Gram Sumangal Scheme | ग्राम सुमंगल योजना 2023

Gram Sumangal Scheme

आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक आयुर्विम्याच्या एका मनी बॅक पॉलिसी ची माहिती जिचं नाव आहे ग्राम सुमंगल (Gram Sumangal Scheme). या योजनेला Anticipated Endowment Assurance पॉलिसी या नावाने सुद्धा ओळखलं जात.

या पॉलिसी च वैशिष्टयं म्हणजे विमाधारकाला पॉलिसीच्या कालावधी दरम्यान ठराविक अंतराने पैसे मिळत राहतात ज्याला सर्वायवल बेनिफिट (Survival Benefit) असं म्हणतात आणि पॉलिसी ची मुदत संपली कि विमाधारकाला उरलेली रक्कम बोनस बरोबर परत मिळते.

तसेच दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाला तर विमाधारकाच्या नॉमिनीला विम्याची संपूर्ण रक्कम जमा बोनससह परत दिली जाते. अशा वेळी पूर्वी सर्वायवल बेनिफिट (Survival Benefit) म्हणून दिलेल्या रकमेचा विचार केला जात नाही.

ही योजना खास ग्रामीण भागातील लोकांसाठी तयार केलेली आहे म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पण तुम्ही शहरात राहत असला आणि तुमचा पत्याचा पुरावा असलेल्या कागदपत्रांवर ग्रामीण भागातला पत्ता असला तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरता.

ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी विमाधारकाचं वय कमीत कमी १९ वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्ष असावं लागतं. १९ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकत नाही.

ग्राम सुमंगल योजनेची गुंतवणुकीची मर्यादा (Gram Sumangal Scheme Sum Assured)

या योजनेत आपण कमीतकमी १०००० रु आणि जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत रकमेचा विमा घेऊ शकतो. १०००० रु पेक्षा कमी आणि १० लाख रु पेक्षा जास्त रकमेचा विमा आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकत नाही.

ग्राम सुमंगल योजना मुदत आणि बोनस (Gram Sumangal Scheme Term and Bonus)

या योजनेत पॉलिसीच्या मुदतीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. १५ वर्ष आणि २० वर्ष.

ग्राम सुमंगल योजना १५ वर्षांची मुदत

जर तुम्ही १५ वर्षांची मुदत घेतली तर पॉलिसी घेऊन ६ वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या २०% रक्कम तुम्हाला परत मिळते. पॉलिसी घेऊन ९ वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या अजून २०% रक्कम तुम्हाला परत मिळते. पॉलिसी घेऊन १२ वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या अजून २०% रक्कम तुम्हाला परत मिळते.

मुदत - १५ वर्ष

विम्याची रक्कम - १ लाख

६ वर्षांनंतर 

२०%

२०,०००

९ वर्षांनंतर 

२०%

२०,०००

१२ वर्षांनंतर 

२०%

२०,०००

१५ वर्षांनंतर 

४०%

४०,००० + बोनस 

पॉलिसी घेऊन १५ वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे मुदत संपल्यावर पॉलिसीच्या रकमेतील उरलेली ४०% रक्कम बोनससह तुम्हाला परत मिळते.
उदा. जर तुम्ही १ लाखाची पॉलिसी घेतली असेल तर
६ वर्षांनी २० हजार
९ वर्षांनी २० हजार
१२ वर्षांनी २० हजार
अशा प्रकारे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान तुम्हाला ६० हजार रुपये परत मिळालेले असतील.
आणि १५ वर्षांनी म्हणजे मुदत संपल्यावर उरलेले ४० हजार + बोनस ची रक्कम परत मिळेल.

या योजनेत चालू बोनसचा दर वर्षी प्रत्येक हजार रुपयांमागे ४५ रुपये एवढा आहे. त्यामुळे १ लाखाच्या पॉलिसीवर दर वर्षी ४५०० एवढा बोनस होईल. त्यामुळे १५ वर्षांनी एकूण बोनसची रक्कम ६७५०० रु होईल. पण बोनसच दर कायम एवढाच राहील याची खात्री नसते तो वेळोवेळी बदलू पण शकतो.

