MSRTC Free Travel Scheme | MSRTC मोफत प्रवास योजना 2023

MSRTC Free Travel Scheme :- नमस्कार मंडळी, आपलं एसटी महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) आपल्या प्रवाश्यांसाठी अनेक योजना घेऊन येत असतं ज्यामुळे प्रवाश्यांना कधी तिकीट दरात सवलत मिळते तर कधी एखादी यात्रा विशेष सुविधांसह करता येते. खेडोपाडी पोचलेली ही आपली एसटी ही नुसती एसटी नसून जीवनवाहिनीच आहे.

एसटीतून केलेला प्रवास अतिशय सुरक्षित मानला जातो. कारण एकतर वेगावर नियंत्रण आणि चालक-वाहक ही जोडी विश्वासार्ह असते. त्यामुळे महिलासुद्दा एसटीने अगदी रात्रीसुद्धा सुरक्षितरित्या एसटीने प्रवास करू शकतात.

मंडळी आज आपण (MSRTC Free Travel Scheme) च्या अशाच काही योजना किंवा सवलतींची माहिती घेऊया ज्याअंतर्गत एसटीच्या प्रवाशांना तिकीटदरात १००% सवलत मिळते.

आपल्या सगळ्यांना माहित आहेच कि ७५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत आहे. पण त्याशिवाय अजून कुणाला एसटीचा प्रवास मोफत आहे ते आता आपण बघूया.

MSRTC मोफत प्रवास योजना पात्रता | MSRTC Free Travel Scheme Eligibility

MSRTC Free Travel Scheme

तर या होत्या मोफत प्रवास योजना (MSRTC Free Travel Scheme) च्या काही सवलती ज्याअंतर्गत समाजातील काही घटकांना एसटी प्रवासावर १००% सवलत मिळते. पण या पैकी काही योजनांना एक छोटी अट आहे आणि ती आहे प्रवासाच्या मर्यादेची. तसंच, यातील बहुतेक योजनांचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र निश्चितपणे दाखवावी लागतील. त्याची संपूर्ण माहिती आपल्याला जवळच्या एसटी महामंडळाच्या आगारामध्ये नक्की मिळेल. त्यामुळे कुठल्याही योजनेचा लाभ घेण्याआधी कृपया त्याची माहिती मिळवा म्हणजे आपल्याला त्याचा लाभ चांगल्या प्रकारे घेता येईल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top