SIP Full Form 2023 | एसआयपी म्हणजे काय?

आज आपण बघणार आहोत एसआयपी म्हणजे काय? (SIP Full Form). त्याचबरोबर आपण कशाप्रकारे एसआयपी किंवा Systematic Investment Plan मधून आपल्या पैशाची गुंतवणूक करू शकतो.

आज आपण एसआयपीची जी माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण म्यूचुअल फंडांच उदाहरण घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला म्यूचुअल फंड या विषयी माहिती हवी असेल तर या आधी आम्ही आपल्या ब्लॉगवर एक लेख म्यूचुअल फंड या विषयावर पण लिहीला होता तो तुम्ही जरूर बघा म्हंजे या विडियो मध्ये आपण म्यूचुअल फंडासंबंधी काही संज्ञा वापरल्या आहेत उदा म्यूचुअल फंड यूनिट, फंड मॅनेजर त्या तुम्हाला व्यवस्थित कळतील.

एसआयपी म्हणजे काय? (SIP Full Form) हे बघण्याआधी आपण बघूया एसआयपीचा इतिहास. खरतर एसआयपी हा प्रकार आपल्याला नवीन नाही. आता मी आपल्याला असे दोन प्रकार सांगतो जे आपण खूप पूर्वीपासून गुंतवणुकीसाठी वापरतो आहोत आणि जे एसआयपी या प्रकारातच येतात.

पहिला प्रकार आहे आवर्ती ठेव योजना किंवा recurring डिपॉजिट ज्यामध्ये आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत किंवा पोस्टात भरतो. त्यावर आपल्याला व्याज मिळत आणि योजनेची मुदत संपली की आपल्याला मूळ रक्कम व्याजासकट परत मिळते.

दूसरा प्रकार सोन्याची भिशी. सोन्याच्या दुकानामधूनसुद्धा हा प्रकार वर्षानुवर्ष चालतो आहे ज्यात आपण दर महिन्याला ठराविक रक्कम भरतो आणि योजनेची मुदत संपली की त्यावेळी सोन्याचा जो भाव असेल आणि आपली जेवढी रक्कम जमा झाली असेल त्यानुसार आपण त्या दुकानातून सोन खरेदी करू शकतो.

एसआयपी म्हणजे काय? (SIP Full Form)

एसआयपी हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. एसआयपी म्हणजे Systematic Investment Plan ज्यात तुम्ही दर महिन्याला एक रक्कम भरता. ही रक्कम ५०० रुपये किंवा त्याहून जास्त सुद्धा असू शकते. एसआयपी मध्ये गुंतवणूक दरमहा करायची, दर तीन महिन्यांनी करायची, दर सहा महिन्यांनी करायची की वर्षातून एकदा करायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. महत्वाची गोष्ट ही आहे की ही रक्कम एक ठराविक तारखेला जमा करण अतिशय आवश्यक आहे.

एसआयपी च्या माध्यमातून तुम्ही एक मोठी रक्कम छोट्या छोट्या हप्त्यामधून तयार करू शकता जी तुम्हाला भविष्यात चांगला परतावा सुद्धा मिळवून देते. एसआयपी च्या बाबतीत तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील की माझे पैसे कुठे गुंतवले जातील, ते मला किती परतावा मिळवून देतील. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या लेखात बघणार आहोत.

तुम्ही एसआयपी मध्ये जी रक्कम दरमहा भराल ती रक्कम फंड मॅनेजर म्यूचुअल फंडात गुंतवेल. ही रक्कम दरमहा न चुकता भरली जावी यासाठी ऑटो डेबिट द्वारे ही रक्कम आपोआप तुमच्या खत्यातून कापून म्यूचुअल फंडात भरली जाते. मात्र यासाठी तुम्हाला त्या ठरलेल्या तारखेला ठरलेली रक्कम खात्यात असेल ही काळजी घ्यावी लागते.

