Section 80GG of Income Tax | कलम 80GG घर भाड्यावर प्राप्तिकरात वजावट

मंडळी आज आपण प्राप्तिकर खात्याच्या कलम 80GG विषयी माहिती घेणार आहोत. ज्याअंतर्गत घर भाड्याच्या रकमेवर प्राप्तिकरातून वजावट मिळू शकते म्हणजे आपण भाड्याच्या घरात रहात असाल आणि आपलं उत्पन्न करपात्र असेल तर आपण त्या घरभाड्याच्या अंशतः किंवा संपूर्ण रक्कमेवर आयकरातून वजावट मिळवू शकता. आजच्या लेखामध्ये आपण याच कलमाविषयी माहिती घेणार आहोत.

कलम 80GG ही आयकर कायद्यांतर्गत एक तरतूद आहे जी करदात्याला घरासाठी भरलेल्या भाड्यावर वजावटीचा दावा करण्याची परवानगी देते. या प्रकारात वजावटीचा दावा कुठल्याही व्यक्तींद्वारे केला जाऊ शकतो म्हणजे नोकरदार असो किंवा व्यावसायिक असो. आयकर कायद्यातील ही तरतुद करदात्याला त्यांच्या आयकराच्या रकमेतून वजावट मिळवण्यासाठी मदत करते.

८०जीजी मध्ये वजावटीचा दावा कोण करू शकतो? (Who can claim deduction under section 80GG?)

कलम 80GG ही आयकर कायद्यांतर्गत एक तरतूद आहे जी करदात्याला घरासाठी भरलेल्या भाड्यावर वजावटीचा दावा करण्याची परवानगी देते. या प्रकारात वजावटीचा दावा कुठल्याही व्यक्तींद्वारे केला जाऊ शकतो म्हणजे नोकरदार असो किंवा व्यावसायिक असो. आयकर कायद्यातील ही तरतुद करदात्याला त्यांच्या आयकराच्या रकमेतून वजावट मिळवण्यासाठी मदत करते.

कलम ८०जीजी अंतर्गत वाजवटीचा दावा कसा करावा? (How to Claim Deduction Under Section 80GG?)

80GG

१०बीए फॉर्म मध्ये काय माहिती द्यावी लागते? (What information needs to be given in 10BA form?)

८०जीजी अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीची मर्यादा (Deduction Allowed Under Section 80GG)

आयकर कलम ८०जीजी अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीच्या रकमेची मर्यादा जास्तीत जास्त वार्षिक ६०००० रुपये आहे. म्हणजे आपण भाडं त्यापेक्षा जास्त भरत असला तरी वजावट एका वर्षासाठी जास्तीत जास्त ६०००० रुपये एवढी मिळते. पण त्यालासुद्धा काही नियम आहेत.

आता आपण याचं एक उदाहरण पाहू समजा, एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपये आहे आणि ते भाड्याच्या घरात राहतात, ज्यासाठी त्यांना घरभाडे भत्ता मिळत नाही. त्यांना वार्षिक भाडे ९६००० रुपये द्यावे लागते. अशा परिस्थितीत वजावट खालीलपैकी जी सगळ्यात कमी असेल ती लागू होईल:

वरील उदाहरणामध्ये, नियम २ ही सर्वात कमी रक्कम असल्याने ही व्यक्ती नियम २ नुसार लाभासाठी पात्र असेल म्हणजे ३६००० एवढी वजावट या व्यक्तीला मिळू शकते.

फॉर्म १०बीए भरावा लागण्याची कारणे

मंडळी, १०बीए हा फॉर्म या आधी सुद्धा भरावा लागत होता पण तो अनिवार्य नव्हता. तेव्हा अनेकजण चुकीची किंवा खोटी माहिती द्यायचे आणि करामध्ये वजावट मिळवायचे. याला कुठंही पडताळणी करता येत नव्हती. मात्र आता हा फॉर्म अनिवार्य केल्यामुळे प्रत्येकाला खरी आणि योग्य माहिती द्यावी लागते.

तसंच यात घरमालकांचा आधार आणि पॅन क्रमांक द्यावा लागतो त्यामुळे घरमालकाला त्याची सूचना मिळते. याचा अजून एक फायदा असा की जर घरमालकानी घरभाड्यातून मिळालेलं उत्पन्न दाखवलं नसेल तर ते त्यांना दाखवता येतं.

अशाप्रकारे योग्य ती माहिती आयकर विभागाकडे पोचते.

तेव्हा मंडळी, आज आपण 80GG या आयकर कायद्यातील एका कलमाची माहिती बघितली. जर आपण भाड्याच्या घरात राहत असाल आणि आपल्याला घरभाडे भत्ता मिळत नसेल तर आपणसुद्धा 80GG अंतर्गत करपात्र रकमेतून वजावट मिळवू शकता. जर तुम्हाला आजचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळींना सुद्धा हा लेख वाचायला द्या म्हणजे त्यांनाही याचा फायदा मिळेल. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top