Section 80DD deductions 2023 in marathi | आयकर कलम ८०डीडी

मंडळी, आज आपण आयकर कायद्यातील कलम ८०डीडी (Section 80DD) विषयी माहिती घेणार आहोत. या लेखामध्ये आयकर कलम ८०डीडी (Section 80DD) संबंधी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे ज्यामुळे करदात्यांना आयकरात सवलत मिळवण्यासाठी या कलमाचा कसा उपयोग होईल आणि त्यामुळे आयकरात जास्तीत जास्त सूट कशी मिळेल हे लक्षात येईल.

अशा बाबतीत संबंधित करदात्या व्यक्तीला आयकर कलम ८०डीडी (Section 80DD) अंतर्गत आयकरात वजावट मिळते.

आयकर कलम ८० डीडी अंतर्गत किती खर्च केला तर वजावट मिळते (deduction under section 80DD)

तर अशी काही मर्यादा आयकर कलम ८० डीडी मध्ये दिलेली नाही. याउलट या कायद्यात दिलेल्या वजावटीच्या रकमेपेक्षा कमी खर्च जरी होत असेल तरी वजावट संपूर्ण रकमेची मिळते.
उदा. ८० डीडी या कायद्यानुसार वजावट ७५ हजाराची आहे आणि खर्च ५० हजार असेल तरी वजावट ४० हजार मिळेल.

Section 80DD

दिव्यांग आश्रित म्हणजे काय? (What is a disabled dependent?)

या कायद्यानुसार जी व्यक्ती दिव्यांग आहे आणि करदात्या व्यक्तीवर अवलंबून आहे अशा व्यक्तीला डिपेंडेंट असं म्हणतात. तर अशा कोणत्या व्यक्ती कायद्यानुसार डिपेंडंट म्हणून धरल्या जाऊ शकतात?

करदात्यांचा जोडीदार म्हणजे पती / पत्नी, मुलं, आई, वडील, भाऊ किंवा बहीण या पैकी कुणीही व्यक्ती जी दिव्यांग आहे आणि ज्यांच्यासाठी करदात्याला काही खर्च करावा लागत असेल अशा कुटुंबातील सदस्यांसाठी करदाता व्यक्ती आयकर कलम ८० डीडी वजावट मिळवू शकते.

80DD अंतर्गत कोणत्या अपंगत्वांचा समावेश होतो? (What are the disabilities covered under 80DD?)

आयकर कलम ८० डीडी अंतर्गत खालील प्रकारच्या दिव्यांगतेवर आयकरात सूट मिळते

आयकर कलम ८०डीडी अंतर्गत वाजवटीची मर्यादा (What is the limit of 80DD exemption?)

मंडळी, आयकर कलम ८० डीडी अंतर्गत जर संबंधित व्यक्तीचं अपंगत्वाचं प्रमाण ४० टक्के ते ७९ टक्के या दरम्यान असेल तर आयकरात ७५ हजार पर्यंत सूट मिळते आणि हेच प्रमाण ८० टक्के हुन जास्त असेल तर १,२५,००० एवढी आयकरात सूट मिळते.

अपंगत्वाचे प्रमाण

आयकरात सूट

४०% ते ७९% दरम्यान

७५,००० रुपये

८०% किंवा त्याहून जास्त

१,२५,००० रुपये

८०डीडी साठी कोणते पुरावे आवश्यक आहेत? (What proofs are required for 80DD?)

८० डीडी अंतर्गत आयकरात वजावटीचा दावा करण्यासाठी अनिवार्य अशी कुठलीच कागदपत्र नाहीत किंवा यासाठी केलेल्या उपचारासाठी झालेल्या खर्चाची बिल सुद्धा लागत नाहीत. एक आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे संबंधित दिव्यांग व्यक्तीचं दिव्यांगतेच सर्टिफिकिट आपल्याकडे असावं लागतं. मात्र हे सुद्धा अनिवार्य नाही पण जर करदाता व्यक्ती कलम ८० डीडी अंतर्गत वजावटीचा दावा करत असेल आणि भविष्यात आयकर अधिकाऱ्यांनी पुरावा म्हणून जर हे सर्टिफिकिट मागितलं तर ते देता यावं म्हणून ते आपल्याकडे असलं पाहिजे.

तसंच संबंधित सर्टिफिकिट अशा तज्ज्ञ डाक्टरांकडून घेतली असली पाहिजेत जे एकतर, न्यूरोलॉजीमध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD) ची पदवी असलेले न्यूरोलॉजिस्ट आहेत. लहान मुलांच्या बाबतीत, समान पदवी असलेले बालरोग तज्ञ न्यूरोलॉजिस्ट आहेत किंवा सिव्हिल सर्जन किंवा प्रमुख वैद्यकीय अधिकारी असले पाहिजेत. थोडक्यात अशा तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्टिफिकिट मिळवावं लागेल तर ते वैध धरलं जाईल.

तसंच जर अपंगत्व तात्पुरते असेल आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा चाचणी/तपासणी करणं आवश्यक असेल, तर अशा बाबतीत ती तपासणी किंवा चाचणी करून घेऊन नवीन सर्टिफिकिट मिळवणं आवश्यक असेल. तसंच सर्टिफिकिट ची मुदत संपली असल्यास नवीन सर्टिफिकिट मिळवणं आवश्यक असेल.

८०डीडी अंतर्गत आयकरात सूट (80DD tax benefit)

या कलमांतर्गत आयकरात वजावटीचा दावा करण्यासाठी आयकर रिटर्न भरताना फक्त ८० डीडी च्या रकान्यात संबंधित व्यक्तीला कायद्यानुसार जेवढी वजावट मिळू शकते ती रक्कम लिहावी लागते. थोडक्यात ८० डीडी अंतर्गत वजावट मिळवायची असेल तर आयकर रिटर्न मात्र भरावाच लागतो. हीच एक अनिवार्य गोष्ट आहे.

मंडळी इथं एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल कि चुकीची किंवा खोटी माहिती देऊन वजावट मिळवली आणि नंतर ती गोष्ट अधिकाऱ्यांकडून तपासणी दरम्यान पकडली गेली तर दंड आकारण्यात येतो तसंच कायद्यानुसार इतर शिक्षा सुद्धा करण्यात येऊ शकते तेव्हा खरी माहिती द्या कारण थोड्या फायद्यासाठी दीर्घकालीन नुकसान करून घेणं नक्कीच फायद्याचं ठरणार नाही.

तर मंडळी, आज आपण या लेखामध्ये आयकर कलम ८०डीडी (Section 80DD) विषयी माहिती बघितली. या आधी आपण आयकर आयकर कलम ८०डी (Section 80D) विषयी माहिती बघितली होती ज्याअंतर्गत करदात्याला १ लाख रुपयांपर्यंत आयकरात सवलत मिळते. आपल्याला आयकर कलम ८०डी (Section 80D) विषयी माहिती हवी असेल तर नक्की तो लाख वाचा आणि त्याचा फायदा मिळवा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top