म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Tata Mutual Fund

मंडळी म्युच्युअल फंडाबद्दल (tata mutual fund) आपण अनेकदा ऐकलं असेल. म्युच्युअल फंड सही है, म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क प्लीज रीड डॉक्युमेंट्स केअरफुल्ली बिफोर इन्वेस्टींग असे डायलॉग आपण टीव्ही वरील जाहिरातीतून बघतो आणि ऐकतो. पण म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय?

म्युच्युअल फंड म्हणजे एक असा फंड आहे ज्यात अनेक लोकांकडून पैसे गोळा केले जातात आणि ते पैसे जास्तीत जास्त चांगल्या ठिकाणी गुंतवले जातात ज्यातून गुंतवणूकदारांना अधिकाधिक फायदा होईल.

म्युच्युअल फंडातील रकमेचं नियोजन करण्यासाठी गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक केलेली असते. त्यांना फंड मॅनेजर म्हणतात. म्युच्युअल फंडातील रक्कम किती, कुठे आणि कशी गुंतवणूक करायची याचं नियोजन हेच फंड मॅनेजर करतात. हे फंड मॅनेजर गुंतवणूक क्षेत्रातील खूप अनुभवी लोक असतात. त्यामुळे त्यांना कुठे गुंतवणूक करायची, कधी पैसे गुंतवायचे आणि कधी त्यातून बाहेर पडायचे याचा सुद्धा खूप अनुभव असतो. त्यामुळे त्यांचं फायदा मिळवण्याचं प्रमाण जास्त असतं.

म्युच्युअल फंड कंपनी जी गुंतवणूक करते म्हणजे त्यांनी घेतलेले शेअर्स, बॉण्ड्स हे गुंतवणूकदाराच्या नावावर होत नाहीत. म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड कंपनीच्या नावाचे समभाग म्हणजे शेअर्स देते त्याला म्युच्युअल फंड युनिट्स असं म्हणतात. या युनिट्स ची ठराविक किंमत असते म्हणजे १०० रु, ५०० रु अशी साधारणपणे त्या युनिट्सची किंमत असते आणि गुंतवणूकदार जेवढे पैसे गुंतवेल तेवढे युनिट्स म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदाराच्या नावावर करते.

मात्र गुंतवणूकदार हे ठरवू शकतो कि त्याने केलेल्या गुन्तवणुकीच्या रकमेतून किती गुंतवणूक शेअर्स मध्ये करायची, किती गुंतवणूक बॉन्ड्समध्ये करायची आणि ज्यावेळी गुंतवणूकदाराला पैसे हवे असतात तेव्हा म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचा आवश्यक तेवढा हिस्सा विकून गुंतवणुकीच्या प्रमाणात रक्कम गुंतवणूकदाराला परत देते.

tata mutual fund

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी? (why to invest in tata mutual fund)

बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असतात. मुदत किंवा आवर्ती ठेव, शेअर्स, बॉण्ड्स, रिअल इस्टेट म्हणजे जमीन किंवा बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक, सोन्यातील गुंतवणूक इत्यादी. मात्र मुदत किंवा आवर्ती ठेव सोडले तर बाकीच्या गुंतवणुकींमध्ये अनुभव आणि अभ्यासाची गरज लागते.

शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचे साधारणपणे ३ प्रकार आहेत.
पहिल्या प्रकारात गुंतवणूकदार स्वतः शेअर्स मध्ये गुंतवणूक करतो. या प्रकारात तो स्वतः शेअर्स चा म्हणजे कंपन्यांचा अभ्यास करतो आणि स्वतःच खरेदी विक्री करतो. यात होणारा फायदा तोटा या दोन्ही ला तो जबाबदार असतो. या प्रकारात गुंतवणूकदार अनुभवी असेल तर ठीक नाहीतर त्याला शेअर बाजाराची माहिती मिळवायला खुप वेळ लागतो.

दुसऱ्या प्रकारात गुंतवणूकदार एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊन व्यवहार करू शकतो. तो तज्ञ् गुंतवणूकदाराला चांगले शेअर्स सुचवू शकतो. पण पहिली गोष्ट म्हणजे त्याची फी गुंतवणूकदाराला द्यावी लागते जी थोडी महाग असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारालाच करावे लागतील. त्यामुळे खरेदी विक्रीतून होणार नफा त्या तज्ज्ञाची फी भरण्यातच खर्च होऊ शकतो.

आणि तिसरा पर्याय आहे म्युच्युअल फंडाचा. या बाबतीत स्वतः गुंतवणूकदाराला फक्त फंडात पैसे गुंतवायचे असतात. बाकी काम म्हणजे चांगले शेअर्स किंवा इतर गुंतवणुकीचे पर्याय शोधणे, त्यात योग्य वेळी गुंतवणूक आणि योग्य वेळी बाहेर पडणे, सगळ्या गोष्टीचा हिशोब ठेवणे अशी काम म्युच्युअल फंडाची टीम करत असते. तसंच म्युच्युअल फंडातील फंड मॅनेजर या गोष्टींमध्ये तज्ज्ञ असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या व्यवहारात तोटा होण्याचं प्रमाण कमी असतं. यात गुंतवणूकदाराला फी द्यावी लागते पण ती त्या मानाने खूप कमी असते. म्हणून निदान सुरुवातीला म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची फार माहिती नसेल तेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण केव्हाही चांगलं.

मंडळी आता आपल्या लक्षात आलं असेल कि म्युच्युअल फंडात पैसे का गुंतवावेत? आता बघूया म्युच्युअल फंडाचे प्रकार कोणकोणते आहेत ते.

म्युच्युअल फंडाचे प्रकार (Types of tata mutual fund)

तसे म्युच्युअल फंडाचे बरेच प्रकार आहेत पण ढोबळमानाने चार प्रकार धरले जातात.

तर म्युच्युअल फंडाचे हे चार प्रमुख प्रकार आहेत. यापेक्षाही इतर अनेक प्रकार आहेत जसं इंडेक्स फंड ज्यामध्ये निफ्टी किंवा सेन्सेक्स अशा इंडेक्स म्हणजे निर्देशांकात गुंतवणूक केली जाते.

मंडळी म्युच्युअल फंडाबद्दल माहिती बघितल्यावर आता बघूया त्याचे फायदे.

म्युच्युअल फंडाचे फायदे (Benefits of tata mutual fund)

तर मंडळी हे होते म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे काही फायदे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शक्यतो दीर्घकाळासाठी करावी ज्यामुळे त्याचा अपेक्षित फायदा आपल्याला मिळतो. तसंच आपल्या आयुष्यातील मोठी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो. तेव्हा नक्की या पर्यायाचा विचार गुंतवणुकीसाठी करा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top