WhatsApp Banking म्हणजे काय | WhatsApp Banking 2023 in marathi

WhatsApp Banking

WhatsApp Banking म्हणजे काय - मंडळी, WhatsApp हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालाय. ज्यांच्याकडे फोन आहे त्यांच्याकडे बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप असतंच. त्यामुळेच अनेक व्यावसायिकांनी याचा फायदा घेऊन अनेक सुविधा व्हॉट्सअ‍ॅप वरून द्यायला सुरुवात केली. मग यात बँकांनीही उडी घेतली आणि सुरु केलं व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग.

सुरुवातीला बँकांनी हे प्रायोगिक तत्वावर सुरु केलं होतं आणि हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला. मग हळूहळू बँकांनी त्यावर अजून जास्त सुविधा द्यायला सुरुवात केली.

मंडळी, आज आपण याच व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग ची माहिती घेणार आहोत. ज्यात आपण बघणार आहोत -

मंडळी हल्ली सगळ्या गोष्टी डिजिटल व्हायला लागल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग हा या डिजिटल बँकिंगचाच एक प्रकार आहे, जो ग्राहकांना अनेक बँकिंगच्या संबंधित सुविधा पुरवतो तो सुद्धा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जे वापरायला अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या फोनमधलं व्हॉट्सअ‍ॅप हे अँप्लिकेशन वापरावं लागतं. यामध्ये तुम्हाला बँकांच्या अप्लिकेशन मध्ये लॉगिन करणे, बँकांच्या कॉल सेंटरला कॉल करणे आणि त्यांचे प्रतिनिधी तुमच्याशी बोलण्याची वाट बघत बसणे, बँकेच्या चकरा मारणे आणि कर्मचाऱ्यांशी वाद, रांगेत उभं राहणे यासारख्या गोष्टींपासून बऱ्याच अंशी सुटका मिळवून देतो. WhatsApp Banking मध्ये दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे सगळे दिवस सुविधा मिळते.

WhatsApp Banking चालू कसं करायचं?

तर मंडळी जर तुम्ही SBI चे खातेदार असाल तर नक्की हे करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल कि याचे किती फायदे आहेत.

WhatsApp Banking च्या सेवा?

मंडळी या व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग च्या माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या सेवा बँका देतात. त्यामध्ये

या आणि अशा अनेक सेवा आपल्याला मिळतात. या सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी आवश्यक आहेत.

WhatsApp Banking चे फायदे

तर मंडळी ही होती WhatsApp Banking ची माहिती. ही सुविधा मिळवण्यासाठी फक्त आपलं संबंधित बँकेत खात असावं लागतं, आपला मोबाईल क्रमांक खात्याशी जोडलेला असावा लागतो आणि आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप अँप्लिकेशन असावं लागतं. एवढं असेल तर आपण सहज व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगचा फायदा घेऊ शकता आणि घरबसल्या अनेक बँकेच्या सेवा मिळवू शकता. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top