Changes in PPF Scheme Extension Rules in marathi । पीपीएफ योजनेच्या मुदतवाढीच्या नियमांमध्ये बदल

Changes in PPF Scheme Extension Rules

Changes in PPF Scheme Extension Rules - मंडळी, काही दिवसांपूर्वी टपाल खात्याकडून पोस्टाच्या काही योजनांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. त्यामध्ये पोस्टाच्या पीपीएफ योजनेच्या नियमांमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आले. हे बदल प्रामुख्याने मुदत पूर्ण होण्यापूर्वी खातं बंद केलं तर लागू होणार आहेत.

आज आपण बघणार आहोत पोस्टाच्या पीपीएफ योजनेमध्ये नेमके काय काय बदल करण्यात आले आहेत.

मंडळी, आत्ताच आपण बघितलं कि पीपीएफ योजनेतले हे बदल मुदत पूर्व खातं बंद केलं तर लागू होणाऱ्या नियमांमध्ये (Changes in PPF Scheme Extension Rules) झाले आहेत. हे बदल काय आहेत हे समजून घेण्यासाठी आधी आपण पोस्टाच्या पीपीएफ योजनेत मुदत पूर्व खातं बंद केलं तर काय नियम आहेत हे बघणार आहोत आणि ते बघतानाच झालेले बदल समजून घेणार आहोत.

आता आपण बघूया पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा पीपीएफ योजनेच्या नियमांमध्ये झालेले बदल.

पीपीएफ योजनेच्या मुदतवाढीच्या नियमांमध्ये बदल (Changes in PPF Scheme Extension Rules)

पीपीएफ योजनेत मुदतपूर्व खातं फक्त तीन कारणासाठी बंद करता येतं.

तर मंडळी, जर खातेदाराने या तीन कारणांसाठी खातं मुदत पूर्ण होण्याआधी बंद केलं तर त्याचा व्याजदरावर काय फरक पडेल यासंबंधी हा नवीन बदल (Changes in PPF Scheme Extension Rules) करण्यात आला आहे.

थोडक्यात, जुन्या नियमाप्रमाणे वाढीव मुदतीत मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर पहिली मुदतवाढ घेतल्याच्या तारखेपासून खातं बंद केल्याच्या तारखेपर्यंत व्याजदर १% कमी दराने लागू होत होता. मात्र नवीन नियमाप्रमाणे संबंधित मुदतवाढ घेतल्याच्या तारखेपासून खातं बंद केल्याच्या तारखेपर्यंत व्याजदर १% कमी दराने लागू होईल.

हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. त्यासाठी आपण जुना आणि नवा नियम यांची तुलना करू.

खातेदाराने पहिली १५ वर्ष पूर्ण झाल्यावर पहिली ५ वर्षांची मुदतवाढ घेतली. मात्र खातं मुदतवाढीनंतर ३ वर्षांनी बंद केलं तर त्याला मुदतवाढीच्या ३ वर्षांसाठी त्याला १% व्याजदर कमी मिळेल. म्हणजे योजनेचा व्याजदर ७% असेल तर तो ६% मिळेल. इथं नियमात बदल झालेला नाही.

खरा बदल आहे तो २ ऱ्या मुदतवाढीपासून. समजा खातेदाराने मुदतवाढीची पहिली ५ वर्ष पूर्ण करून दुसरी मुदतवाढ घेतली पण खात त्या २ ऱ्या मुदतवाढीच्या २ वर्षांनंतर बंद केलं तर खातेदाराला जुन्या नियमाप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही मुदतवाढीच्या कालावधीसाठी १% कमी व्याजदर मिळाला असता.
मात्र आता नवीन नियमाप्रमाणे जर दुसऱ्या मुदतवाढीपासून पुढे कधीही मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर फक्त तेवढ्याच मुदतवाढीचा कालावधीसाठी १% कमी व्याजदर लागू होईल.

तर मंडळी, हा होता पीपीएफ योजनेसंदर्भात झालेला नवीन बदल (Changes in PPF Scheme Extension Rules).

तर मंडळी हे होते पीपीएफ खातं मुदत पूर्ण होण्याआधी बंद केल्यास त्यावर लागू होणाऱ्या नियमांमध्ये झालेले बदल (Changes in PPF Scheme Extension Rules). आपल्याला ही माहिती योग्य वाटली असेल तर कृपया आपल्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याची माहिती होईल धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top