National Saving Certificate 2023 | राष्ट्रीय बचत योजना

National Saving Certificate

मंडळी, राष्ट्रीय बचत योजना (National Saving Certificate) ही भारत सरकारतर्फे चालवली जाणारी एक अशी योजना आहे जी खासकरून लहान ते मध्यम उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते तसंच आयकरात सूटही मिळवून देते.

आज आजच्या लेखात आपण बघणार आहोत राष्ट्रीय बचत योजनेची (National Saving Certificate) वैशिष्ट्ये, व्याजदराची माहिती आणि त्यानुसार परतावा किती मिळेल इत्यादी.

मंडळी, राष्ट्रीय बचत योजना ज्याला नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) म्हणूनही ओळखतात. ही ५ वर्षांची योजना आहे. म्हणजे या योजनेत एक ठराविक रक्कम खातं उघडताना भरावी लागते आणि त्यावर आपल्याला ५ वर्ष व्याज मिळत राहतं. ५ वर्ष पूर्ण झाली कि योजनेचा कालावधी पूर्ण होतो आणि भरलेली सगळी रक्कम जमा झालेल्या व्याजासकट ठेवीदाराला परत मिळते.

राष्ट्रीय बचत योजना ठेवींचे नियम (National Saving Certificate Deposit Rules)

राष्ट्रीय बचत योजना मुदतपूर्तीसंबंधी (National Saving Certificate After Maturity)

राष्ट्रीय बचत योजना खाते तारण ठेवणे (National Saving Certificate Pledging of account)

मंडळी, राष्ट्रीय बचत योजनेतील खातं गरज पडल्यास तारण ठेऊन त्यावर ठेवीदाराला कर्ज काढता येतं. तसंच कर्ज मिळवण्यासाठी हे खातं कधी कधी कर्ज देणाऱ्याच्या नावावर हस्तांतरित सुद्धा केलं जाऊ शकत. त्यासाठी ठेवीदाराला आधी कर्ज देणार्याकडून तशी सहमती असल्याचं पत्र आणावं लागतं आणि मग संबंधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत अर्जासोबत पुरावा म्हणून जोडावं लागतं.

तसंच, ही ठेव फक्त खालील व्यक्ती किंवा संस्थांकडेच तारण ठेवता येईल किंवा सुरक्षेच्या कारणासाठी तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल.
यामध्ये
भारताचे राष्ट्रपती/राज्याचे राज्यपाल.
रिझर्व बँक / शेड्युल्ड बँक / सहकारी संस्था / बँक.
सार्वजनिक/खाजगी/सरकारी कंपनी/स्थानिक प्राधिकरण.
गृहनिर्माण वित्त कंपनी.
या व्यक्ती किंवा संस्थांकडेच ठेव तारण ठेवता येईल किंवा तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल.

राष्ट्रीय बचत योजना खाते मुदतीपूर्वी बंद करणे (National Saving Certificate Premature closure)

या योजनेत खालील अटी वगळता मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करता येत नाही

याशिवाय इतर कुठल्याही कारणांनी खातं बंद केल्यास खालील नियम लागू होतील.

राष्ट्रीय बचत योजना खाते हस्तांतरण (National Saving Certificate Transfer of account)

या योजनेत खालील अटींवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खातं हस्तांतरित केले जाऊ शकते.

राष्ट्रीय बचत योजना खात्याचा व्याजदर आणि आकडेमोड (National Saving Certificate interest rate and calculator)

या योजनेचा चालू व्याजदर ७.७% आहे. आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे. म्हणजे या योजनेत व्याजाची आकडेमोड वर्षभर एका रकमेवर होते आणि पुढील वर्षी आधीच्या वर्षीची रक्कम अधिक आधीच्या वर्षीचं व्याज मिळून होणाऱ्या रकमेवर व्याज मिळतं.

गुंतवणूक 

एकूण व्याज 

परतावा 

१,०००

४४९

१,४४९

२,०००

८९८

२,८९८

५,०००

२,२४५

७,२४५

१५,०००

६,७३५

२१,७३५

२०,०००

११,२२५

३६,२२५

राष्ट्रीय बचत योजना आयकरात सूट (National Saving Certificate Income Tax Rebate)

राष्ट्रीय बचत योजना कागदपत्र (National Saving Certificate Documents)

कागदपत्रांमध्ये

ही कागदपत्र द्यावी लागतील.

मंडळी, राष्ट्रीय बचत योजना (National Saving Certificate) हा भारत सरकारच्या अल्पबचत योजनांमधला सर्वात जास्त परतावा देणारा पर्याय म्हणून ओळखला जातो आणि यात आयकरात सूटही मिळते. त्यामुळे आपली गुंतवणूक केल्यावर ५ वर्ष थांबायची तयारी असेल तर आपण या योजनेचा नक्की विचार करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top