इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न | Income from Other Sources

Income from Other Sources

आज आपण Income from Other Sources किंवा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न या संबंधी माहिती बघणार आहोत. या प्रकारच्या उत्पन्नामध्ये सामान्यपणे पगार, घराची मालमत्ता, व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्त्पन्न अशी उत्पन्न धरली जातं नाहीत. Income from Other Sources हा सुद्धा उत्पन्नाचाच एक प्रकार आहे, ज्यावर प्राप्तिकर आकारला जाऊ शकतो.

Income from Other Sources किंवा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न या प्रकारच्या उत्पन्नामध्ये अनेक प्रकारची उत्पन्न धरली जातात. खालील उत्पन्नाची यादी याच स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची आहे.

व्याजातून मिळणारे उत्पन्न

व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये अनेक प्रकार येतात. ज्यामध्ये बचत खात्यावरील व्याज म्हणजे बचत खात्यातील शिल्लक रकमेवर मिळणारे व्याज, मुदत ठेवीवरील व्याज म्हणजे एका ठराविक मुदतीसाठी ठेवलेल्या ठेवींवर मिळणारे व्याज आणि आवर्ती ठेव व्याज.

आवर्ती ठेव म्हणजे अशा ठेवींवर मिळणारे व्याज जिथे आपण दर महिन्याला एक ठराविक ठराविक कालावधीसाठी रक्कम भरतो आणि त्यावर आपल्याला ठराविक दराने व्याज मिळते.

लाभांश किंवा डिव्हिडंड मधून मिळणारे उत्पन्न

गुंतवणूकदार जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतो आणि त्या कंपनीचा भागीदार बनतो. ती कंपनी भविष्यात त्यांच्या फायद्यातील काही भाग आपल्या शेअर होल्डर्सना देते त्याला डिव्हिडंड किंवा लाभांश म्हणतात. हे उत्पन्न अतिरिक्त उत्पन्नात धरलं जातं.

भाड्याचे उत्पन्न

एखादं घर भाड्याने दिलं असल्यास किंवा एखादी व्यावसायिक जागा किंवा एखादी जमीन यासारखी मालमत्ता भाड्याने दिल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न म्हणजे भाड्याचे उत्पन्न. याप्रकारच्या उत्पन्नाला सुद्धा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न किंवा Income from Other Sources म्हणून धरलं जातं.

फ्रीलान्सिंग किंवा कंसलटन्सी मधून मिळणारं उत्पन्न

जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णवेळ नोकरीप्रमाणे काम न करता स्वतःसाठी काम करते त्याला फ्रीलान्सिंग किंवा कंसलटन्सी म्हणतात. फ्रीलांसर किंवा कन्सलटंट हे स्वतंत्र व्यावसायिकच असतात जे करार तत्वावर काम करतात. ते अनेकदा एकाच वेळी वेगवेगळ्या क्लायंटसह अनेक प्रोजेक्टवर काम करतात. पण त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ मिळत नाहीत.

तर अशा प्रकारे केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना त्यांची कन्सलटंसी फी मिळते. आणि हे उत्पन्न सुद्धा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न किंवा Income from Other Sources म्हणून धरलं जातं.

रॉयल्टीतुन मिळणारं उत्पन्न

लेखक, संगीतकार किंवा कलाकारांनी त्यांची कला सादर केल्याबद्दल त्यांना एक प्रकारची रक्कम दिली जाते त्या उत्पन्नाला रॉयल्टी म्हणतात. तर अशा प्रकारे रॉयल्टी मधून मिळणाऱ्या उत्पन्नाला सुद्धा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न म्हणून धरलं जातं.

भेटवस्तू आणि वारसा हक्कातून मिळालेले

रोख रक्कम किंवा इतर प्रकारे मिळालेल्या भेटवस्तू आणि वारसा हक्कातून मिळालेले उत्पन्न जसं घर, जमीन, रोख रक्कम अशा प्रकारच्या उत्पन्नाला सुद्धा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न किंवा Income from Other Sources म्हणून धरलं जातं.

लॉटरी किंवा जुगार जिंकणे

अनेक प्रकारची लॉटरी, शर्यती जस घोड्यांची शर्यत, पत्ते आणि जुगाराच्या इतर प्रकारांमधून मिळालेली रक्कम किंवा इतर लाभांना उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांमध्ये धरलं जातं.

वार्षिक देयके

अॅन्युइटी प्लॅन किंवा विमा पॉलिसींमधून मिळणारी पेमेंट ही इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मानले जातात. एखाद्या व्यक्तीला अॅन्युइटी कराराचा भाग म्हणून एखाद्या व्यक्तीकडून नियमित पेमेंट प्राप्त होतात. त्याला सुद्धा उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांमध्ये धरलं जातं.

भरपाई किंवा नुकसान

आपल्याला एखाद्या प्रकारे किंवा पातळीवर काही नुकसान झालं असेल आणि त्याबद्दल नुकसान कर्त्याकडून एखादी रक्कम भरपाई म्हणून दिली जाते त्याला नुकसानभरपाई म्हणतात.
तर नुकसान भरपाई किंवा नुकसान म्हणून मिळालेली रक्कम ही सुद्धा उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांमध्ये धरली जाते.

इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर आकारणी (Taxation of income from other sources)

इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न करमुक्त नाही. त्यावर प्राप्तिकर भरावा लागतो. आयकर रिटर्न भरताना करदात्याने अशा उत्पन्नाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. उत्पन्नाचे स्वरूप आणि वेगवेगळ्या कायद्यांनुसार कराचे दर आणि नियम बदलू शकतात.

पण आयकर कायदे आणि नियम वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी कर व्यावसायिकांशी सल्लामसलत करणे योग्य ठरेल.

तर आज आपण Income from Other Sources किंवा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न या संबंधी थोडक्यात माहिती बघितली. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की ही माहिती इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top