How to save Income Tax on Pension 2023 in marathi। पेन्शनवर आता झिरो टॅक्स

How to save Income Tax on Pension 2023

मंडळी आजचा विडिओ खास पेन्शनर लोकांसाठी आहे कारण आज आपण बघणार आहोत पेन्शन वर तुम्ही आयकरात बचत (Rebate on Income Tax on Pension) कशी मिळवू शकता. त्यासाठी आयकरातली कुठली कलम उपयोगी पडतील? आणि पेन्शनर लोकांचा टॅक्स वाचवतील.

मंडळी, पेन्शनर दोन प्रकारचे असतात.
पहिला प्रकार आहे जेष्ठ नागरिक असलेले पेन्शनर म्हणजे ज्यांच्या वयाची ६० वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ज्यांना दरमहा पेन्शन मिळते.

दुसरा प्रकार आहे ६० वर्ष पूर्ण न झालेले पेन्शनर. यामध्ये ५८ व्या वर्षी निवृत्त झालेले कर्मचारी कारण अनेक ठिकाणी निवृत्तीचं वय ५८ वर्ष असतं. सैन्यातून निवृत्त झालेले कर्मचारी, VRS किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी जे ६० वर्षांच्या आधीच निवृत्त होतात.

तर अशा सर्व पेन्शनर मंडळींसाठी आजचा लेख आम्ही घेऊन आलो आहोत. आज आपण बघणार आहोत आयकरातली काही कलम जी पेन्शनर लोकांना आयकरात सूट (Rebate on Income Tax on Pension) मिळवून देतील.

मंडळी, पेन्शन हा असा प्रकार आहे जो दरमहा मिळतो. त्यामुळे पेन्शन या प्रकाराला सॅलरी किंवा पगार असल्याप्रमाणे बघितलं जात. म्हणजे पेन्शन वर सुद्धा आयकराचे तेच सगळे नियम लागू होतात जे पगाराच्या रकमेवर लागू होतात.

तेव्हा आता आपण बघूया ती आयकर कलम जी पेन्शनर लोकांना आयकरात सूट मिळवून देतील

पेन्शनवर इन्कम टॅक्स कसा वाचवायचा? (How to save Income Tax on Pension)

५० हजाराच स्टॅण्डर्ड डिडक्शन (Standard Deduction on Income Tax on Pension)

मंडळी मगाशी बघितल्याप्रमाणे पेन्शन ची रक्कम ही पगारासारखीच धरली जाते त्यामुळे जे पगारदार लोकांना ५० हजाराच स्टॅण्डर्ड डिडक्शन मिळत तेच पेन्शनर लोकांना मिळू शकतं. या ५० हजाराच्या स्टॅण्डर्ड डिडक्शन मुळे तुमच्या वार्षिक पेन्शनच्या रकमेतून थेट ५० हजार रुपये वजा होतात. आणि हे ५० हजाराच स्टॅण्डर्ड डिडक्शन आता दोन्ही टॅक्स रेजिम मध्ये मिळू शकत. म्हणजे जुन्या टॅक्स रेजिम मध्ये मिळतं आणि नवीन टॅक्स रेजिम मधेही मिळतं.

आयकर कलम ८०सी (Section 80C of Income Tax on Pension)

मंडळी, जर तुम्ही पीपीएफ, जेष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, आयकरात बचत मिळणारी एफडी, टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड, आयुर्विमा अशा गोष्टींमध्ये पैसे भरले असतील किंवा भरत असाल तर त्या सगळ्या गुंतवणुकीवर मिळून एकूण जास्तीत जास्त दीड लाखाच्या रकमेवर तुम्हाला आयकर कलम ८०सी अंतर्गत आयकरात वजावट मिळू शकते. आयकर कलम ८०सी ची ही वजावट मिळते म्हणजे तुमच्या वार्षिक पेन्शनच्या रकमेतील दीड लाख एवढी रक्कम थेट करमुक्त होते. आणि उरलेल्या रकमेवर पुढील आकडेमोड होते.

आयकर कलम ८० डी (Section 80D of Income Tax on Pension)

मंडळी, आयकर कलम ८० डी अंतर्गत तुम्ही जी रक्कम मेडिकल इन्शुरन्स साठी भरता त्यावर करपात्र रकमेत वजावट मिळते. ही वजावट ३ प्रकारे मिळते

अर्थात, तुमचा वार्षिक हप्ता तेवढा असला पाहिजे तरच तुम्हाला त्या ठराविक रकमेची वजावट मिळू शकते.
म्हणजे तुमचा वार्षिक मेडिक्लेमचा हप्ता २० हजार असेल तर तुम्हाला २० हजारचीच वजावट मिळेल.

आयकर कलम ८० टीटीबी (Section 80TTB of Income Tax on Pension)

मंडळी, आयकर कलम ८० टीटीबी अंतर्गत जेष्ठ नागरिकांना एफडी किंवा बचत खात्यावर मिळणाऱ्या एकूण व्याजावर ५० हजार रुपयांपर्यंत आयकरात वजावट मिळते. ही वजावट एकूण ५० हजार या रकमेवर असते. म्हणजे बचत खात्यावर आणि मुदत ठेव खात्यावर जे व्याज मिळेल ते जर ५० हजार पेक्षा जास्त असेल तर त्यातील ५० हजार या रकमेवर वजावट मिळते. पण व्याजाची रक्कम ४० हजार असेल तर ४० हजारच वजावट मिळेल.

आणि जर तुम्ही पेन्शनर आहात पण जेष्ठ नागरिक नसाल तर तुम्हाला आयकर कलम ८० टीटीए अंतर्गत आयकरात १० हजारांची वजावट मिळू शकते.

