How to save tax other than 80C | ८०सी व्यतिरिक्त आयकरात बचत

How to save tax other than 80c

How to save tax other than 80c - आज आपण बघणार आहोत, आयकर कलम ८०सी शिवाय अशी कुठकुठली कलमं आहेत जी प्राप्तिकरदात्यांना आयकरात वजावट मिळवून देतात. आयकर कलम ८०सी हे एक असं कलम आहे जे प्राप्तिकरदात्यांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आयकरात वजावट मिळवून देतं.

मात्र, आज आपण जी आयकरातील कलमं बघणार आहोत त्यामध्ये जास्तीकरून अशीच कलम आहेत ज्यात कुठलीही गुंतवणूक न करता आयकरात वजावट (How to save tax other than 80c) मिळवता येते.

तर आता बघूया आयकरातील अशी कलम जी ८०सी शिवाय (How to save tax other than 80c) आयकरात वजावट मिळवून देतात.

बचत खात्यावरील व्याजाच्या रकमेवर वजावट

आयकर कलम ८०टीटीए हा पहिला पर्याय आहे जो आपल्याला प्राप्तिकरात बचत मिळवून देतो. या कलमांतर्गत ठेवीदार बचत खात्यामध्ये जी रक्कम ठेवतात त्यावर त्यांना व्याज मिळत. त्या व्याजाच्या रकमेएवढी वजावट प्राप्तिकराच्या रकमेतून मिळते.

मात्र ही वजावट मिळवण्यासाठी कमाल मर्यादा १० हजार रुपयांची आहे. म्हणजे तुम्हाला बचत खात्यावर व्याज कितीही मिळालं तरी त्यावर जास्तीत जास्त १० हजारांचीच वजावट मिळते. तसंच ही वजावट फक्त सामान्य करदाते म्हणजे ज्यांचं वय ६० पेक्षा कमी आहे त्यांनाच मिळते.

तसंच या बाबतीत दुसरा पर्याय आहे आयकर कलम ८०टीटीबी, ज्याअंतर्गत जेष्ठ नागरिकांना बचत खात्यावरील व्याजाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार पर्यंत वजावट मिळते. म्हणजे तुम्हाला बचत खात्यावर व्याज कितीही मिळालं तरी त्यावर जास्तीत जास्त ५० हजारांचीच वजावट मिळते.

Section 80TTA आणि 80TTB संबंधी लेख आम्ही आधीच लिहीला आहे. तो आपण वाचून त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील रकमेवर वजावट

आयकर कलम ८०डी या कलमांतर्गत आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील रकमेएवढी वजावट करदात्याला मिळू शकते. आरोग्य विमा म्हणजे मेडिकल इन्शुरन्स किंवा वैद्यकीय विमा ज्याचा उपयोग आपल्याला अनेक प्रकारच्या वैद्यकीय खर्चासाठी होऊ शकतो. वैद्यकीय विमाअंतर्गत वैद्यकीय तपासण्या, ऑपरेशन्स असे अनेक प्रकारचे खर्च यात समाविष्ट होतात म्हणजे आपल्याला खर्च केलेली रक्कम परत मिळते.

Section 80D संबंधी एक लेख आम्ही आधीच लिहीला आहे. तो आपण वाचून त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

शैक्षणिक कर्जावर वजावट

आयकर कलम ८०ई अंतर्गत शैक्षणिक कर्जावर आपण जे व्याज भरतो त्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकरात वजावट मिळते. मात्र आयकर कलम ८०ई अंतर्गत ही वजावट जास्तीत जास्त ८ वर्ष किंवा तुमचं शैक्षणिक कर्ज फेडून होईपर्यंतच मिळू शकते.

म्हणजे तुमचं शैक्षणिक कर्ज दहा वर्षात फिटणार असेल तर ही सवलत ८ वर्षांपर्यंत मिळेल आणि जर कर्ज ८ वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये फेडून होणार असेल म्हणजे ६ किंवा ७ वर्ष तर तेवढ्या काळापर्यंत ही वजावट मिळेल.

