महिला सम्मान बचत पत्र । Mahila Samman Bachat Patra in marathi

Mahila Samman Bachat Patra

नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत महिला सम्मान बचत पत्र (Mahila Samman Bachat Patra) या योजनेची माहिती. ही योजना भारत सरकारने खास महिलांसाठी सुरु केलेली आहे आणि या योजनेची घोषणा फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी केली होती आणि त्यानुसार १ एप्रिल २०२३ पासून ही योजना गुंतवणुकीसाठी खुली झालेली आहे.

आज आपण बघणार आहोत महिला सम्मान बचत पत्र (Mahila Samman Bachat Patra) या योजनेची संपूर्ण माहिती ज्यामध्ये योजनेची वैशिष्ट्ये, मुदत, व्याजदर किती आहे आणि त्यानुसार परतावा किती मिळेल, योजनेच्या काही अटी आणि आयकराविषयी माहिती.

सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता म्हणजे कोण या योजनेत खात उघडू शकतं.

महिला सम्मान बचत पत्र योजनेची पात्रता (Mahila Samman Bachat Patra Eligibility)

महिला सम्मान बचत पत्र योजनेची मुदत (Mahila Samman Bachat Patra Term)

महिला सम्मान बचत पत्र ठेवींचे नियम (Mahila Samman Bachat Patra Deposit Rules)

मंडळी,हा थोडासा वेगळा नियम आहे. तो आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया.
समजा एखाद्या महिला खातेदाराने
५ एप्रिल २०२३ रोजी या योजनेत ५०००० रु भरून खात उघडलं. आता ती व्यक्ती अजून दीड लाख रुपये या योजनेत गुंतवू शकते. पण त्या व्यक्तीकडे ५०००० रु च आहेत. मग ती व्यक्ती ५ एप्रिल नंतर ३ महिन्यांनी म्हणजे ५ जुलै २०२३ रोजी ५०००० रु भरून नवीन खात उघडू शकते. त्याआधी नाही.
समजा त्या व्यक्तीकडे अजून १ लाख रुपये जमा झाले. तर ५ जुलै नंतर ३ महिन्यांनी म्हणजे ५ ऑक्टोबर २०२३ रोजी ती व्यक्ती ते १ लाख रु या योजनेत गुंतवू शकते.

पहिलं खातं

५ एप्रिल २०२३

५०००० रु

दुसरं खातं

५ जुलै २०२३

५०००० रु

तिसरं खातं

५ ऑक्टोबर २०२३

१,००,००० रु

इथे २ गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

महिला सम्मान बचत पत्र ठेवींचे व्याजदर (Mahila Samman Bachat Patra Interest Rates)

महिला सम्मान बचत पत्र पैसे काढण्याचे नियम (Mahila Samman Bachat Patra Withdrawal Rules)

महिला सम्मान बचत पत्र मुदतपूर्तीनंतर (Mahila Samman Bachat Patra After Maturity)

महिला सम्मान बचत पत्र मुदतपूर्व खाते बंद करणे (Mahila Samman Bachat Patra Premature Withdrawal)

ठेवीदाराला काही कारणांनी खातं मुदतीपूर्वी बंद करायचं असेल तर त्यासाठी काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे -
१. खातेदाराच्या मृत्यू झाल्यास. ,
२. किंवा खातेदाराला काही असाध्य आजार जडल्यास ज्यामुळे त्यांना पैशाची गरज भासली तर.
३. किंवा अल्पवयीन खातेदाराच्या पालकांचा मृत्यू झाल्यामुळे खातं चालू ठेवणं शक्य नसेल तर खातं मुदतीपूर्वी बंद करता येईल.

आत्ता सांगितलेल्या नियमानुसार खातं मुदतीपूर्वी बंद केल्यास ठेवीवर नमूद केलेला व्याजदर मिळेल म्हणजे ७.५ टक्के.