ग्राम सुमंगल योजना २० वर्षांची मुदत

जर तुम्ही २० वर्षांची मुदत घेतली तर पॉलिसी घेऊन ८ वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या २०% रक्कम तुम्हाला परत मिळते. पॉलिसी घेऊन १२ वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या अजून २०% रक्कम तुम्हाला परत मिळते. पॉलिसी घेऊन १६ वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसीच्या रकमेच्या अजून २०% रक्कम तुम्हाला परत मिळते.

मुदत - २० वर्ष

विम्याची रक्कम - १ लाख

८ वर्षांनंतर 

२०%

२०,०००

१२ वर्षांनंतर 

२०%

२०,०००

१६ वर्षांनंतर 

२०%

२०,०००

२० वर्षांनंतर 

४०%

४०,००० + बोनस 

आणि पॉलिसी घेऊन २० वर्ष पूर्ण झाल्यावर म्हणजे मुदत संपल्यावर पॉलिसीच्या रकमेतील उरलेली ४०% रक्कम बोनससह तुम्हाला परत मिळते.
उदा. जर तुम्ही १ लाखाची पॉलिसी घेतली असेल तर
८ वर्षांनी २० हजार
१२ वर्षांनी २० हजार
१६ वर्षांनी २० हजार
अशा प्रकारे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान तुम्हाला ६० हजार रुपये परत मिळालेले असतील.
आणि २० वर्षांनी म्हणजे मुदत संपल्यावर उरलेले ४० हजार + बोनस ची रक्कम परत मिळेल.

ग्राम सुमंगल योजना वैद्यकीय चाचणी (Gram Sumangal Scheme Medical Test)

या पॉलिसीसाठी वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. मात्र जर तुमच्या पॉलिसीची रक्कम 25 हजारापेक्षा कमी असेल तर वैद्यकीय चाचणीची गरज पडत नाही.

तर मंडळी ही होती योजनेची प्राथमिक माहिती. तुम्हाला कितव्या वर्षी विमा घेतला तर त्याचा प्रीमियम म्हणजे हप्ता किती पडेल, बोनस किती मिळेल आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर एकूण परतावा किती मिळेल हे जाणून द्यायचं असेल हा व्हिडिओ बघा म्हणजे ही माहिती आपल्याला नीट लक्षात येईल.

ग्राम सुमंगल योजना आकडेमोड (Gram Sumangal Scheme Calculator)

ग्राम सुमंगल योजना डेथ बेनिफिट (Gram Sumangal Scheme Death Benefit)

या योजनेत डेथ बेनिफिट सुद्धा दिल जात. म्हणजे विमाधारकाचा मृत्यू विम्याची मुदत पूर्ण होण्याआधी झाला तर विम्याची रक्कम म्हणजे आपल्या उदाहरणानुसार 1 लाख रुपये + त्या वेळेपर्यंत मिळालेला बोनस एवढी रक्कम विमाधारकाच्या नॉमिनीला मिळते.

ग्राम सुमंगल योजना आयकरात सूट (Gram Sumangal Scheme Tax Benefit)

या योजनेत आयकरात सूट सुद्धा मिळते. आयकर कलम 80सी नुसार दीड लाखाच्या गुंतवणुकीपर्यंत सूट आहे. म्हणजे तुम्ही जेवढी रक्कम वर्षाला विम्याचा हप्ता म्हणून भरता त्या रकमेवर जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत सूट मिळते. तसंच विमाधारकाचा मृत्यू नंतर नॉमिनीला मिळालेली रक्कम सुद्धा करमुक्त आहे.

ही पॉलिसी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन घेऊ शकता किंवा पोस्टच्या एजेंट कडून घेऊ शकता किंवा पोस्टाच्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन सुद्धा घेऊ शकता.

तर आज आपण बघितली ग्रामीण डाक आयुर्विम्याची ग्राम सुमंगल (Gram Sumangal Scheme) या योजनेची माहिती. आपण या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top