ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी 2024 – आयुर्विमा गावोगावी

मंडळी, आज आपण पोस्ट ऑफिसची अशी एक योजना बघणार आहोत जी आपल्याला इन्शुरन्स कव्हर म्हणजे विमा संरक्षण देते आणि त्याच बरोबर चांगला परतावाही देते. या योजनेचं नाव आहे ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी ज्याला आपण रूरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स (Rural postal life insurance) म्हणूनही ओळखतो. ही योजना पोस्ट (Post Office) ऑफिसने खास ग्रामीण भागातील लोकांसाठी आणली आहे.

पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी ही योजना खास ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आणली याचं कारण म्हणजे सरकारने एक सर्वेक्षण केलं ज्यात त्यांना असं लक्षात आलं कि ग्रामीण भागात आयुर्विमा किंवा लाईफ इन्शुरन्स (Life insurance) घेणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे.

तसंच पोस्ट ऑफिसचं जाळं गावोगावी असल्यामुळे लोकांचा पोस्ट ऑफिस वर विश्वास असतो. गावांमध्ये तर पोस्टमास्तरशी लोकांचे अगदी मैत्रीचे संबंध असतात आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांचा अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा लाभ घेऊ शकतो कारण त्या अतिशय कमी दरात उपलब्ध असतात.

ग्रामीण डाक आयुर्विमा (Rural postal life insurance) ही एक प्रमुख योजना आहे जिच्या अंतर्गत अनेक छोट्या योजना येतात ज्या वेगवेगळ्या वयाच्या लोकांसाठी तयार केल्या आहेत. आज या लेखामध्ये आपण ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी या योजनेसंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

सगळ्यात आधी आपण ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी या योजनेची पात्रता बघूया.

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी

ही योजना भारत सरकारने पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून खास ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी आणली आहे. त्यामुळे

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी योजनेची रक्कम

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी योजनेअंतर्गत कर्जाची सुविधा

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी या योजनेत घेतलेल्या पॉलिसीवर आपण कर्ज सुद्धा काढू शकतो. मात्र त्यासाठी काही अटी आणि नियम दिलेले आहेत. त्यानुसार

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी मुदत पूर्ण होण्याआधी बंद करणे

आपल्याला काही कारणांनी पॉलिसी मुदतीआधी बंद करण्याची गरज पडली तर आपण करू शकतो. पण त्याचे २ नियम आहेत. पहिला नियम म्हणजे आपण पॉलिसी कमीतकमी तीन वर्षांनंतर बंद करू शकतो.

मात्र ३ वर्षांनी पॉलिसी बंद केल्यास आपल्याला बोनस मिळत नाही. दुसरा नियम म्हणजे पॉलिसी ५ वर्षांनंतर बंद करणे. पॉलिसी ५ वर्षानंतर बंद केल्यास आपल्याला भरलेल्या प्रीमियमसोबत जमा झालेला बोनस सुद्धा मिळतो.

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी साठी आवश्यक कागदपत्रं

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. आता आपण बघूया कि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कुठकुठली कागदपत्र लागतात -

तर मंडळी, अशा प्रकारे विमा घेण्यासाठी विमाधारकाला कमीतकमी आत्ता सांगितल्याप्रमाणे एवढी कागदपत्रं द्यावीच लागतात

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी साठी नॉमिनेशन

या विमा योजनेत आपल्याला नॉमिनेशन ची सुविधा पण दिलेली आहे. पूर्वी विमाधारक पॉलिसीचं नॉमिनेशन करायला टाळाटाळ करत असत. पण आता नॉमिनेशन अनिवार्य करण्यात आलं आहे. कारण जर विमाधारकाला मृत्यू झाला तर संबंधित पॉलिसीची रक्कम कुणाला द्यायची हा फार मोठा प्रश्न उभा राहत असे.

नॉमिनेशन म्हणजे आपण अशा व्यक्तींची नावं देतो ज्यांना विमा धारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर संबंधित विमा योजनेची रक्कम मिळते. थोडक्यात, खातेदाराचा काही कारणांनी मृत्यू झाला तर योग्य ती रक्कम खातेदाराच्या नॉमिनीला मिळावी यासाठी हि तरतूद केलेली असते.

मृत्यूपश्चात वारसांना मिळणारे लाभ किंवा डेथ क्लेम

खातेदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या नॉमिनीला म्हणजे पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना विम्याची रक्कम अधिक जमा बोनस मिळून एकूण जी रक्कम होईल ती परत देण्यात येते. मात्र त्यासाठी पोलिसी घेताना नॉमिनीची नोंद करणं अतिशय आवश्यक आहे. तरच हा लाभ दिला जातो.

ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी प्राप्तीकरात सूट

आयकर कलम ८०सी नुसार ग्रामीण डाक आयुर्विम्यामध्ये भरलेल्या प्रीमियमसाठी प्राप्तीकरात सूट मिळते. ही सवलत दीड लाखपर्यंत असते. तसंच मुदत पूर्ण झाल्यावर जी रक्कम मिळते ती सुद्धा आयकरमुक्त असते. त्यामुळे, या ही पोलिसी खरेदी करणं हे निश्चितच फायद्याचं आहे.

पॉलिसी घेतल्यावर मिळणारी कागदपत्रं

पोस्ट ऑफिस ची विमा पॉलिसी घेतल्यावर विमाधारकाला काही कागदपत्र दिली जातात.

ही तीनही कागदपत्र अतिशय सांभाळून ठेवणं आवश्यक असतं. कारण पॉलिसीची मुदत संपते तेव्हा आपल्याला हीच कागदपत्र जमा करून पैसे परत मिळतात. तसंच, विमाधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यावेळी सुद्धा ही कागदपत्र पुरावा म्हणून सादर करावी लागतात.

पॉलिसीचा हप्ता कसा भरता येईल?

या योजनेअंतर्गत घेतलेल्या पॉलिसीचा हप्ता दोन प्रकारे भरता येतो.

तर मंडळी, ही होती ग्रामीण डाक आयुर्विमा पॉलिसी या योजनेची माहिती. या योजनेत विम्याचे हप्ते किंवा बोनस याची माहिती दिलेली नाही. कारण ही ग्रामीण डाक आयुर्विम्याची ढोबळ माहिती होती. या पुढील काही लेखांमधून आपण ग्रामीण डाक आयुर्विम्याअंतर्गत (Rural postal life insurance) ज्या योजना येतात त्यांची माहिती बघणार आहोत. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top