मात्र, आत्ता सांगितलेल्या नियमाशिवाय इतर काही कारणांनी खात बंद करायचं असेल तर खाते उघडल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतरच खातं बंद करता येतं आणि अशा प्रकारे खातं बंद केल्यास मिळणारा व्याजदर नमूद केलेल्या व्याजदरापेक्षा दोन टक्क्यांनी कमी असेल म्हणजे चालू व्याजदर ७.५ टक्के आहे तर २ टक्क्यांनी कमी म्हणजे ५.५ टक्के व्याजदर मिळेल.

महिला सम्मान बचत पत्र आयकर विषयक माहिती (Mahila Samman Bachat Patra Information on Income Tax)

मंडळी, आयकरासंबंधात सरकारने ३ गोष्टींचं स्पष्टीकरण दिलं आहे.
पहिलं आहे टीडीएस संदर्भात. सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे कि या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कुठल्याही प्रकारे टीडीएस कापला जाणार नाही. याच कारणसुद्धा देण्यात आलं आहे कि या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक २ लाख आहे आणि व्याजदर ७.५% आहे. तेव्हा या दराने पहिल्या वर्षी १५ हजारपर्यत आणि दुसऱ्या वर्षी १७ हजारपर्यंत व्याज मिळेल आणि टीडीएसच्या नियमानुसार जर व्याजाची वार्षिक रक्कम ४० हजारपेक्षा जास्त झाली तरच टीडीएस कापला जातो. त्यामुळे या योजनेत टीडीएस कापला जाणार नाही.

दुसरं आहे या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम ८०सी नुसार दीड लाखपर्यंत आयकरात सूट मिळते. त्यामुळे याचा सुद्धा फायदा महिला गुंतवणूकदारांना मिळणार आहे. म्हणजे जरी तुम्ही २ लाख रुपये गुंतवणूक केली असली तरी त्यातल्या दीड लाख एवढ्या रकमेवर आयकरात वजावट मिळेल.

आणि तिसर स्पष्टीकरण आहे प्रत्यक्ष आयकरासंबंधी. यात असं सांगितलं आहे कि जरी टीडीएस कापला जात नसला तरी महिला ठेवीदारांना या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरावा लागणार आहे. जर ठेवीदारांचं उत्पन्न आणि योजनेतील व्याज यांची बेरीज केल्यानंतर येणारी रक्कम करपात्र ठरत असेल तरच आयकर भरावा लागेल अन्यथा आयकर भरावा लागणार नाही.

महिला सम्मान बचत पत्र योजनेची कागदपत्र (Mahila Samman Bachat Patra Documents)

या योजनेत खात उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड अनिवार्य आहेत.
तसंच, व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून खालील कागदपत्रे स्वीकारली जातील

पासपोर्ट
ड्रायव्हिंग लायसन्स
मतदार ओळखपत्र
नरेगाद्वारे जारी केलेले जॉब कार्ड
नावाचा आणि पत्याचा तपशील असलेले राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीद्वारे जारी केलेले पत्र

अल्पवयीन व्यक्तीसाठी जन्माचा दाखला आवश्यक असेल. तसंच अल्पवयीन मुलीच्या पालकासाठी वर सांगितलेली कागदपत्र द्यावी लागतील.

महिला सम्मान बचत पत्र परतावा (Mahila Samman Bachat Patra Calculator)

मुद्दल

परतावा

व्याज (२ वर्षांनी) 

१००००

११६०२

१६०२

५००००

५८०११

८०११

१०००००

११६०२२

१६०२२

१५००००

१७४०३३

२४०३३

२०००००

२३२०४४

३२०४४

तर मंडळी, ही होती महिला सम्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Bachat Patra) या योजनेची माहिती. या योजनेत खातं चालू करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये जाऊ शकता. ही योजना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नक्की उपलब्ध आहे. तेव्हा सर्व माता भगिनींनी जरूर या योजनेत गुंतवणुकीचा लाभ घ्या. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top