क्रेडिट स्कोअर वाढवायचे 8 उपाय? । How to increase CIBIL Score

How to increase CIBIL Score

मंडळी, आज आपण बघणार आहोत क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? (How to increase CIBIL Score?).

कर्ज काढणे हा हल्ली आपल्या आयुष्याचा एक आवश्यक घटक झाला आहे. दुचाकी घ्यायची असेल तर आपण कर्ज घेतो, घर घ्यायचं असेल तर आपण कर्ज घेतो, चारचाकी घेताना सुद्धा आपण कर्ज घेतो कारण हल्ली, कर्ज मिळणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय.

पूर्वी आपल्याला कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या चकरा माराव्या लागत पण आता बॅंकाच कर्ज घ्या म्हणून कंटाळा येईपर्यंत फोन करतात. पण आता असं काय झालंय कि बँका कर्ज द्यायला एवढ्या उतावीळ होतात. याच एक प्रमुख कारण आहे क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर.

पण क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा (How to increase CIBIL Score) हे बघण्याआधी आपण बघूया क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?

आपण जे आर्थिक व्यवहार करतो खासकरून कर्ज घेणे आणि फेडणे हा जो प्रकार आहे त्याच्या सगळ्या व्यवहारांची एक संस्था नोंद ठेवते त्या संस्थेचं नाव आहे सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉरमेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही संस्था आपल्या क्रेडिट कार्ड आणि कर्जांसह कंपन्यांच्या तसेच व्यक्तींच्या सर्व क्रेडिट-संबंधित व्यवहारांच्या नोंदी ठेवते. खरंतर ही माहिती या संस्थेला बँकाच देत असतात आणि त्याच माहिती आणि नोंदींच्या आधारे, CIBIL ही संस्था, अर्जदार आणि बँका किंवा इतर वित्तीय संस्थांना हा क्रेडिट स्कोअर देते. या क्रेडिट स्कोअरमुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांना हे कळतं कि ठराविक व्यक्ती किंवा कंपनी कर्ज मिळण्यास पात्र आहेत कि नाही.

हा क्रेडिट स्कोअर ३०० ते ९०० अंकांदरम्यान मोजला जातो म्हणजे किमान ३०० आणि जास्तीत जास्त ९०० असू शकते. क्रेडिट स्कोअर जेवढा जास्त, तेवढं कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता जास्त असते.

पण मंडळी, हा स्कोअर वाढतो कसा (How to increase CIBIL Score) किंवा कमी कसा होतो याची काही कारणं आहेत. ही कारण आपण नीट समजून घेतली तर आपण हा स्कोअर वाढवू शकतो आणि आपल्याला भविष्यात कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणं सोपं जाउ शकतं.

आता आपण बघूया हा क्रेडिट स्कोअर वाढवायचा कसा (How to increase CIBIL Score) आणि कमी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? । How to increase CIBIL Score

Credit Card

तर मंडळी आज आपण बघितलं क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा (How to increase CIBIL Score) आणि पहिले काही मुद्दे जे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यास किंवा कमी करण्यास कारणीभूत ठरतात. या मुद्यांचं नक्की पालन करा म्हणजे भविष्यात तुम्हाला कर्ज या प्रकारासंबंधी कधीच अडचण येणार नाही. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top