What are Penny Stocks in marathi | पेनी स्टॉक्स म्हणजे काय?

penny stocks

मंडळी, आज आपण पेनी स्टॉक्स (Penny Stocks) बद्दल माहिती घेणार आहोत. पेनी स्टॉक्स हा शेअर मार्केट मधला एक खूप महत्वाचा विषय आहे. पेनी स्टॉक्स बद्दल अनेक समज गैरसमज आहेत आणि त्यामुळे चांगल्या वाईट घडामोडी घडत असतात.

पेनी स्टॉक्स (Penny Stocks) हा खासकरून नवीन गुंतवणूकदार, ज्यांना शेअर मार्केटची फारशी माहिती नाही तसंच जे दुसऱ्यांकडून टिप्स घेऊन शेअर्स खरेदी करतात अशा लोकांचा खास विषय आहे.

पेनी म्हणजे ब्रिटिशांचे म्हणजे इंग्रजांचे पैसे. जसं आपलं रुपये आणि पैसे ही जोडी आहे तशी इंग्रजांची पौंड्स आणि पेनी अशी जोडी आहे. तर इंग्रजांकडे पेनीमध्ये म्हणजे काही पैशात मिळणारे शेअर्स म्हणजे पेनी स्टॉक किंवा शेअर्स.

तसंच भारतात पेनी स्टॉक म्हणजे १० ते २० रुपयांपर्यंत मिळणारे शेअर्स ही त्याची साधारण व्याख्या आहे किंवा अगदी स्वस्तात मिळणारे शेअर्स म्हणजे पेनी स्टॉक.

Penny Stocks मध्ये लोक गुंतवणूक का करतात?

हल्ली अनेक विडिओ आपण बघतो जे आपल्याला स्वप्न दाखवतात कि अमुक करा करोडपती व्हा! तमुक करा करोडपती व्हा! तसच आपण असेही विडिओ बघितले असतील जे आपल्याला पेनी स्टॉकसची एक यादीच देतात जे शेअर्स खरेदी करून आपण करोडपती होऊ असा त्यांचा दावा असतो.

आता करोडपती होण्याची इच्छा कुणाची नसते. त्यातुन इतका सोपा उपाय मिळाला तर कुणालाही भुरळ पडेल कि पटापट पेनी स्टॉकस घेऊ आणि करोडपती होऊ. या विचाराने अनेक जण पेनी स्टॉकस मध्ये पैसे लावतात आणि बहुतेक जण पस्तावतात. कारण अशा प्रकारच्या शेअर्स ची कुठलीही खात्री नसते. या शेअर्सचा भाव वाढला तर वाढतो नाहीतर अनेक दिवस, अनेक महिने आहे तिथंच राहतो किंवा कमी सुद्धा होतो. त्यामुळे गुंतवणूकदार आपले पैसे घालवून बसतो.

Penny Stocks चांगले असतात का?

सर्वप्रथम पेनी स्टॉक चांगले असते तर ते मुळात पेनी स्टॉक राहिलेच नसते म्हणजे त्यांची किंमत १० रुपयांपर्यंत खाली आलीच नसती. कारण कुठल्याही शेअरचा भाव त्या कंपनीच्या चांगल्या किंवा वाईट कामगिरीवर ठरत असतो. त्यामुळे कंपन्यांचे भाव पेनी स्टॉक च्या श्रेणीमध्ये येतात याचा अर्थ नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी शेअर चा भाव इतका खाली आणायला कारणीभूत आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे पेनी स्टॉक चांगले असते तर मोठे मोठे गुंतवणूकदार, म्युचुअल फंडवाले, मोठमोठ्या कंपन्या ज्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात त्यांनी इन्फोसिस, रिलायन्स, आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा चांगल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पेनी स्टॉक मध्ये पैसे लावले नसते का?

Penny Stocks चा भविष्यात भाव वाढेल का?

कुठल्याही शेअर चा भाव एवढा कोसळण्यामागे नक्की तसेच काहीतरी कारण असतं.

उदाहरणार्थ,
कंपनीचं संचालक मंडळ चांगलं नसेल.
कंपनीवर कर्ज असेल.
कंपनीमध्ये काहीतरी घोटाळा झाला असेल.

अशी अनेक कारणं असतात जी शेअरचा भाव कोसळण्यामागे असू शकतात. त्यामुळे अशा कंपन्याना कधी कधी शेअर मार्केटमधून बाहेर सुद्धा काढलं जातं. त्यामुळे त्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक बुडीत जाते आणि यात नुकसान गुंतवणूकदारांचं होतं. त्यामुळे अशा शेअर्स मध्ये गुंतवणूक करणं शक्यतो टाळावं.

Penny Stocks मध्ये गुंतवणूक करावी का?

आत्तापर्यंत बघितलेल्या माहितीनुसार आपल्याला लक्षात आलं असेल कि पेनी स्टॉक घेणं किती धोक्याचं आहे. यात गुंतवलेले पैसे बहुतेक वेळा बुडण्याचीच शक्यता असते.

अनेक गुंतवणूकदार असा विचार करतात कि स्वस्त शेअर्स घेतल्याने शेअर्सची संख्या जास्त मिळते. पण शेअर्सची संख्या जास्त मिळून शेअरचा भाव कमी होत राहिला तर त्या जास्त शेअर्स चा काय उपयोग? त्याउलट जर चांगल्या स्थितीत असलेल्या कंपनीचा एकच शेअर घेतला तर निदान त्याचा भाव वाढेल याची तरी खात्री असते.

तसेच चांगल्या कंपनीच्या शेअर्स वर डिविडेंड मिळू शकतो. कधी तरी बोनस मिळायची पण शक्यता असते. पेनी स्टॉक मध्ये हे कुठलेही फायदे मिळत नाहीत. त्यामुळे पेनी स्टॉक घेणं शक्यतो टाळावं हे योग्य ठरेल.

Penny Stocks मूळे गुंतवणूकदार खरंच करोडपती होतात का?

थोडक्यात, पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करून करोडपती होता येत असतं तर वॉरेन बफे, राकेश झुनझुनवाला यांसारख्या शेअर मार्केट मधील दिग्गज लोकांनी पेनी स्टॉक मधेच गुंतवणूक केली नसती का?

त्यामुळे पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करून करोडपती होणं म्हणजे फक्त कल्पनाविलास आहे. यात काहीही तथ्य नाही. पेनी स्टॉकमुळे करोडपती होता येत असतं तर घरोघरी करोडपती दिसले असते आणि अजून तरी तस काही दिसत नाही. त्याचा अर्थ पेनी स्टॉकच्या नादाला लागून आपला पैसा वाया घालवण्यापेक्षा एखादा चांगला शेअर घेऊन निदान चांगला फायदा तरी मिळवूया.

मंडळी, आपल्या सर्वाना विनंती आहे कि हा लेख जास्तीत जास्त शेअर करा जेणेंकरून पेनी स्टॉक (Penny Stocks) बद्दल असलेले लोकांचे गैरसमज दूर होतील आणि गुंतवणूकदार अशा शेअर्स पासून दूर राहतील आणि चांगल्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top