Post office tax saving scheme । आयकरात सूट मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या योजना

Post office tax saving scheme

आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या कुठल्या योजनांवर आपल्याला आयकरात सवलत मिळते (Post office tax saving scheme) आणि कुठल्या योजनांवर आयकरात सवलत मिळत नाही. पोस्टाच्या अनेक चांगल्या योजना आहेत ज्यामुळे ठेवीदारांना चांगल्या व्याजदराबरोबर आयकरात सवलतीचा लाभसुद्धा मिळतो.

आधी आपण बघूया आयकरात किती प्रकारे सवलत मिळू शकते. त्यानंतर बघूया पोस्ट ऑफिसच्या कुठल्या योजनांवर आपल्याला आयकरात सवलत (Post office tax saving scheme) मिळते.

पोस्टाच्या योजनांमध्ये आयकरात तीन प्रकारे सवलत दिली जाते.

तर पोस्टाच्या काही योजनांवर आता सांगितलेल्या तीनही प्रकारांत सवलत मिळते, काही योजनांवर दोन किंवा एका प्रकारात सवलत मिळते तर काहींवर कुठलीही सवलत मिळत नाही.

आयकरात सूट मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या योजना (Post office tax saving scheme)

पोस्ट ऑफिस बचत खाते

हे खातं इतर सामान्य बचत खात्यांसारखच असतंं. याचा सध्याचा व्याजदर ४% आहे. बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर कुठल्याही प्रकारे टीडीएस कापला जात नाही. मात्र, या खात्यावर आपण जेवढी रक्कम भरू ती रक्कम ८०सी अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीसाठी पात्र ठरत नाही.

तसंच या खात्यावर मिळालेलं वार्षिक व्याज जर १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर आयकरात सवलत मिळते. मात्र व्याजाची रक्कम १० हजार पेक्षा जास्त असेल तर मात्र १० हजार पेक्षा जास्तीच्या रकमेवर आयकर लागू होतो.

यात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपली एकापेक्षा जास्त बचत खाती असतील तर त्या सर्व बचत खात्यामध्ये मिळून एकूण जे व्याज होईल ते जर दहा हजारापेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर आपल्याला आयकर लागू होतो.

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव ही योजना ५ वर्षांची आहे. या योजनेत आपल्याला दर महिन्याला एक ठराविक रक्कम खात्यावर भरावी लागते आणि त्यावर आपल्याला व्याज मिळतं.

या योजनेत मिळणार्या व्याजावर टीडीएस कापला जात नाही. तसंच आवर्ती ठेव खात्यावर गुंतवणुकीच्या रकमेवर ८०सी अंतर्गत कुठल्याही प्रकारची सवलत आयकरात मिळत नाही आणि या योजनेत मिळणारा व्याज सुद्धा करपात्र आहे. म्हणजे या योजनेचे व्याज मिळत त्यावर आपल्याला आयकर भरावा लागतो.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत मुदतींचे चार पर्याय उपलब्ध आहेत.
एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष.

या योजनेत एक ते तीन वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास ८०सी अंतर्गत गुंतवणुकीच्या रकमेवर आयकरात सूट मिळत नाही. मात्र पाच वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास ८०सी अंतर्गत गुंतवणुकीच्या रकमेवर आयकरात दीड लाखापर्यंत सूट मिळते.

या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जात नाही पण या योजनेत मिळणारं व्याज करपात्र आहे.

मासिक उत्पन्न योजना

मासिक उत्पन्न योजना ही पोस्ट ऑफिसची एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे ज्यामध्ये एकदा पैसे गुंतवल्यानंतर दर महिन्याला त्याचे व्याज मिळतं. या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे आणि या योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त एका व्यक्तीसाठी ९ लाख आणि संयुक्त खातं असेल तर १५ लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर ८० सी अंतर्गत कुठल्याही प्रकारे आयकरात सवलत मिळत नाही. मात्र योजनेत मिळणारा व्याजावर टीडीएस कापला जात नाही आणि या योजनेत मिळणारं व्याज संपूर्णपणे करपात्र आहे म्हणजे त्याच्यावर योग्य तो आयकर भरावा लागतो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना नावाप्रमाणेच फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे म्हणजे साठ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी ही योजना आहे. काही खास बाबतीत वयाची अट थोडीशी शिथिल केलेली आहे पण या योजनेत फक्त निवृत्ती घेतलेल्या किंवा निवृत्त झालेल्या व्यक्तीच गुंतवणूक करू शकतात.

