Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana 2023 । वैशिष्ट्ये, पात्रता, फायदे

Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana

आज आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची (Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana) माहिती घेणार आहोत. ज्याअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर पेन्शनची सोय केली आहे. या योजने अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन दरमहा मिळू शकते.

आपण या लेखामध्ये बघणार आहोत या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची (Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana) वैशिष्ट्ये, पात्रता, लाभार्थी, नाव नोंदणी कशी करायची आणि फायदे.

ही योजना भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुरू केली आहे ज्यांना कुठले प्रकारचा पेन्शन मिळत नाही. यात मजूर वर्गातील कामगार, फेरीवाले, बांधकाम क्षेत्रातील कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतकरी व इतर अनेक असंघटित कामगारांचा समावेश होतो.

या योजनेत 18 ते 40 वयोगटातील अर्जदारांना वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपये दरमहा भरावे लागतात आणि जेवढी रक्कम आपण गुंतवता तेवढीच सरकार कडून ही गुंतवली जाते. अर्जदाराच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा तीन हजार पेन्शन मिळू शकते आणि ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना पात्रता (Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana Eligibility)

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कागदपत्रे (Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana Documents)

या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याजवळ आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते असणे अनिवार्य आहे

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना नावनोंदणी(Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana enrollment)

या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी पहिला पर्याय म्हणजे सरकारने खास तयार केलेल्या पोर्टलवर जाऊन करू शकता त्यासाठी लागणारी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते आपण पाहू शकता
https://maandhan.in/auth/login

आणि दुसरा पर्याय म्हणजे जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन सुद्धा नाव नोंदणी करू शकता.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना फायदे(Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana benefits)

तेव्हा मंडळी जर आपण या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या (Pradhanmantri Shramyogi Mandhan Yojana) नियमात बसत असाल तर लवकरात लवकर नाव नोंदणी करा आणि आपल्या माहितीत अशी कोणी व्यक्ती असेल जी या योजनेच्या नियमात बसत असेल तर त्यांनाही कृपया ही माहिती द्या जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top