Standard Deduction for Salary – प्राप्तिकरातून थेट ५० हजारांची कपात

आज आपण बघणार आहोत Standard Deduction for Salary म्हणजे काय? ज्यामुळे प्राप्तिकरदात्यांना त्यांच्या प्राप्तिकरातून थेट ५० हजाराची वजावट मिळू शकेल. ही वजावट मिळवणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी प्राप्तिकरदात्यांना कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीची गरज पडत नाही किंवा कुठलाही अतिरिक्त खर्च करावा लागत नाही.

standard deduction for salary

स्टॅंडर्ड डिडक्शन (Standard Deduction for Salary) म्हणजे कर्मचाऱ्याने ठराविक आर्थिक वर्षात मिळवलेल्या पगाराच्या उत्पन्नावर भारतीय आयकर कायद्यानुसार ५० हजार रुपये एवढी थेट वजावट मिळणे. ही वजावट आयकर कायद्याच्या (standard deduction u/s 16(ia)) नियमाप्रमाणे फक्त नोकरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा दरमहा पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तीला मिळते. व्यावसायिक किंवा नोकरी किंवा पेन्शन व्यतिरिक्त उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीला ही वजावट मिळत नाही.

स्टँडर्ड डिडक्शन मिळवण्यासाठी पात्रता (Who is eligible for standard deduction?)

आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे ५० हजार रुपयांचं स्टॅण्डर्ड डिडक्शन मिळवण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे आहे -

तुम्हाला हेदेखील आवडेल: How to save tax other than 80C

नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन मिळेल का? (Standard Deduction In New Tax Regime)

फेब्रुवारी २०२३ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून, नवीन कर प्रणाली अंतर्गत नोकरदार करदाते ५० हजार रु.च्या Standard Deduction साठी पात्र आहेत.

पेन्शनर करदात्यांना स्टँडर्ड डिडक्शन मिळेल का? (standard deduction for pensioners)

फेब्रुवारी २०२३ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून, नवीन कर प्रणाली अंतर्गत पेन्शनर असलेले करदाते सुद्धा ५० हजार रु.च्या Standard Deduction साठी पात्र असतील.

जुन्या कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन मिळेल का? (standard deduction in old tax regime)

आयकर कायद्यानुसार, जुन्या करप्रणाली अंतर्गतसुद्धा नोकरदार करदाते आणि पेन्शनर असलेले करदाते या दोघांनाही ५० हजार रु.चं Standard Deduction मिळू शकतं.

स्टँडर्ड डिडक्शन कसे मिळेल? (how to claim standard deduction for Salary)

आयकर कायद्याच्या कलम १६(आयए) (standard deduction u/s 16(ia)) नुसार पगारदार आणि पेन्शनर असलेल्या करदात्यांना त्याच्या उत्पन्नातून ५० हजार रुपयांची थेट वजावट मिळेल.  त्यासाठी करदात्यांना काहीच करावं लागत नाही.

मात्र याबाबतीत दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत -

तर मंडळी, अशा प्रकारे स्टॅंडर्ड डिडक्शनचा फायदा नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांना मिळतो. खासकरून, पेन्शनर करदात्यांना याचा उपयोग होतो कारण त्यांना नोकरदार करदात्यांसारखे इतर कुठलेच भत्ते मिळत नाहीत. मात्र, याचा फायदा जर तुमचं उत्पन्न करपात्र असेल तर होतोअन्यथा या स्टँडर्ड डिडक्शनचा काहीच उपयोग होत नाही.

तर मंडळी, आज आपण Standard Deduction for Salary याची माहिती घेतली. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळींबरोबर तसंच सोशल मीडिया वेबसाईट्सवर नक्की शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा याची माहिती होईल, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top