Gram Santosh scheme | ग्राम संतोष योजना

नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसची एक विमा योजना जी ग्रामीण डाक विमा योजनेच्या (Rural postal life insurance) अंतर्गत येते आणि तिचं नाव आहे ग्राम संतोष योजना (Gram Santosh scheme) जी एन्डोमेन्ट अशुरन्स (Endowment Assurance) या नावाने सुद्धा ओळखली जाते. ही योजना खास ग्रामीण भागातील लोकांसाठी तयार केलेली आहे.

आज आपण या योजनेची वैशिष्ट्य, फायदे आणि इतर काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तसंच या योजनेला लागणारं प्रीमियम किती आहे, योजनेची मुदत किती वर्षांची घेऊ शकतो त्याचा परतावा किती मिळेल ते पण पाहणार आहोत.

Gram Santosh Scheme

तर सगळ्यात आधी आपण या योजनेची काही वैशिष्ट्ये बघूया.

या योजनेअंतर्गत विमा घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय १९ ते ५५ च्या दरम्यान असलं पाहिजे. १९ वर्षापेक्षा कमी किंवा ५५ वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती या योजनेत विमा घेऊ शकत नाही.

ग्राम संतोष योजना गुंतवणुकीची मर्यादा (Gram Santosh scheme investment limit)

या योजनेत आपण कमीतकमी १० हजार रु आणि जास्तीत जास्त दहा लाखा रुपयांपर्यंत रकमेचा विमा घेऊ शकतो. मात्र, १० हजार रु पेक्षा कमी आणि १० लाख रु पेक्षा जास्त रकमेचा विमा आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकत नाही.

ग्राम संतोष योजना मुदत (Gram Santosh scheme term)

या योजनेची मुदत आपण विमा खरेदी केल्यापासून वयाच्या ३५ वर्षापर्यंत, ४० वर्षापर्यंत, ४५ वर्षापर्यंत, ५० वर्षापर्यंत, ५५ वर्षापर्यंत, ५८ वर्षापर्यंत, ६० वर्षापर्यंत घेऊ शकतो आपण जेवढ्या वर्षांची विम्याची मुदत ठेवाल तेवढे वर्ष आपल्याला त्याचा हप्ता भरावा लागेल मग हा हप्ता आपण दरमहा, दर तिमाहीला, दर सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा असं भरू शकता.

ग्राम संतोष योजना कर्जाची सुविधा (Gram Santosh scheme loan facility)

या योजनेत विमा घेणाऱ्याला त्यावर कर्ज सुद्धा मिळतं मात्र त्यासाठी पहिली तीन वर्षे पूर्ण व्हायला लागतात, त्यानंतर आपण कर्ज मिळण्यास पात्र ठरू शकतो.

ग्राम संतोष योजना मुदतपूर्व खातं बंद करणे (Gram Santosh scheme premature withdrawal)

या योजनेत विमा घेणाऱ्याला पॉलिसी काही कारणांनी बंद करायची असेल तर कमीत कमी तीन वर्षानंतर आपण ती बंद करू शकतो. मात्र त्याबाबतीत आपल्याला बोनस मिळणार नाही. पण आपण हीच पॉलिसी पाच वर्षे पूर्ण झाल्यावर बंद केलीत तर आपल्याला त्याच्यावर बोनस सुद्धा मिळू शकतो. मुदतपूर्ती आधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना म्हणजे ज्यांची नाव विमा घेताना वारस म्हणून नोंदवलेली असतील त्यांना विम्याची संपूर्ण रक्कम आणि त्यावेळेपर्यंत जमा झालेला बोनस एवढी रक्कम मिळेल.

ग्राम संतोष योजना बोनस (Gram Santosh scheme bonus)

या योजनेचा चालू बोनस दर हजार रुपया वरती ४८ रुपये एवढा आहे त्यामुळे जर आपण एक लाखाचा विमा घेतला तर आपल्याला वार्षिक ४८०० रु बोनस म्हणून मिळतील.

ही होती योजनेची प्राथमिक माहिती आता आपण बघूया की आपण कितव्या वर्षी विमा घेतला तर आपल्याला त्याचा प्रीमियम म्हणजे हप्ता किती पडेल, बोनस किती मिळेल आणि मुदतपूर्तीनंतर एकूण परतावा किती मिळेल.

ग्राम संतोष योजना आकडेमोड (Gram Santosh scheme calculator)

तर आपण अस समजूया कि विमाधारकाचं वय २५ वर्षे आहे. विम्याची रक्कम एक लाख रु आहे. बोनसचा दर प्रति एक हजारा रु वर ४८ रु आहे. या हिशोबाने एक लाखाच्या रकमेवर आपल्याला दरवर्षी ४८०० रु बोनस मिळेल. तसच प्रीमियम वर आपल्याला जी एस टी साडेचार टक्के आहे. 


व्यक्तीचे वय

विमा रक्कम

बोनसचा दर

वार्षिक बोनस

जीएसटी

२५

१,००,०००

४८

४८००

४.५

तर आता वरील माहिती प्रमांणे आपण खालील तक्त्यामध्ये बघू शकता आपल्याला किती कालावधीसाठी किती हप्ता पडेल, बोनस किती मिळेल आणि मुदतीअंती परतावा किती मिळेल.  


परिपक्वता वय

मुदत

हप्ता (दरमहा)

एकूण बोनस

परतावा

३५

१०

८७३

४८०००

१४८०००

४०

१५

५६४

७२०००

१७२०००

४५

२०

४०८

९६०००

१९६०००

५०

२५

३१९

१२००००

२२००००

५५

३०

२५६

१४४०००

२४४०००

५८

३३

२३०

१५८४००

२५८४००

६०

३५

२१४

१६८०००

२६८०००

तर मंडळी आपण बघितलत कि ग्रामीण डाक आयुर्विम्याची (Rural postal life insurance) ग्राम संतोष (Gram santosh) ही योजना कशाप्रकारे आपल्याला फायदेशीर ठरू शकते. यात एक गोष्ट अजून दिसून येते ती म्हणजे आपण गुंतवणूक जेवढी लवकर सुरु करू आणि दीर्घ मुदतीसाठी करू तेवढा हप्ता कमी बसतो आणि परतावा जास्त मिळतो.

तेव्हा आपण ग्रामीण डाक आयुर्विम्याच्या (Rural postal life insurance) ग्राम संतोष (Gram Santosh scheme) या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top