टीडीएस कपात कशी टाळायची? | Save TDS on FD interest

Save TDS on FD interest

Save TDS on FD interest - मंडळी, आपल्याला हे माहिती असेल कि आपण बँकेत मुदत ठेव किंवा एफडी करतो त्याच्या व्याजावर बँक टीडीएस कापून घेते. ही टीडीएसची रक्कम बँक आयकर खात्याकडे सुपूर्द करते म्हणजे आयकर खात्याकडे जमा करते आणि जोपर्यंत आपण आयकर रिटर्न भरत नाही तोपर्यंत ती टीडीएस ची रक्कम आयकर खात्याकडेच पडून राहते. तिचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही.

अर्थात हे सगळं तेव्हा होत जेव्हा आपलं उत्पन्न करपात्र नसतं. जर आपलं उत्पन्न करपात्र असेल म्हणजे आपल्या उत्पन्नावर आपल्याला आयकर भरावा लागत असेल तर मात्र ही टीडीएस ची रक्कम आपल्याला परत मिळत नाही कारण ती रक्कम आपण भरतो त्या आयकरात समाविष्ट केली जाते.

पण मंडळी असं काहीतरी झालं तर कि बँकेने टीडीएस कापलाच नाही? किंवा आपण असं काहीतरी केलं कि बँक टीडीएस कापूच शकणार नाही तर?

आज आपण बघणार आहोत अशाच काही सोप्या ट्रिकस ज्या आपल्या एफडीच्या व्याजावर कापला जाणारा टीडीएस वाचवतील.

मंडळी या ट्रिकस बघण्याआधी आपण बघूया टीडीएस म्हणजे काय आणि तो का कापला जातो म्हणजे मग या टीडीएस वाचवण्याच्या ट्रिकस कशा वापरायच्या ते आपल्याला नीट कळेल.

टीडीएस म्हणजे एक प्रकारचा आगाऊ कर किंवा ऍडव्हान्स टॅक्स असतो जो आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक बँक विविध प्रकारच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर आकारते. थोडक्यात, ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर व्याजाच्या रकमेवर १०% रक्कम आगाऊ कर म्हणून कापली जाते त्याला टीडीएस म्हणतात.

टीडीएस का कापला जातो (Why is TDS on FD interest deducted?)

रिझर्व बँकेच्या नियमानुसार, जर १. एकाच बँकेत असलेल्या ठेवीवरील व्याजाची रक्कम एका आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिल ते पुढील वर्षातल्या ३१ मार्च पर्यंत सामान्य करदात्यांसाठी म्हणजे ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींसाठी ४० हजार रुपयांपेक्षा जास्त झाली आणि जेष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांच्यासाठी ही व्याजाची रक्कम ५० हजार पेक्षा जास्त झाली तर १०% टीडीएस कापला जातो.

मात्र जर ठेवीदारांनी पॅन नंबर दिला नसेल तर मात्र टीडीएस २०% कापला जातो.

म्हणजे जर सामान्य ठेवीदाराला एका बँकेत असलेल्या ठेवींवर ५० हजार रुपये व्याज एका आर्थिक वर्षात मिळालं तर ते ४० हजार पेक्षा जास्त आहे. म्हणजे या व्याजाच्या रकमेवर बँक १०% म्हणजे ५००० रुपये टीडीएस कापून घेईल आणि ४५ हजार रुपये व्याज म्हणून परत देईल.

पण ठेवीदार जेष्ठ नागरिक असेल तर त्याच व्याजाच्या रकमेवर टीडीएस कापला जाणार नाही कारण जेष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपातीची मर्यादा एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपये आहे.

मात्र जर ठेवीदारांनी पॅन नंबर दिला नसेल तर ही टीडीएस ची रक्कम २०% म्हणजे सामान्य ठेवीदारांसाठी १० हजार एवढी कापली जाईल आणि ४० हजार रुपये व्याज म्हणून परत दिले जातील.

मात्र जेष्ठ नागरिकांना टीडीएस कपात लागू होणार नाही कारण व्याजाची रक्कम ५० हजार आहे जी रिझर्व बँकेने दिलेल्या मर्यादेएवढीच आहे.

आता हाच नियम वापरून आपल्याला आपल्या ठेवीवरील व्याजावर होणारी टीडीएस कपात कशी टाळायची हे बघायच आहे.

टीडीएस कपात कशी टाळायची? (How to Save TDS on FD interest?)

तर मंडळी आज आपण बघितलं कि आपण एफडीवर मिळणाऱ्या व्याजावरील टीडीएस कपात कशी टाळू शकतो (How To Save TDS on FD interest)?
पण समजा काही कारणांनी आपल्या एफडीवर टीडीएस कपात झाली तर मात्र आपल्याला आयकर रिटर्न भरावा लागतो कारण त्याशिवाय ही टीडीएस ची रक्कम जी आयकर खात्याकडे गेलेली असते ती आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आत्ता आपण बघितलेले टीडीएस कपात टाळण्यासाठीचे तीन पर्याय आपण पुन्हा एकदा नीट समजून घ्या आणि त्यांचा नक्की उपयोग करून बघा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top