दोन्ही करपात्र आहे तसेच  टीडीएस सुद्धा कापला जातो. सामान्य ठेवीदारांसाठी ४०००० रु आणि जेष्ठ नागरिकांसाठी ५०००० रु  च्या वर व्याजाची वार्षिक रक्कम गेली तर टीडीएस कापला जातो. 

टीडीएस कपात टाळायची असेल फॉर्म १५ जी आणि १५ एच भरून बँकेत द्यावा लागतो.

बडोदा तिरंगा प्लस योजनेत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. ठेवीवर कर्ज काढायचं असल्यास जमा रकमेच्या ९५% पर्यंत रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते आणि त्यावर लागू होणार व्याजदर बँकेच्या नियमाप्रमाणे आकारला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top