Post Office Time Deposit । पोस्ट ऑफिस मुदत ठेव 2023

मंडळी, आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव (Post Office Time Deposit) योजनेबद्दल संपूर्ण माहिती तसंच नवीन व्याजदर आणि त्यानुसार परतावा किती मिळेल. पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना पोस्टाची एफडी म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि या योजनेतील गुंतवणुकीवर आयकरात सूटसुद्धा मिळते त्यामुळे ही योजना खूप प्रसिद्ध आहे.

मंडळी, आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव (Post Office Time Deposit) योजनेबद्दल संपूर्ण माहिती तसंच नवीन व्याजदर आणि त्यानुसार परतावा किती मिळेल. पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना पोस्टाची एफडी म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि या योजनेतील गुंतवणुकीवर आयकरात सूटसुद्धा मिळते त्यामुळे ही योजना खूप प्रसिद्ध आहे.

Table of Contents

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीसाठी पात्रता (Eligibility for Post Office Time Deposit)

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींचे नियम (Rules for Post Office Time Deposit)

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींच्या मुदतपूर्तीनंतर (Maturity of Post Office Time Deposit)

Post Office Time Deposit

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींच्या मुदतवाढीविषयी (Extension of Post Office Time Deposit Extension)

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींच्या मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करणे (Premature Withdrawal of Post Office Time Deposit Extension)

पोस्ट ऑफिस मुदत ठेव खात्याचे तारण (Pledging of Post Office Time Deposit)

मंडळी, पोस्ट ऑफिस मुदत ठेव खात तारण ठेऊन त्यावर कर्ज सुद्धा काढता येत. पण त्यासाठी काही नियम आहेत.

ज्या व्यक्ती किंवा संस्थेकडे ठेव तारण ठेवायची असेल त्याची यासाठी संमती असल्याचं पत्रं मिळवावं लागेल आणि ते पत्रं एका अर्जासोबत तुमचं खात असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावं लागेल.
तसंच, ही ठेव फक्त खालील व्यक्ती किंवा संस्थांकडेच तारण ठेवता येईल किंवा तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल.
यामध्ये
भारताचे राष्ट्रपती/राज्याचे राज्यपाल.
रिझर्व बँक / शेड्युल्ड बँक / सहकारी संस्था / सहकारी बँक.
सार्वजनिक/खाजगी/सरकारी कंपनी/स्थानिक प्राधिकरण.
गृहनिर्माण वित्त कंपनी.
या व्यक्ती किंवा संस्थांकडेच ठेव तारण ठेवता येईल किंवा तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर मृत्यू लाभ (Death Benefit on Post Office Time Deposit)

मंडळी, या योजनेतील खातेदाराचा म्हणजे एकल खात्यातील खातेदाराचा किंवा संयुक्त खात्यातील सर्व खातेदारांचा मुदतीपूर्वी मृत्यू झाला तर खात्यातील रक्कम नॉमिनी / कायदेशीर वारसाला मिळेल.
मात्र त्यासाठी संबंधित नॉमिनी / कायदेशीर वारसाला पोस्ट ऑफिस मध्ये पासबुक आणि अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर पोस्टाची जी काही प्रक्रिया असते ती झाल्यावर नॉमिनी / कायदेशीर वारसाला खात्यावर जमा असलेली रक्कम परत मिळेल.

पोस्ट ऑफिस मुदत ठेवींवरील व्याज दर । Post Office Time Deposit Interest Rate

मंडळी, या योजनेतील १ आणि २ वर्षाच्या मुदतीसाठी व्याजदर १ जुलै २०२३ पासून वाढले आहेत.

मुदत

व्याजदर

१ वर्ष 

६.९%

२ वर्षे

७.०%

३ वर्षे 

७.०%

५ वर्षे 

७.५%

आता आपण बघूया नवीन व्याजदराप्रमाणे आपल्याला किती परतावा मिळेल.

सर्वप्रथम आपण एक वर्षासाठीचा परतावा बघूया.

या योजनेत एक वर्षासाठी व्याजदर ६.९% आहे.

