करपात्र उत्पन्न म्हणजे काय । What is Taxable Income

करपात्र उत्पन्न म्हणजे काय

What is Taxable Income - मंडळी, अनेकांना हा प्रश्न पडतो कि करपात्र उत्पन्न म्हणजे काय? आपण जे उत्पन्न मिळवतो त्यावर आयकर भरायचा का नाही हे कसं ठरवणार? समजा भरायचा असेल तर किती भरावा लागेल हे कसं कळेल? त्याची आकडेमोड कशी करायची असे अनेक प्रश्न सामान्य माणसांना पडतात आणि माहितीच्या अभावी हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात.

आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत करपात्र उत्पन्न म्हणजे काय? (What is Taxable Income) आपलं उत्पन्न करपात्र आहे कि नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी आवश्यक गोष्टी काय काय आहेत? त्यासाठी आकडेमोड कशी करायची?

सोप्या भाषेत सांगायचं तर करपात्र उत्पन्न किंवा taxable income म्हणजे असं उत्पन्न ज्यावर आयकर भरावा लागतो. आपल्या आयकर विभागाने त्यासाठी कररचना किंवा टॅक्स स्लॅब ठरवून दिले आहेत. त्यानुसार तुमचं उत्पन्न जेवढं असेल तेवढा आयकर तुम्हाला भरावा लागतो.

कररचना किंवा टॅक्स स्लॅब म्हणजे आयकर विभागाने ठरवून दिलेल्या करदात्याच्या उत्पन्नासाठीच्या काही मर्यादा आहेत. प्रत्येक मर्यादेची ठराविक टक्केवारी दिलेली आहे. त्यातल्या ज्या मर्यादेत करदात्याचं उत्पन्न बसत असेल त्या मर्यादेची टक्केवारी त्याच्या उत्पन्नवार लागू होते.

करदात्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यात वैयक्तिक करदाता, HUF म्हणजे हिंदू अनडीवायडेड फॅमिली, व्यावसायिक करदाते, कंपन्या, फर्म्स, सहकारी संस्था यांचा समावेश होतो. आज आपण त्यातल्या वैयक्तिक करदाता म्हणजे एका व्यक्तीच्या उत्पन्नावर आयकराची आकडेमोड कशी करायची ते बघणार आहोत.

वैयक्तिक करदात्याचे सुद्धा चार प्रकार आहेत.
पहिला प्रकार आहे सामान्य करदाते ज्यांचं वय ६० पेक्षा कमी आहे,
दुसरं प्रकार आहे महिला करदाते,
तिसरा प्रकार सिनियर सिटीझन म्हणजे जेष्ठ नागरिक ज्यांचं वय ६० पूर्ण असेल पण ८० पेक्षा कमी असेल आणि चौथा प्रकार सुपर सिनियर सिटीझन म्हणजे जेष्ठ नागरिक ज्यांचं वय ८० पेक्षा जास्त आहे.

आपण करपात्र उत्पन्न म्हणजे काय? (What is Taxable Income) हे बघितलं. आता त्यातल्या सामान्य करदात्यांच्या म्हणजे ज्यांचं वय ६० पेक्षा कमी आहे अशा करदात्यांच्या उत्पन्नाची आकडेमोड कशी करायची ते बघूया.

करपात्र उत्पन्नाची मर्यादा । Tax Slabs of Income

त्यासाठी आपल्याला आधी कररचना समजून घ्यावी लागेल. ही कररचना जुनी आहे म्हणजे सध्या कररचनेचे दोन प्रकार आहेत जुनी कररचना आणि नवीन कररचना. नवीन कररचनेविषयी आपण पुढील एखाद्या लेखामध्ये माहिती घेऊ.