आपण एसआयपी म्हणजे काय (SIP Full Form) हे बघितलं.आता आपण बघूया एसआयपीमधील आकडेमोड.

SIP Full Form

एसआयपी आकडेमोड (SIP Calculator)

आता आपण आकडेमोडीदवारे बघूया की एसआयपी मधून आपली गुंतवणूक आणि फायदा कसा वाढत जातो. तुम्ही जेव्हा पैसे म्यूचुअल फंडात जमा करता तेव्हा तुम्हाला त्याची यूनिट्स दिली जातात.

उदा. तुम्ही १००० रु भरले आणि म्यूचुअल फंडच्या एक यूनिटची किंमत १० रु आहे तर तुम्हाला १००० भगिले १० म्हणजे १०० यूनिट मिळतील. जसजसा या यूनिटचा भाव वाढत जाईल तसतसा तुमचा फायदा सुद्धा वाढत जाईल.

उदा ५ महिन्यांनी प्रत्येक यूनिटची किंमत १५ रु झाली आणि तुमच्या कडे ४०० यूनिट आहेत तर तुमची गुंतवणूक ४०० गुणिले १५ = ६००० रु होईल म्हणजे तुमची गुंतवणूक दरमहा १००० रु म्हणजे ५ महिन्यांनी ५००० रु होईल जिची किंमत वाढून आता ६००० रु झाली आहे. म्हणजे १००० रु फायदा. त्यामुळे जशीजशी प्रती यूनिट किंमत वाढत जाईल तसतशी तुमची गुंतवणूक आणि परतावा वाढत जाईल.

ही गुंतवणूक शेयर बाजारावर अवलंबून असल्यामुळे प्रती यूनिट किंमत सुद्धा कमी किंवा जास्त होऊ शकते. पण त्यामुळे घाबरून जायच काहीच कारण नाही. सामान्यपणे SIP आपल्याला वर्षाला १२ ते १५ % पर्यन्त परतावा देते. तसच SIP ही दीर्घ मुदतीसाठी करतात त्यामुळे मुदत जेवढी जास्त तेवढी जोखीम कमी या नियमाप्रमाणे एका ठराविक कालावधीनंतर तुमची sip सुद्धा फायद्यात येते आणि त्यानंतर तोटा होण्याची शक्यता नगण्य असते. इथे जसजसा शेयर मार्केटचा इंडेक्स वाढत जाईल तसतशी प्रती यूनिट किंमत वाढत जाईल. ज्याला चक्रवाढ असं म्हणतात.

उदा जर तुम्ही दरमहा १००० रु गुंतवणूक केली आणि तुम्हाला वार्षिक १५% परतावा मिळतो आहे. तर तुम्हाला एक वर्षांनी १२ हजार रु च्या गुंतवणुकीवर १०२१ रु परतावा मिळेल म्हणजे तुमची एकूण रक्कम एक वर्षांनी १३०२१ रु असेल.

दोन वर्षांनी २४००० रु गुंतवणूक होईल आणि परतावा ४१३५ रु असेल म्हणजे एकूण रक्कम २८१३५ रु एवढी असेल. तीन वर्षांनी ३६००० रु च्या गुंतवणुकीवर ९६७९ रु परतावा म्हणजे एकूण ४५६७९ रु एवढी एकूण रक्कम असेल.

तर इथे तुम्ही बघू शकता तुमची गुंतवणूक जेवढी जास्त कालावधीसाठी असेल तेवढा तुमचा फायदा वाढत जातो. आणि हे तुम्ही छोट्या छोट्या हपत्यानद्वारे साध्य करू शकता.

आपण एसआयपी म्हणजे काय (SIP Full Form) हे बघितलं. त्याची आकडेमोड बघितली. आता आपण बघूया SIP चे फायदे आणि तोटे. आधी फायदे बघूया.

