पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024

पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024

मंडळी, आज आपण पोस्टाच्या सगळ्याच योजनांचे व्याजदर बघणार आहोत म्हणजे ज्यांना या व्याजदराबद्दल माहिती नसेल त्यांना ती माहिती मिळेल. त्याचबरोबर बघणार आहोत पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024 जे पासून लागू होणार आहेत.

पोस्ट ऑफिस कडून या तिमाहीसाठी म्हणजे जानेवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीसाठी व्याजदरात अगदी नाममात्र वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता बघूया पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024 ते मार्च 2024 या तिमाहीसाठी.

पोस्ट ऑफिस बचत खाते

पोस्ट ऑफिसच बचत खात हे इतर सामान्य बचत खात्यासारखं असतं. त्यावर मिळणारा व्याजदर आधी ४% एवढा होता आणि यावेळी सुद्धा त्यात कुठलाही बदल झालेला नाही.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना पोस्ट ऑफिसची एफडी म्हणूनही ओळखली जाते. हि योजना एकूण चार वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे. एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी. याचे व्याजदरही वेगवेगळ्या कालावधी प्रमाणे वेगळे असतात.

एक वर्षासाठी ६.९% एवढा व्याजदर आहे, दोन वर्षांसाठी ७.०% व्याजदर आहे. तीन वर्षांसाठी यापूर्वी ७.% व्याजदर होता त्यात यावेळी अगदी नाममात्र वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या मुदत ठेवींचा व्याजदर आता ७.१% झाला आहे. तसंच, पाच वर्षांसाठी ७.५% एवढा व्याजदर आहे.

या योजनेच वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत मिळणार व्याज दर वर्षाच्या शेवटी ठेवीदारांच्या बचत खात्यावर जमा होतं.

मुदत 

जुना व्याजदर 

नवा व्याजदर 

१ वर्ष 

६.९%

६.९%

२ वर्षे 

७.०%

७.०%

३ वर्षे 

७.०%

७.१% *

५ वर्षे 

७.५%

७.५%

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव हि ५ वर्षांची अल्पबचत योजना आहे ज्यात आपल्याला दरमहा किमान १०० रुपये भरावे लागतात आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम आपण भरू शकतो. फक्त यात एकरकमी पैसे भरता येत नाहीत तर हप्त्याने भरावे लागतात.
या योजनेच्या व्याजदरात यावेळी वाढ झालेली नाही. या योजनेचा व्याजदर याआधी ६.७% होता तो तसाच ठेवण्यात आला आहे.

जेष्ठ नागरिक बचत योजना

ही योजना खास जेष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्या नागरिकांचं वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली असून या योजनेची मुदत ५ वर्षे आहे. या योजनेत खातेदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळतं म्हणजे दर तीन महिन्यांनी बचत खात्यावर व्याज जमा होते. ही योजना पेंशन योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेचा चालू व्याजदर ८.२% आहे. त्यात यावेळी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिसची हि अतिशय प्रचलित योजना खातेधारकाला दरमहा व्याज मिळवून देते म्हणजे दरमहा बचत खात्यावर व्याज जमा होते. या योजनेचा चालू व्याजदर ७.४% आहे. त्यातसुद्धा यावेळी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पाच वर्षांची असून आयकरातून सूट मिळवून देणाऱ्या योजनांपैकी एक आहे. याचा चालू व्याजदर ७.७% आहे. त्यातही यावेळी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

पब्लिक प्रोव्हिडंड फंड

अतिशय प्रचलित अशा या योजनेचा कालावधी १५ वर्षांचा आहे. यात आपण किमान वार्षिक ५०० रुपये भरू शकतो. या योजनेचा चालू व्याजदर ७.१% आहे. त्यातही यावेळी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

किसान विकास पत्र

ही सुद्धा एक चांगली बचत योजना असून पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रचलित आहे. याचा चालू व्याजदर ७.५% आहे आणि त्यात कुठलाही बदल झालेला नाही. या योजनेत गुंतवलेले पैसे आता ११५ महिन्यात दुप्पट होतात.

सुकन्या समृद्धी योजना

भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियाना अंतर्गत हि योजना खास मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खरचाची तरतूद करण्यासाठी सादर केली होती. या योजनेचा कालावधी २१ वर्षाचा आहे आणि याचा जुना व्याजदर ८.०% होता. मात्र, या योजनेच्या व्याजदरात यावेळी वाढ झालेली आहे आणि या योजनेचा नवीन व्याजदर ८.२% झाला आहे.

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र

भारत सरकारने खास महिलांसाठी ही योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू केलेली आहे. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि याचा चालू व्याजदर या ७.५% आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

तर मंडळी, ही होती माहिती पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जानेवारी 2024 ची माहिती. हे व्याजदर जानेवारी 2024 ते मार्च 2024 या तिमाहीसाठी लागू होणार आहेत. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. धन्यवाद.

पोस्ट ऑफिसची २०२३ मध्ये खास महिलांसाठी योजना सुरु केली होती जिचं नाव आहे महिला सम्मान बचत प्रमाणपत्र.

हो. तुम्ही तुमचे पोस्ट ऑफिस खाते Google Pay मध्ये जोडू शकता. इतर बँकाबरोबर Google Pay जोडण्यासाठी जी प्रक्रिया असते तीच प्रक्रिया वापरून पोस्ट ऑफिस खाते Google Payशी जोडता येते.

पोस्टाची मुदत ठेव योजना सामान्य FD पेक्षा जास्त चांगली आहे कारण त्यात सामान्य FD पेक्षा जास्त व्याजदर मिळतो.

जानेवारी २०२४ साठी घोषित व्याजदरानुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) या दोन योजनांचा व्याजदर सगळ्यात जास्त म्हणजे ८.२% आहे.

नाही. पॅनकार्ड केवायसी मधील कागदपत्रांमध्ये समाविष्ट होतं. त्यामुळे त्याशिवाय बँक खाते उघडू शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top