वार्षिक उत्पन्न 

जुनी आयकर रचना

० ते २,५०,००० 

०%

२,५०,००० ते ५,००,०००

५%

५,००,००० ते १०,००,०००

२०%

१०,००,००० पेक्षा जास्त 

३०%

आता जे टेबल दिसतंय त्यात जुन्या कररचनेच्या मर्यादा दिल्या आहेत. त्यानुसार जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत असेल तर तुम्हाला आयकर भरावा लागत नाही.
जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त पण पाच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ५ टक्के आयकर भरावा लागतो.
जर तुमचं उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त पण दहा लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला २० टक्के आयकर भरावा लागतो.
जर तुमचं उत्पन्न दहा लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ३० टक्के आयकर भरावा लागतो.

आता इथं सामान्यपणे एक गैरसमज होतो कि समजा तुमचं उत्पन्न १० लाख आहे तर तुम्हाला टॅक्स स्लॅब मध्ये दिल्याप्रमाणे २० टक्के म्हणजे १० लाखाच्या २० टक्के म्हणजे २ लाख रुपये आयकर भरावा लागेल. पण हा एक गैरसमज आहे. ही आकडेमोड अशी करत नाहीत.

उत्पन्न

टॅक्स स्लॅब

कराची रक्कम

१० लाख

२०%

२ लाख

करपात्र उत्पन्न म्हणजे काय? (What is Taxable Income) हे समजून घेण्यासाठी आपण ही आकडेमोड कशी करायची ते एका उदाहरणाद्वारे बघू.

करपात्र उत्पन्नाची आकडेमोड । Taxable Income Calculator

करपात्र उत्पन्न म्हणजे काय? (What is Taxable Income) हे समजून घेण्यासाठी आपण ही आकडेमोड जुन्या टॅक्स रेजिम (Tax Regime) किंवा कररचनेप्रमाणे करणार आहोत. टॅक्स रेजिम या प्रकाराविषयी आपण पुन्हा कधीतरी माहिती घेऊ. आता एवढंच लक्षात ठेवा कि आपण ही आकडेमोड जुन्या टॅक्स रेजिम प्रमाणे करणार आहोत.

करपात्र उत्पन्न म्हणजे काय? (What is Taxable Income)

वार्षिक पगार


९,००,०००

स्टॅंडर्ड डिडक्शन (फक्त नोकरदारांना)


(-) ५०,०००



८,५०,०००

इतर उत्पन्न (Income from other sources )


(+) १,००,०००



९,५०,०००

कलम ८०सी

(+) १,५०,०००


कलम ८० डी

(+) २५,०००


कलम ८० टीटीए

(+) १०,०००

(-) १,८५,०००



७,६५,०००

पहिला टॅक्स स्लॅब (अडीच लाखापर्यंत) ०%


दुसरा टॅक्स स्लॅब (अडीच ते पाच लाखापर्यंत) ५%

(+) १२,५००


तिसरा टॅक्स स्लॅब (अडीच ते पाच लाखापर्यंत) २०%

(+) ५३,०००

६५,५००

सेस म्हणजे उपकर (४% )


(+) २,६२०

करपात्र रक्कम


६८,१२०

असं समजा कि तुम्ही नोकरी करत आहात आणि तुमचं पगारातून मिळणार उत्पन्न ९,००,००० रुपये आहे. आता तुम्ही नोकरी करत असल्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम ५० हजार रु स्टॅण्डर्ड डिडक्शन म्हणजे वजावट मिळेल. व्यावसायिकांना हे ५० हजाराचं स्टॅण्डर्ड डिडक्शन मिळत नाही. फक्त नोकरी करणाऱ्याना हे डिडक्शन किंवा वजावट मिळते. त्यामुळे ९ लाखातून ५० हजार थेट वजा होतील. म्हणजे उरले ८,५०,०००.

आता समजा तुमचं इतर काही उत्पन्न सुद्धा असेल म्हणजे एफडीच व्याज, शेअर्स विकून मिळालेले पैसे अशी उत्पन्न असतील. ते उत्पन्न समजा १ लाख रुपये आहे. हे उत्पन्न (income from other sources) या शीर्षकाखाली धरलं जातं. त्यामुळे आधीचे ८,५०,००० अधिक १ लाख म्हणजे आता तुमचं उत्पन्न ९,५०,००० एवढं झालं.