SIP चे फायदे (SIP Benefits)

पहिलं फायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी मोठ्या रकमेऐवजी दर महिन्याला एक लहान रक्कम गुंतवणूक करणे सोपे जात. एकाच वेळी १२००० रुपये गुंतवण्याऐवजी एका वर्षासाठी १००० रुपये दरमहा भरणे सोपे जात.

एसआयपीचा मुख्य फायदा म्हणजे गुंतवणूक आणि खरेदीची सरासरी ही संकल्पना. एसआयपी मध्ये शेयर बाजार खाली आल्यावर जास्त युनिट्स मिळतात आणि बाजार वर गेल्यावर कमी युनिट्स खरेदी केले जातात कारण आपली दरमहा गुंतवणुकीची रक्कम बदलत नाही त्यामुळे भाव वाढला की त्यात यूनिट कमी येतात आणि भाव कमी झाला की यूनिट जास्त येतात. त्यामुळे शेयर मार्केट प्रमाणे आपली गुंतवणूक बदलत नाही तर आपल्या गुंतवणुकीप्रमाणे खरेदी केली जाते.

SIP चा अजून एक फायदा असा आहे की त्यातून तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनण्यासाठी प्रशिक्षण मिळत. एकदा तुम्ही एसआयपी सुरू केल्यानंतर, दर महिन्याला तुम्हाला म्युच्युअल फंडात ठराविक रक्कम द्यावी लागते आणि त्यामुळे नियमित गुंतवणुकीची सवय जोपासली जाते.

एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ऑटो डेबिट पर्याय मिळतो त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवून पैसे ट्रान्सफर करावे लागत नाहीत तर दर महिन्याला दिलेल्या तारखेला आपोआपच पैसे खात्यातून वजा होतात आणि म्यूचुअल फंडात जमा होतात.

तुम्ही ज्या म्यूचुअल फंडात एसआयपी करत असाल तो टॅक्स सेविंग म्यूचुअल फंड असेल तर तुम्हाला आयकर कलम 80 सी अंतर्गत आयकरात दीड लखपर्यंत सवलत मिळते. मात्र ही सवलत गुंतवणुकीच्या रकमेवर म्हणजे तुम्ही दरमहा असे एक वर्षात जेवढे पैसे भरता त्या रकमेवर मिळते.

आपण एसआयपी म्हणजे काय (SIP Full Form) हे बघितलं. SIP चे फायदे बघितले. आता बघूया SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे काय होऊ शकतात?

SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे (Disadvantages of SIP Investment)

एसआयपी मधली गुंतवणूक तेजीच्या बाजारात किंवा शेयर बाजार वधारल्यावर कमी फायदेशीर ठरते. जेव्हा शेयर बाजार वाढत राहतो, तेव्हा प्रत्येक वेळी खरेदी केलेली युनिट्स मागील युनिटपेक्षा जास्त किमतीची असतात, त्यामुळे त्याची सरासरी किंमत सुद्धा वाढते. त्यामुळे एकूण खरेदी आणि शेवटची खरेदीची किंमत यात कमी फरक असतो जो फायद्याच मार्जिन कमी करतो.

दूसरा तोटा म्हणजे लॉक इन पीरियड. आयकरात बचत मिळवून देणारऱ्या म्यूचुअल फंडात एसआयपी द्वारे गुंतवणूक केल्यावर किमान तीन वर्षाचा लॉक इन पीरियड असतो. म्हणजे अशा प्रकारच्या म्यूचुअल फंडात गुंतवणूक केली तर आपल्याला किमान तीन वर्ष यूनिट विकता येत नाहीत. म्हंजे आपल्याला पैसे हवे असल्यास पहिल्या तीन वर्षात तरी मिळत नाहीत.

तर मंडळी ही होती एसआयपी म्हणजे काय? (SIP Full Form) याची थोडक्यात माहिती. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एसआयपी चे अनेक प्रकार आहेत. उदा शेयर मार्केट मधली एसआयपी , गोल्ड एसआयपी. त्यासंबंधी माहिती घेऊन आम्ही लवकरच येऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top