What is 87A Rebate – ५ ते ७ लाखाच्या उत्पन्नावर प्राप्तिकराच्या सूट

87A Rebate

आज आपण आयकर कायद्याच्या 87A या कलमाविषयी माहिती बघणार आहोत, ज्याअंतर्गत प्राप्तिकरदात्याला कराच्या रकमेत सूट (87A Rebate) मिळते. मात्र, 87A अंतर्गत Rebate किंवा सूट मिळवण्यासाठी प्राप्तिकरदात्याला इनकम टॅक्स रिटर्न मात्र न चुकता भरावा लागतो. अन्यथा ही सूट मिळत नाही.

आज आपण आयकर कलम 87A Rebate विषयी जी माहिती बघणार आहोत, ती आर्थिक वर्ष २०२३-२४ किंवा मूल्यांकन वर्ष २०२४-२५ (Rebate under section 87A for ay 2024-25) साठी बघणार आहोत.

कलम 87A अंतर्गत वैयक्तिक करदात्यांना (म्हणजे स्वतः करदाता व्यक्ती जो स्वतःसाठी वजावटीचा दावा करतो) जर त्यांचं उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यांना सवलत मिळते.

ही सूट सगळ्या प्रकारच्या वजावटी केल्यानंतर जो उत्पन्नाचा आकडा उरतो तो ५ लाखांपर्यंतच असेल तर त्यावर मिळते. वजावटी म्हणजे आयकर कलम 80C ते 80U दरम्यान जी आयकरातील कलमं आहेत त्या अंतर्गत ज्या काही वजावटी मिळतात त्या सर्व वजावटी केल्यावर 87A Rebate मिळते.

मात्र, सर्व वजावटी करून सुद्धा उत्पन्न ५ लाखापेक्षा जास्त होत असेल तर मात्र 87A अंतर्गत Rebate मिळत नाही.

यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, कलम 87A अंतर्गत जी सूट मिळते ती जास्तीत जास्त १२,५०० रुपये एवढी मिळते. म्हणजे जर तुमच्या कराची आकडेमोड करून कराची रक्कम १००० रुपये एवढी होत असेल तर 87A अंतर्गत सूट सुद्धा १००० रुपयांचीच मिळेल आणि जास्तीत जास्त १२,५०० रुपये मिळेल.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल: आयकर कलम 80C अंतर्गत वजावटी

87A Rebate साठी कोण पात्र आहे? (Who is eligible for an 87A Rebate?)

87A Rebate साठी पात्रता खालीलप्रमाणे आहे -

87A मध्ये जेष्ठ नागरिकांना सूट मिळते का? (Section 87A Rebate for senior citizens?)

जेष्ठ नागरीक ज्यांचं वय ६० पेक्षा जास्त आणि ८० पेक्षा कमी आहे अशा सर्वांना 87A मध्ये प्राप्तिकरात सूट मिळते.

मात्र, ८० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना 87A मध्ये सूट मिळत नाही कारण त्याच्यासाठी निर्धारित केलेल्या कररचनेत पहिल्या ५ लाखापर्यंत मुळातच प्राप्तिकर भरावा लागत नाही.

कलम 87A HUF ला लागू आहे का? (Section 87A Rebate for HUF)

आयकर कलम 87A च्या नियमाप्रमाणे ही सवलत फक्त वैयक्तिक करदात्यांना मिळते. त्याशिवाय कुणालाही मिळत नाही त्यामुळे अगदी HUF म्हणजे Hindu Undivided Family (हिंदू अविभक्त कुटूंब) यांना सुद्धा ही सवलत मिळत नाही.

87A अंतर्गत सूट नवीन करप्रणाली मध्ये मिळेल का? (87A rebate in new tax regime)

आत्तापर्यन्त आपण बघितलेली माहिती जुन्या करप्रणालीला (rebate under section 87A old regime) गृहीत धरून दिली होती. पण आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी केलेल्या बदलांनुसार नवीन करप्रणालीसाठी सुद्धा 87A अंतर्गत सूट मिळते आणि ही सूट ७ लाख एवढ्या रकमेपर्यंत मिळते.

म्हणजे जुन्या करप्रणालीमध्ये ही सूट ५ लाख रकमेपर्यंतच्या उत्पन्नावर होती तसंच नवीन करप्रणालीमध्ये ही सूट ७ लाख रकमेपर्यंतच्या उत्पन्नावर मिळते. मात्र त्यापक्षा जास्त उत्पन्नाच्या रकमेवर ही सूट मिळत नाही.

87A साठी प्राप्तिकराची आकडेमोड (How is section 87A rebate calculated)

खालील टेबल मध्ये आपण जुन्या आणि नव्या अशा दोन्ही करप्रणाली गृहीत धरून आकडेमोड करून दाखवली आहे. या उदाहरणामध्ये आपण जुन्या करप्रणाली साठी ५ लाख आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्नावरची आकडेमोड आणि 87A अंतर्गत मिळणारी सूट तसंच नवीन करप्रणालीसाठी ७ लाख आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्नावरची आकडेमोड आणि 87A अंतर्गत मिळणारी सूट दाखवली आहे.


जुनी करप्रणाली 

नवीन करप्रणाली 

एकूण उत्पन्न 

(सर्व वजावटी केल्यानंतर)

५,००,०००

५,५०,०००

७,००,०००

७,५०,०००

पहिला टॅक्स स्लॅब 

२,५०,०००

२,५०,०००

३,००,०००

३,००,०००

करपात्र उत्पन्न (प्राथमिक)

२,५०,०००

३,००,०००

४,००,०००

४,५०,०००

देय प्राप्तिकराची रक्कम (५%) 

१२,५००

२२,५००


३०,०००

87A ची सूट 

१२,५००

NIL

२५,०००

NIL

देय प्राप्तिकराची रक्कम (87A लागू झाल्यानंतर)

NIL

२२,५००

NIL

३०,०००

आरोग्य आणि शिक्षण उपकर @ 4%

-


९००

-

१,२००

अंतिम देय कर

-

२३,४००

-

३१,२००


जुन्या करप्रणालीमध्ये उत्पन्न ५ लाखापेक्षा जास्त असेल तर 87A अंतर्गत सूट मिळत नाही. (पिवळा स्तंभ)

नवीन करप्रणालीमध्ये उत्पन्न ७ लाखापेक्षा जास्त असेल तर 87A अंतर्गत सूट मिळत नाही. (हिरवा स्तंभ)


आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयकर सूट मर्यादा किती आहे? (What is the income tax exemption limit for FY 2023-24?)

वर बघितलेल्या उदाहरणानुसार -

तात्पर्य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top