आता आयकर विभागाने करदात्यांना आयकरात सवलत मिळावी म्हणून काही पर्याय सुद्धा दिले आहेत. त्यात ८०सी म्हणजे आयकरात सवलत मिळवून देणाऱ्या बचत योजना जसं (पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, प्रोविडेंट फंड इत्यादी), ८०डी म्हणजे मेडिकल इन्शुरन्स, ८०टीटीए म्हणजे तुमच्या बचत खात्यातून मिळालेल्या १० हजार पर्यंतच्या व्याजावर सवलत असे पर्याय उपलब्ध आहेत.

तर तुम्ही ८० सी अंतर्गत दीड लाखापर्यंत सवलत मिळवू शकता. ८० डी अंतर्गत २५ हजार पर्यंत सवलत मिळवू शकता. ८० टीटीए अंतर्गत १० हजार पर्यंत सवलत मिळवू शकता.

तर असं समजा कि तुम्ही या तीनही पर्यायांचा उपयोग केला आहे म्हणजे ८० सी अंतर्गत दीड लाख, ८० डी अंतर्गत २५ हजार आणि ८०टीटीए अंतर्गत १० हजार म्हणजे एकूण मिळून १,८५,०० एवढी वजावट तुम्हाला मिळेल.

त्यामुळे आता तुमच्या ९,५०,००० या उत्पन्नातून १,८५,०० थेट वजा होतील म्हणजे उरले ७,६५,०० रुपये उरतील. त्यामुळे आयकराची आकडेमोड याच रकमेवर करावी लागेल.

आता आयकराची आकडेमोड करायला या ७,६५,०० रुपयांचे आधी तीन भाग करावे लागतील. पहिला भाग असेल शून्य ते अडीच लाखाचा. टॅक्स स्लॅबमधे दिल्या प्रमाणे पहिल्या अडीच लाख उत्पन्नावर टॅक्स भरावा लागत नाही.

आता दुसरा भाग आहे अडीच ते पाच लाखाचा म्हणजे दुसऱ्या अडीच लाखाचा. टॅक्स स्लॅबमधे दिल्या प्रमाणे तुमच्या उत्पन्नातील या भागावर ५ टक्के आयकर लागू होईल. अडीच लाखावर ५ टक्के म्हणजे १२,५०० रुपये.

आणि तिसरा भाग पाच लाख ते दहा लाखाचा. टॅक्स स्लॅबमधे दिल्या प्रमाणे तुमच्या उत्पन्नातील या भागावर २० टक्के आयकर लागू होईल. २,६५,०० वर २० टक्के म्हणजे ५३,००० रुपये.

त्यामुळे या सगळ्याची बेरीज होईल १२,५०० + ५३,००० = ६५,५०० रुपये. आता त्यावर ४% सेस म्हणजे उपकर सुद्धा आकारला जातो जो ६५,५०० रु च्या ४ टक्के म्हणजे २,६२० एवढा होईल म्हणजे तुम्हाला ६५,५०० + २६२० = ६८,१२० रुपये आयकर भरावा लागेल.

मंडळी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि जर तुमचं उत्पन्न ५ लाखापर्यंत असेल तर तुम्हाला कुठलाही आयकर भरावा लागत नाही. मग हे उत्पन्न सगळ्या वजावटी धरून ५ लाख असेल तरी तुम्हाला आयकर भरावा लागत नाही. त्यासाठी आपण हे दुसरं उदाहरण बघू.