गुंतवणूक

वार्षिक व्याज

एकूण रक्कम

१०,०००

७०८

१०,७०८

१५,०००

१,०६२

१६,०६२

५०,०००

३,५४०

५३,५४०

२,००,०००

१४,१६१

२,१४,१६१

३,००,०००

२१,२४२

३,२१,२४२

५,००,०००

३५,४०३

५,३५,४०३

आता आपण दोन वर्षासाठीचा परतावा बघूया.

या योजनेत दोन वर्षासाठी व्याजदर ७% आहे.

गुंतवणूक

वार्षिक व्याज

२ वर्षाचं व्याज

एकूण रक्कम

१०,०००

७१९

१,४३८

११,४३८

१५,०००

१,०७७

२,१५४

१७,१५४

५०,०००

३,५९३

७,१८६

५७,१८६

२,००,०००

१४,३७२

२८,७४४

२,२८,७४४

३,००,०००

२१,५५८

४३,११६

३,४३,११६

५,००,०००

३५,९३०

७१,८६०

६,७१,८६०

आता आपण तीन वर्षासाठीचा परतावा बघूया.
या योजनेत तीन वर्षासाठीसुद्धा व्याजदर ७% च आहे.

गुंतवणूक

वार्षिक व्याज

३ वर्षाचं व्याज

एकूण रक्कम

१०,०००

७१९

२,१५७

१२,१५७

१५,०००

१,०७७

३,२३१

१८,२३१

५०,०००

३,५९३

१०,७७९

६०,७७९

२,००,०००

१४,३७२

४३,११६

२,४३,११६

३,००,०००

२१,५५८

६४,६७४

३,६४,६७४

५,००,०००

३५,९३०

१,०७,७९०

६,०७,७९०

आता आपण पाच वर्षासाठीचा परतावा बघूया.
या योजनेत पाच वर्षासाठी व्याजदर ७.५% आहे.

गुंतवणूक

वार्षिक व्याज

५ वर्षाचं व्याज

एकूण रक्कम

१०,०००

७७१

३,८५५

१३,८५५

१५,०००

१,१५७

५,७८५

२०,७८५

५०,०००

३,८५७

१९,२८५

६९,२८५

२,००,०००

१५,४२७

७७,१३५

२,७७,१३५

३,००,०००

२३,१४१

१,१५,७०५

४,१५,७०५

५,००,०००

३८,५६८

१,९२,८४०

६,९२,८४०

पोस्ट ऑफिस मुदत ठेवींवर आयकरात सूट । Tax Benefit on Post Office Time Deposit

मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ५ वर्षाची मुदत घेतली तर ठेवीच्या रकमेवर आयकर कलम ८०सी अंतर्गत सवलत मिळेल. पण ५ वर्षांची मुदत असली तरी व्याज करपात्र असेल त्यावर कोणतीही सूट मिळणार नाही. तसंच १ ते ३ वर्ष मुदतीसाठी आयकरात कुठलीही सवलत मिळत नाही.

पोस्ट ऑफिस मुदत ठेव कागदपत्रं । Post Office Time Deposit Documents

या योजनेत खात उघडण्यासाठी तुम्हाला
खात उघडण्यासाठीचा अर्ज
ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स इत्यादी चालेल
पत्त्याचा पुरावा म्हणून वीजबिल, आधार कार्ड, पासपोर्ट चालेल
अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला चालेल आणि त्यांच्या कायदेशीर पालकांसाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आत्ता सांगितलेली कागदपत्र द्यावी लागतील.

तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेची (Post Office Time Deposit) आणि वाढलेल्या व्याजदराची (Post Office Time Deposit Interest Rate) माहिती.
पोस्ट ऑफिस गावोगावी असतात. त्यामुळे या योजना आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांना भारत सरकारची हमी असते. त्यामुळे पैसे बुडायची भीती तर नाहीच पण खात्रीशीर आणि चांगला परतावा मिळायची हमीदेखील असते. तेव्हा या योजनेचा विचार आपण नक्की करू शकता. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top