या योजनेचा चालू व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आहे आणि योजनेची मुदत पाच वर्षांची आहे यात किमान १००० रुपये आणि जास्तीत जास्त ३० लाखापर्यंत गुंतवणूक करता येते

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर ८० सी अंतर्गत आयकरात सवलत मिळते.

तसंच या योजनेत मिळणार्या व्याजाची रक्कम वार्षिक ५० हजार पेक्षा जास्त असेल तर त्यावर टीडीएस कापला जातो मात्र व्याजाची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर टीडीएस कापला जात नाही आणि या योजनेत मिळणारं व्याज संपूर्णपणे करपात्र आहे म्हणजे त्याच्यावर योग्य तो आयकर भरावा लागतो.

राष्ट्रीय बचत योजना

किसान विकास पत्र

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

सुकन्या समृद्धी योजना

भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत खास मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आणली होती. जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंतच्या मुलींसाठी या योजनेत गुंतवणूक करता येते. मात्र दहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींसाठी या योजनेत गुंतवणूक करता येत नाही.

या योजनेची मुदत २१ वर्षांची आहे; मात्र पैसे आपल्याला १५ वर्ष पूर्ण होईपर्यंतच भरावे लागतात. या योजनेचा चालू व्याजदर ८% आहे. या योजनेत किमान अडीचशे रुपये भरून आपल्याला खातं चालू करता येतं आणि दरवर्षी कमीत कमी अडीचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये असे खातं चालू केल्यापासून पंधरा वर्षापर्यंत आपल्याला भरावे लागतात.

या योजनेत सुद्धा सर्व प्रकारे आयकरात सवलत मिळते म्हणजे या योजनेतील व्याजावर कुठल्याही प्रकारे टीडीएस कापला जात नाही तसंच व्याजावर कुठल्याही प्रकारे आयकर भरावा लागत नाही म्हणजे या योजनेत मिळणारा व्याजही पूर्णपणे करमुक्त आहे आणि दरवर्षी दीड लाखाच्या गुंतवणुकीवर आयकर कलम ८० सी अंतर्गत आपल्याला आयकरात सूट मिळते. तसंच मुदत पूर्ण झाल्यावर मिळणार्या रकमेवर सुद्धा आपल्याला कुठलाही कर भरावा लागत नाही.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना खास महिलांसाठी भारत सरकारने एक एप्रिल २०२३ पासून चालू केलेली आहे. या योजनेत सर्व वयोगटाच्या महिला गुंतवणूक करू शकतात.

या योजनेची मुदत दोन वर्षांची आहे आणि योजनेचा व्याजदर ७.५% आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत केलेली दीड लाखापर्यंतची गुंतवणूक ८० सी अंतर्गत सवलतीसाठी पात्र ठरते. योजनेत मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस कापला जात नाही मात्र त्या व्याजावर आपल्याला आयकर मात्र भरावा लागतो.

मंडळी, इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मिळणार व्याज हे पूर्णपणे करमुक्त असलं तरी आपल्याला आयकर रिटर्न भरताना ते उत्पन्न म्हणून दाखवावं लागतं तरच त्या व्याजाच्या उत्पन्नावर आपल्याला आयकरात वजावट मिळते. त्यामुळे आयकर रिटर्न दरवर्षी न चुकता भरत चला ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या वजावटी आपल्या उत्पन्नावर मिळवता येऊ शकतात.

तर मंडळी आज आपण पोस्टाच्या आयकरात सूट मिळवून देणाऱ्या योजनांची (Post office tax saving scheme) माहिती घेतली. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर ती तुमच्या मित्र मंडळींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनाही त्यांची माहिती होईल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top