करपात्र उत्पन्न म्हणजे काय? (What is Taxable Income)

वार्षिक पगार + इतर उत्पन्न 


७,३५,०००

स्टॅंडर्ड डिडक्शन (फक्त नोकरदारांना)


(-) ५०,०००



६,८५,०००

कलम ८०सी

(+) १,५०,०००


कलम ८० डी

(+) २५,०००


कलम ८० टीटीए

(+) १०,०००

(-) १,८५,०००



५,००,०००

पहिला टॅक्स स्लॅब (अडीच लाखापर्यंत) (०%)


दुसरा टॅक्स स्लॅब (अडीच ते पाच लाखापर्यंत) (५%)

(+) १२,५००

१२,५००

कलम ८७ए


(-) १२,५००

करपात्र रक्कम


समजा तुमचं उत्पन्न ७,३५,००० आहे आणि मगाशी बघितल्याप्रमाणे तुम्ही त्यातून अनेक वजावटी घेतल्या.
उदा. स्टॅण्डर्ड डिडक्शन ५० हजार, ८० सी, ८० डी आणि ८० टीटीए अंतर्गत एकूण मिळून १,८५,०० रु एवढी वजावट घेतली. तर या वजावटीनंतर तुमचं करपात्र उत्पन्न रु ५ लाख शिल्लक राहील.

आता यातील शून्य ते अडीच लाखावर टॅक्स भरावा लागणार नाही. त्यानंतर अडीच ते पाच लाख या स्लॅबसाठी ५% टक्के म्हणजे १२५०० एवढी टॅक्स ची रक्कम येईल. पण आयकर नियमाप्रमाणे तुमचं उत्पन्न ५ लाखपर्यंत असेल तर या १२,५०० रु वर तुम्हाला पूर्ण सवलत मिळते म्हणून टॅक्स ची रक्कम शून्य होईल.

मात्र जर तुमचं उत्पन्न ५ लाखापेक्षा एका रुपयांनी जरी जास्त झालं तर अडीच ते पाच लाख या टॅक्स स्लॅबसाठी येणारी १२५०० ही रक्कम तुम्हाला कराच्या रूपात भरावी लागेल त्यावर वजावट मिळणार नाही.

तर अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने आयकराची आकडेमोड करू शकतो. पण यापेक्षाही जास्त गोष्टी आयकराची आकडेमोड करताना असू शकतात. खऱ्या आयुष्यात उत्पन्नाचे अनेक स्रोत असू शकतात. तसेच आयकरात बचत करण्यासाठी केलेल्या अनेक प्रकारच्या गुंतवणुकी, गृहकर्ज, घरभाडे इत्यादी वजावटी असू शकतात. ते सगळे मुद्दे तुम्हाला आकडेमोड करताना गृहीत धरावे लागतील. त्यामुळे आयकराची आकडेमोड करताना या सगळ्या गोष्टींची माहिती आधी गोळा करा आणि मगच ही आकडेमोड करा.

यात एक गोष्ट अजून आहे ती म्हणजे टॅक्स रिजिम किंवा कररचनेचे पर्याय. आता आपल्याला टॅक्स रिजीमचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. जुना आणि नवा. जर तुम्ही ८० सी, ८० डी किंवा इतर पर्याय वापरून गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला जुना टॅक्स रिजिम उपयोगी पडेल. कारण नवीन टॅक्स रिजिम मध्ये या गुंतवणुकीचा काहीहि उपयोग होत नाही कारण नवीन टॅक्स रिजिम मध्ये या गुंतवणुकीमुळे वजावट मिळत नाही.

तर मंडळी आज आपण करपात्र उत्पन्न म्हणजे काय? (What is Taxable Income) आपण जे उत्पन्न मिळवतो त्यावर आयकर भरायचा का नाही हे कसं ठरवणार? समजा भरायचा असेल तर किती भरावा लागेल हे कसं कळेल? त्याची आकडेमोड कशी करायची? इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. ही सगळी आकडेमोड जुन्या कररचनेप्रमाणे होती. लवकरच आम्ही नवीन कररचनेसंबंधी माहिती घेऊन येऊ. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top