फॉर्म १५जी आणि १५एच । Form 15G and 15H

Form 15G

मंडळी आज आपण Form 15G आणि 15H या दोन प्रकारच्या फॉर्मची माहिती घेणार आहोत. हे दोन प्रकारचे अर्ज किंवा फॉर्म आपल्याला टीडीएस कापला जाऊ नये म्हणून बँकेत द्यावे लागतात. हे एक प्रकारची घोषणा किंवा डिक्लेरेशन असतं म्हणजे आपण ही माहिती बँकेला देतो.

ठेवीदाराचं किंवा खातेदाराचं उत्पन्न करपात्र आहे कि नाही हे बँकेला किंवा संबंधित संस्थेला जिथे ठेवीदार पैसे गुंतवतो माहित नसत. त्यामुळे जर ठेवीदाराचं उत्पन्न करपात्र नसेल तर ठेवीदारांनी स्वतः बँकेला किंवा संबंधित संस्थेला हे सांगावं लागत कि त्यांचं उत्पन्न करपात्र होत नाही.

आपण बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुदत ठेव, आवर्ती ठेव किंवा इतर बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतो त्यावर आपल्याला व्याज मिळतं. हे आपलं एक प्रकारचं उत्पन्न आहे. आता उत्पन्न आहे म्हटल्यावर त्यावर आयकर आकारला जाणं स्वाभाविक आहे खासकरून जेव्हा जर तुमचं उत्पन्न करपात्र असेल तर नक्की आयकर द्यावा लागतो.

बँकांना आयकर विभागानी सूचना दिलेली असते कि ज्या खात्यात एकूण मिळून व्याजाचे पैसे ४०००० रुपयांपेक्षा जास्त होतील त्यावर १०% टीडीएस कापला जावा आणि जर ठेवीदारांनी पॅनकार्ड दिलं नसेल तर २०% टीडीएस कापला जावा.

पण जर ठेवीदार जेष्ठ नागरिक असेल तर व्याजाची रक्कम ४०००० ऐवजी ५०००० रुपयांपेक्षा जास्त होईल तेव्हा टीडीएस कापला जावा.

फॉर्म १५ जी आणि १५ एच कधी भरावा लागतो? (When Form 15G and 15H need to be filed?)

आता असं समजा कि तुमचं ठेवीवर व्याज ४०००० रुपयांपेक्षा जास्त होत असेल किंवा तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर ५०००० हजार रुपयांपेक्षा जास्त होत असेल आणि तुमचं इतर उत्पन्न करपात्र नसेल तरीही टीडीएस कापला जातो आणि हे पैसे तुम्ही आयकर रिटर्न भरेपर्यंत आयकर विभागाकडेच राहतात. त्यामुळे त्या टीडीएस च्या पैशाचा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही.

म्हणूनच ही गोष्ट टाळण्यासाठी तुम्हाला Form 15G आणि 15H भरावा लागतो. ज्यात ठेवीदार हे लिहून देतो कि माझं उत्पन्न करपात्र नाही त्यामुळे माझ्या खात्यातील व्याजाच्या रकमेवर टीडीएस कापला जाऊ नये. हा फॉर्म आपल्याला बँकेत किंवा जिथे आपण ठेवी ठेवल्या आहेत तिथे द्यायचा असतो.

फॉर्म १५ जी आणि १५ एच साठी पात्रतेचे निकष? (Eligibility criteria for Form 15G and 15H?)

फॉर्म १५ जी हा सामान्य नागरिकांसाठी असतो म्हंजे ज्यांचं वय ६० पेक्षा कमी आहे आणि फॉर्म १५ एच हा फॉर्म जेष्ठ नागरिकांसाठी असतो म्हंजे ज्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी फॉर्म १५ एच आणि सामान्य नागरिकांनी फॉर्म १५ जी भरला तर त्याच्या खात्यातून टीडीएस कापला जाणार नाही.

मंडळी इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कि जर तुमचं ठेवींवरील व्याज नियोजित मर्यादेपेक्षा म्हणजे सामान्य नागरिकांसाठी ४० हजार आणि जेष्ठ नागरिकांसाठी ५० हजार पेक्षा जास्त होत असेल अनेकदा बॅकेकडूनच Form 15G किंवा 15H भरण्यासाठी फोन येतो पण तसं न झाल्यास खातेदारांनी किंवा ठेवीदारानी स्वतः बँकेत जाऊन Form 15G किंवा 15H द्यावा कारण बँकेला खातेदारांचं किंवा ठेवीदाराचं उत्पन्न करपात्र आहे का हे माहित नसतं त्यामुळे बँक टीडीएस कापते. म्हणून खातेदारांनी किंवा ठेवीदारानी स्वतः बँकेत जाऊन Form 15G किंवा 15H द्यावा म्हणजे टीडीएस कपात टाळता येईल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top