आता इथे बघा दुहेरी फायदा होतो. पहिला फायदा म्हणजे ८० सी अंतर्गत दीड लाखापर्यंत वजावट आणि दुसरा फायदा म्हणजे त्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर ८० टीटीबी अंतर्गत जेष्ठ नागरिकांना ५० हजार आणि ८० टीटीए अंतर्गत ६० वर्षांखालील वय आलेल्यांना आयकरात १० हजारांची वजावट.

आयकर कलम 80DDB (Section 80DDB of Income Tax on Pension)

मंडळी, आयकर कलम 80DDB अंतर्गत जर तुम्ही एखाद्या ठराविक प्रकारच्या रोगासाठी किंवा व्याधींसाठी उपचार घेत असाल उदा कॅन्सर तर त्यावर तुम्हाला आयकरात वजावट मिळू शकते.
ही वजावट जेष्ठ नागरिकांसाठी १ लाखापर्यंत मिळते आणि ६० पेक्षा कमी वय असलेल्यांसाठी ४० हजार पर्यंत वजावट मिळू शकते.

तसंच या प्रकारचे उपचार तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर करून घेत असाल जे तुमच्यावर अवलंबून असतील त्यावरही ही सूट मिळते. फक्त नियम तोच आहे, जेष्ठ नागरिकांसाठी १ लाखापर्यंत वजावट मिळते आणि ६० पेक्षा कमी वय असलेल्यांसाठी ४० हजार पर्यंत वजावट मिळू शकते.

मात्र या उपचारांसाठी तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स कंपनीने काही रक्कम दिली असेल तर ती रक्कम वजा करून उरलेल्या रकमेसाठी तुम्ही या कलमांतर्गत वजावटीसाठी दावा करू शकता.

पेन्शन उत्पन्नावरील कराची आकडेमोड कशी करावी (How to calculate Income Tax on Pension)

तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता कि जर तुम्ही पेन्शनर आणि जेष्ठ नागरिक असाल किंवा पेन्शनर पण तुमचं वय ६० पेक्षा कमी असेल तर तुम्ही पेन्शनमध्ये वजावट कशी मिळवू शकाल.

आत्ता स्क्रीनवर दिसणाऱ्या टेबल मध्ये आपण बघू शकता सगळ्या वजावटी आणि पेंन्शन ची रक्कम दिलेली आहे.


जेष्ठ नागरिक पेन्शनर

६० वर्षांखालील पेन्शनर

वार्षिक पेन्शन

९,००,०००

८,६०,०००

स्टॅंडर्ड डिडक्शन

५०,०००

५०,०००

कलम ८०सी

१,५०,०००

१,५०,०००

कलम ८० डी

५०,०००

५०,०००

कलम ८० टीटीबी

५०,०००


कलम ८० टीटीए


१०,०००

कलम ८० डीडीबी

५०,०००

५०,०००


४,००,०००

३,६०,०००


५,००,०००

५,००,०००

पहिला टॅक्स स्लॅब

दुसरा टॅक्स स्लॅब

१०,०००

१२,५००

कलम ८७ए

१०,०००

१२,५००

करपात्र रक्कम

जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर स्टॅंडर्ड डिडक्शनचे ५००००, आयकर कलम ८० सी चे दीड लाख, आयकर कलम ८० डी चे म्हणजे मेडिकल इन्शुरन्स चे ५००००, आयकर कलम ८० टीटीबीचे म्हणजे एफडी आणि बचत खात्याच्या व्याजावर मिळणाऱ्या वजावटीचे ५०००० आणि आयकर कलम ८० डीडीबीचे म्हंजे दुर्धर व्याधींवरील उपचाराच्या रकमेवर मिळणाऱ्या वजावटीचे ५०००० अशी एकूण ४ लाखांपर्यंत वजावट मिळू शकते.

आणि जर तुम्ही ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे पेन्शनर असाल तर स्टॅंडर्ड डिडक्शनचे ५००००, आयकर कलम ८० सी चे दीड लाख, आयकर कलम ८० डी चे म्हणजे मेडिकल इन्शुरन्स चे ५००००, आयकर कलम ८० टीटीएचे म्हणजे बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर मिळणाऱ्या वजावटीचे १०००० आणि आयकर कलम ८० डीडीबीचे म्हंजे दुर्धर व्याधींवरील उपचाराच्या रकमेवर मिळणाऱ्या वजावटीचे ५०००० अशी एकूण ३६०००० पर्यंत वजावट मिळू शकते.

मग उरलेल्या ५ लाखाच्या उत्पन्नावर जेष्ठ नागरिकांसाठी १०००० रु आणि ६० वर्षांखालील पेन्शनर साठी १२५०० रु. एवढा टॅक्स होतो.

मात्र ही जी टॅक्सची रक्कम असेल त्यावर आयकर कलम ८७ए (Section 87A) अंतर्गत जास्तीत जास्त १२५०० या कराच्या रकमेवर सवलत मिळते. त्यामुळे उरलेलं ५ लाखाचं उत्पन्न सुद्धा करमुक्त होतं. त्यामुळे ९ लाखापर्यंत पेन्शन मिळणारे जेष्ठ नागरिक आणि ८६०००० पर्यंत पेन्शन मिळणारे ६० वर्ष पेक्षा कमी वय असलेले नागरिक आपलं उत्पन्न करमुक्त करू शकतात.

तेव्हा मंडळी आज आपण पेन्शनच्या रकमेवर आयकरात सूट कशी मिळवायची (How to save Income Tax on Pension) बघितलं मुद्दे पुन्हा एकदा नीट बघा आणि जर तुम्हाला ते पटले तर तुमच्या पेन्शनर मित्रांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा याचा उपयोग होईल. धन्यवाद.

Save Income Tax on Pension हा विडिओ अवश्य बघा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top