गृहकर्जाच्या व्याजावर वजावट

आयकर कलम २४ अंतर्गत करदात्याला गृहकर्जाच्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकरात वजावट मिळेल. ही वजावट जास्तीत जास्त २ लाखापर्यंत मिळते. आणि जर घरमालक इनकम टॅक्स रिटर्न भरत असेल तर ही वजावट दीड लाखापर्यंत मिळेल. तसंच घरमालक स्वतः किंवा त्याचं कुटुंब त्या घरात राहत असलं पाहिजे तरच ही वजावट मिळेल.

आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेल्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जावर वजावट

आयकर कलम ८०ईई अंतर्गत ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच घर विकत घेतलं असेल आणि त्यावर गृहकर्ज घेतलं असेल तर त्याच्या व्याजाच्या रकमेवर रु ५० हजार रुपयांपर्यंत प्राप्तिकरात वजावट मिळेल. याला काही इतरही नियम आहेत. ही वजावट आयकर कलम २४ शिवाय मिळते म्हणजे आयकर कलम २४ आणि ८०ईई अशा दोन्ही वजावटी एकदम मिळू शकतात.

घरभाड्यावर वजावट

आयकर कलम ८०जीजी अंतर्गत घरभाड्याच्या रकमेवर सुद्धा वजावट मिळते. ही वजावट जास्तीत जास्त वार्षिक ६० हजार आणि दरमहा ५००० एवढी मिळते. ही सवलत खासकरून व्यावसायिक किंवा जे नोकरी करत नाहीत किंवा ज्यांना घरभाडे भत्ता मिळत नाही अशा करदात्यांसाठी आहे. ज्यांना घरभाडे भत्ता मिळतो ते या कलमांतर्गत वजावट मिळवू शकत नाहीत.

Section 80GG संबंधी एक लेख आम्ही आधीच लिहीला आहे. तो आपण वाचून त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

दिव्यांग व्यक्तींसाठी होणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या रकमेवर वजावट

आयकर कलम ८०डीडी अंतर्गत जर करदात्याच्या कुटुंबात कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांसाठी होणाऱ्या खर्चाच्या रकमेवर आयकरात वजावट मिळते. या कलमांतर्गत कुटुंबातील सदस्य म्हणजे करदात्याचा जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी, करदात्याची मुले आणि आईवडील यांचा समावेश होतो.

ही वजावट कुटुंबातील व्यक्तीच्या दिव्यांगतेच्या प्रमाणावर अवलंबून असते. जर दिव्यांगतेच प्रमाण ४०% ते ७९% च्या दरम्यान असेल तर वजावट ७५ हजार पर्यंत मिळते आणि जर दिव्यांगतेच प्रमाण ८०% असेल तर वजावट १ लाख २५ हजार पर्यंत मिळते

Section 80DD संबंधी एक लेख आम्ही आधीच लिहीला आहे. तो आपण वाचून त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

राष्ट्रीय बचत योजनेच्या गुंतवणुकीच्या रकमेवर वजावट

आयकर कलम ८०सीसीडी (१बी) अंतर्गत करदात्याला राष्ट्रीय बचत योजनेच्या गुंतवणुकीच्या रकमेवर वजावट मिळते. म्हणजे या योजनेत आपण जी रक्कम दरवर्षी भरतो त्या रकमेवर वजावट मिळते. ही वजावट जास्तीत जास्त रु ५० हजार पर्यंत मिळते.

राष्ट्रीय पेन्शन योजना भारत सरकारने सुरू केलेली सेवानिवृत्ती योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेच प्रमुख उद्दिष्ट निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न मिळवून देणं हे आहे. ही निवृत्तीसाठी दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) आणि केंद्र सरकार द्वारे चालवली जाते.

तर मंडळी, आज आपण बघितली आयकरातील अशी कलम ज्याअंतर्गत आपल्याला कलम ८०सी शिवाय (How to save tax other than 80C) वजावट मिळते. तेव्हा याचा नक्की फायदा घ्या. आणि ही माहिती आवडली असेल तर इतरांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top