किसान विकास पत्र 2023 । Kisan Vikas Patra in marathi

Kisan Vikas Patra

मंडळी, किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही भारत सरकारची एक प्रचलित योजना आहे जी पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना सुरुवातीला फक्त शेतकरी बांधवांसाठी सुरु करण्यात आली होती म्हणून योजनेचं नाव किसान विकास पत्र ठेवण्यात आलं होतं. मात्र नंतर ही योजना सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली करण्यात आली.

किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) या योजनेत ठेवीदाराला एक ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागते. मात्र या योजनेची मुदत निश्चित नसते. या योजनेत गुंतवलेली रक्कम जेव्हा दुप्पट होते तेव्हा योजनेची मुदत संपते. म्हणूनच या योजनेला पोस्टाची पैसे दुप्पट करणारी योजना (Post Office Scheme to Double the Money) असंही म्हणतात. जसा व्याजदर बदलेल तशी ही मुदत सुद्धा बदलत जाते. व्याजदर कमी झाला कि मुदत वाढते आणि व्याजदर वाढला कि मुदत कमी होते.

किसान विकास पत्र योजनेसाठी ठेवींचे नियम (Kisan Vikas Patra Deposit Rules)

किसान विकास पत्र मुदतपूर्तीनंतर (Pledging of Kisan Vikas Patra After Maturity)

किसान विकास पत्र मुदतपूर्तीनंतर खात्याचे तारण (Pledging of Kisan Vikas Patra)

मंडळी, किसान विकास पत्र गरज पडल्यास तारण ठेऊन त्यावर ठेवीदाराला कर्ज काढता येतं. तसंच कर्ज मिळवण्यासाठी हे खातं कधी कधी कर्ज देणाऱ्याच्या नावावर हस्तांतरित सुद्धा केलं जाऊ शकत.
त्यासाठी ठेवीदाराला आधी कर्ज देणार्याकडून तशी सहमती असल्याचं पत्र आणावं लागतं आणि मग संबंधित अर्जासोबत पुरावा म्हणून जोडावं लागतं.

तसंच, ही ठेव फक्त खालील व्यक्ती किंवा संस्थांकडेच तारण ठेवता येते किंवा सुरक्षेच्या कारणासाठी तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येते.
यामध्ये
भारताचे राष्ट्रपती/राज्याचे राज्यपाल.
रिझर्व बँक / शेड्युल्ड बँक / सहकारी संस्था / बँक.
सार्वजनिक/खाजगी/सरकारी कंपनी/स्थानिक प्राधिकरण.
गृहनिर्माण वित्त कंपनी इत्यादींचा समावेश होतो.

किसान विकास पत्र खाते मुदतपूर्व बंद करणे (Kisan Vikas Patra Premature Withdrawal)

मंडळी, या योजनेत खालील अटी वगळता मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करता येत नाही

खातं अडीच वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केलं तर त्या खात्यावर बचत खात्याचा व्याजदर मिळतो.
खातं अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद केलं तर योजनेचा चालू व्याजदर आणि कालावधी यांची आकडेमोड करून जी व्याजाची रक्कम असेल ती मूळ रकमेबरोबर दिली जाईल.

किसान विकास पत्र खात्याचे हस्तांतरण (Kisan Vikas Patra Transfer of Account)

या योजनेत खालील अटींवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खातं हस्तांतरित केले जाऊ शकते.

किसान विकास पत्र खात्यावर मृत्यू लाभ (Death Benefit on Kisan Vikas Patra)

किसान विकास पत्र व्याजदर (Kisan Vikas Patra Interest Rates)

किसान विकास पत्र आयकरात सूट (Kisan Vikas Patra Tax Benefit)

मंडळी, या योजनेत कुठल्याही प्रकारे आयकरात सूट मिळत नाही. योजनेतील ठेवीची रक्कम आणि त्यावर मिळणार व्याज दोन्ही करपात्र आहे.

किसान विकास पत्र कागदपत्रं (Kisan Vikas Patra Documents)

किसान विकास पत्र योजनेत खातं चालू करण्यासाठी

ही कागदपत्र द्यावी लागतील.

तर मंडळी ही होती किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) या योजनेची माहिती. या योजनेत खात उघडण्यासाठी तुम्ही पोस्टात जाऊ शकता किंवा काही बँकांमध्ये उदा. युनियन बँक, बँक ऑफ बरोडा, ऍक्सिस बँक अशा बँकांमध्येसुद्धा खातं उघडता येतं. तेव्हा याचा लाभ नक्की घ्या. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top