Transfer money from credit card to bank account - क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणे हा हल्ली एक ट्रेंड झालाय. कारण क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणं हे अतिशय सोपं असतं. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रोख रक्कम बाळगावी लागत नाही. तसंच तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे सहजपणे खरेदी करून शकता. तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरल्याबद्दल अनेक प्रकारची डिस्काउंट, कुपन्स, कॅशबॅक यासारखे अनेक फायदे मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्यात एकही रुपया नसताना तुम्ही खरेदी करू शकता.
पण आज आपण क्रेडिट कार्डविषयी थोडी वेगळी माहिती बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे (Transfer money from credit card to bank account)?
Table of Contents
क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे का ट्रान्सफर करावेत? (Why transfer money from credit card to bank account?)
मंडळी, आपण क्रेडिट कार्ड वापरून अनेक प्रकारे खरेदी करू शकतो. मात्र काही प्रकारच्या व्यवहारामध्ये क्रेडिट कार्ड द्वारे आपण पैसे देऊ शकत नाही. त्यामध्ये आयुर्विम्याचे हप्ते, कर्जाचे हप्ते यासारखे इतरही काही आर्थिक व्यवहार क्रेडिट कार्डचा वापर करून केले जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, आपण आपल्या क्रेडिट कार्डमधून आपल्या बँक खात्यात पैसे पाठवू शकता आणि त्यानंतर आपल्याला असे व्यवहार जे क्रेडिट कार्ड चा वापर करून करता येत नाहीत ते बँक खात्याचा वापर करून सहजपणे पूर्ण करता येतात.
तर आता आपण बघूया क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे (how to transfer money from credit card to bank account)?
क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे? (How to transfer money from credit card to bank account?)
- बँक खात्यात थेट पैसे पाठवायची सुविधा वापरून : बऱ्याच बँका क्रेडिट कार्ड वरून तुमच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवायची सुविधा उपलब्ध करून देतात. ही पैसे पाठवण्याची प्रक्रिया संबंधित बँकेच्या मोबाईल अँप्लिकेशन किंवा वेबसाईट चा वापर करून पूर्ण करता येते. मात्र क्रेडिट कार्ड वरून तुमच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवायच्या व्यवहारांवर काही मर्यादा पण असतात. म्हणजे दर दिवशी, दर आठवड्याला किंवा दर महिन्याला ठराविक व्यवहार करता येतील किंवा क्रेडिट कार्ड वरून तुमच्या बँक खात्यात रक्कम पाठवण्याची सुद्धा मर्यादा असू शकते आणि या मर्यादा प्रत्येक बँकेनुसार बदलू शकतात. त्यामुळे क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी आधी हे सगळे नियम नीट माहिती करून घ्या.
-
नेट बँकिंग : हल्ली सगळ्या बँकांमध्ये नेट बँकिंग ची सेवा उपलब्ध असते. त्यासाठी
1. तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉग इन करा,
2. त्यामधील 'क्रेडिट कार्ड' सेक्शनमध्ये जा,
3. 'फंड ट्रान्सफर' हा पर्याय निवडा,
4. तुम्हाला जी रक्कम क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पाठवायची असेल ती रक्कम तिथं लिहा.
त्यानंतर तुमचा संबंधित व्यवहार पूर्ण करण्यासाठी बॅंकेने दिलेल्या काही नियमांचं अनुसरण करा म्हणजे तुमचा क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात रक्कम पाठवण्याचा व्यवहार पूर्ण होईल.
मात्र कुठल्याही बँकेचं मोबाईल अँप डाउनलोड करताना किंवा नेट बँकिंगची सुविधा वापरताना संबंधित बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वरूनच करा कारण तेच १००% खात्रीशीर व्यवहार करण्याचं ठिकाण असतं. -
फोन कॉल : हल्ली बऱ्याच क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणाऱ्या संस्था फोन कॉलद्वारे क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यासाठी तुम्हाला
संबंधित बँकेच्या नंबरवर कॉल करून बँकेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा लागेल.
तसंच, त्यांनी विचारलेल्या आवश्यक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील किंवा त्यांनी विचारलेला तपशील द्यावा लागेल आणि मग त्यांना क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवण्याची विनंती करावी लागेल. त्यानंतर तुमच्या क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया संबंधित प्रतिनिधी पूर्ण करतील.
मात्र फोन बँकिंगद्वारे कुठलाही व्यवहार करताना संबंधित संपर्क क्रमांक किंवा फोन नंबर बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वरूनच घ्या कारण बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईटवरील क्रमांकच १००% खात्रीशीर असतात. - चेक द्वारे व्यवहार करणे : मंडळी अनेक क्रेडिट कार्ड देणाऱ्या संस्था चेकबुक सुद्धा देतात. त्यामुळे तुम्हाला चेकद्वारे सुद्धा पैसे बँक खात्यात पाठवता येतात. त्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड देणाऱ्या संस्थेने दिलेला चेक स्वत:च्या नावाने लिहावा लागेल आणि तो बँकेत भरावा लागेल. त्यानंतर बँकेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.
- एटीएम मधून पैसे काढून बँक खात्यात भरणे - हा सुद्धा क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे भरण्याचा एक सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला एटीएम मध्ये जाऊन क्रेडिट कार्ड चा वापर करून पैसे काढावे लागतील आणि मग ते पैसे बँक खात्यात भरावे लागतील.
- बँकेच्या शाखेला भेट देऊन - या प्रकारात पैसे काढण्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलेल्या बँकेच्या शाखेत जावं लागेल आणि बँकेच्या कॅशियरला क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवण्याची विनंती करावी लागेल. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवण्याचा व्यवहार पूर्ण करता येईल.
तर मंडळी आत्ता आपण बघितलं क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करायचे? (How to transfer money from credit card to bank account?)
आता बघूया क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील?
क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी (Before transferring money from credit card to bank account)
तुमच्या क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवणे सोयीस्कर वाटतं, पण हे करण्याआधी काही महत्वाचे मुद्दे विचारात घ्यावे लागतील -
- क्रेडिट कार्डचा उपयोग हा प्रामुख्याने थेट पेमेंट करण्यासाठी असतो, त्यामुळे अगदी नाइलाजच असेल तरच क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवावेत.
- क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवण्याची मर्यादा ओलांडल्यास प्राप्तिकर विभागाकडून चौकशी होऊ शकते आणि वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या व्यवहारांमुळे प्राप्तिकर अधिकाऱ्यांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाऊ शकते.
- क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवल्याने क्रेडिट कार्डचं बिल जास्त येऊ शकतं. क्रेडिट कार्डची ही थकबाकी वेळेवर भरणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि पर्यायाने त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो.
- क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवण्याचे काही चार्जेस बँक तुमच्याकडून घेऊ शकते. त्यामुळे अगदी आपत्कालीन परिस्थितीतच हा पर्याय वापरणं योग्य ठरेल.
त्यामुळे क्रेडिट कार्डवरून बँक खात्यात पैसे पाठवण्याचा विचार करण्यापूर्वी (Before transferring money from credit card to bank account) आत्ताचा लेख पुन्हा नीट वाचा आणि तुमच्या मित्रमंडळींना पण वाचायला द्या म्हणजे त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल. धन्यवाद.