Lek Ladki Yojana | लेक लाडकी योजना 2023

नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत लेक लाडकी (Lek Ladki Yojana) या योजनेबद्दल जो नवीन अपडेट आला आहे त्याबद्दल माहिती. लेक लाडकी योजनेची घोषणा मार्च २०२३ मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती आणि आता ही योजना लवकरच सुरु होणार आहे.

लेक लाडकी ही योजना खास मुलींसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या अर्थसंकल्पात घोषित केली होती ज्यानुसार मुलीच्या जन्मापासून मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या खात्यावर एक लाख एक हजार रुपये रक्कम राज्य सरकार तर्फे जमा केली जाणार आहे.

१० ऑक्टोबर २०२३ या दिवशी पार पडलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेबाबत एक नवीन अपडेट आला आहे त्यानुसार ही योजना आता लवकरच सुरू होणार आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी मुलीला एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम ठराविक अंतराने या योजनेअंतर्गत मिळत जाणार आहे. तर आता आपण बघूया लेक लाडकी (Lek Ladki Yojana) या योजनेत जो अपडेट आला आहे तो नेमका काय आहे.

मंडळी, लेक लाडकी या योजनेची घोषणा मार्च २०२३ मध्ये सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत मुलींसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक ईयत्ता पूर्ण झाल्यावर शासनातर्फे काही आर्थिक स्वरूपात अनुदान देण्यात येईल म्हणजे काही रक्कम देण्यात येईल अशीही घोषणा केली होती.

नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लेक लाडकी या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे ज्यानुसार ही योजना लवकरच चालू होणार आहे आणि या योजनेतील लाभार्थी मुलींना एक लाखापेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे.

Lek Ladki Yojana

आज आपण बघणार आहोत कि लेक लाडकी या योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने काय निर्णय घेतला आहे? या योजनेअंतर्गत कुणाला रक्कम मिळणार आहे किंवा योजनेत लाभार्थी होण्यासाठीची पात्रता काय असेल?

मंडळी ही बैठक १० ऑक्टोबर २०२३ या दिवशी घेण्यात आली ज्यात असा निर्णय घेण्यात आला कि

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय १० ऑक्टोबर २०२३ या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे होते.

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक असलेल्या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, मुलगी ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये आणि मुलीच्या वयाची १८ वषे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रीतीने एकूण त्या मुलीला १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.

तसंच नवीन निर्णयानुसार माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी लेक लाडकी ही योजना राबवण्यात येईल.

लेक लाडकी योजनेचा हेतू (Purpose of Lek Ladki Yojana)

ही योजना मुलींसाठी चालू करण्यामागे शासनाचा नेमका हेतू काय आहे तो आता आपण बघूया.

यासाठी ही योजना राबवण्यात येईल असं महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.

लेक लाडकी योजना पात्रता (Lek Ladki Yojana eligibility)

१ एप्रिल २०२३ नंतर पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या १ किंवा २ मुलींना त्याचप्रमाणे १ मुलगा आणि १ मुलगी असल्यास त्यातल्या मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास ज्यामध्ये १ मुलगा आणि १ मुलगी जन्माला आली तर त्यातल्या मुलीला या योजनेचा लाभ मिळेल आणि जर दोन्ही जुळ्या मुली जन्माला आल्या तर दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मुलगी १ एप्रिल नंतर जन्माला आली आहे हे दाखवण्यासाठी मुलीचा जन्माचा दाखल आवश्यक असेल.

मात्र हा लाभ मिळवण्यासाठी आई किंवा वडिलांनी जास्तीत जास्त दुसऱ्या प्रसूतीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक असेल आणि तशी शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट संबंधित ठिकाणी पुरावा म्हणून जमा करावं लागेल.

मंडळी ही गोष्ट शासनाने स्पष्ट केलेली आहे की ज्या मुली १ एप्रिल 2023 पासून किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या आहेत त्यांना लेक लाडकी या योजनेचा लाभ मिळू शकतो

थोडक्यात सांगायचं झालं तर याआधी जी माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना होती त्याचे काही नियम या योजनेला लागू होण्याची शक्यता आहे.

यात योजनेसाठी पात्रतेचा अजून एक नियम म्हणजे अर्ज करणाऱ्या कुटुंबाचं उत्पन्न जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंत असलं पाहिजे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर मात्र संबंधित कुटुंबातील मुलींसाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसंच संबंधित कुटुंबाच वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त १ लाख पर्यंत असल्याचं प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून सादर करावा लागेल.

इथं एक महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणारा जो निधी आहे तो आधार नियंत्रित असणार आहे. म्हणजे तुमच्या आधार क्रमांकाशी तुमचं जे बचत खातं जोडलेलं असेल त्या बचत खात्यातचं या योजनेची रक्कम वेळोवेळी जमा करण्यात येईल.

मंडळी, ही योजना आता सुरु करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टीची तयारी करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे या योजनेसाठी नावनोंदणी करणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तसंच इतर आवश्यक गोष्टीची तरतूद करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेत नावनोंदणी करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात येणार आहे ज्यामुळे नावनोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईल.

लेक लाडकी योजनेचे अजून काही नियम असतील किंवा काही माहिती असेल तर ती लवकरच शासनातर्फे जाहीर केली जाइल. ती माहिती आम्हाला मिळाली कि आम्ही ती माहितीसुद्धा आपल्यापर्यंत लगेच पोचवूच.

Frequently Asked Questions -

लेक लाडकी या योजनेची घोषणा मार्च २०२३ मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

या बाबतीत अजून शासनाकडून निर्णय झालेला नाही.

अजून पर्यंत लेक लाडकी (Lek Ladki) योजनेची वेबसाईट उपलब्ध नाही

लेक लाडकी (Lek Ladki Yojana) योजना सध्यातरी फक्त महाराष्ट्र राज्यात उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top